23 February 2025 8:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

नाशिक: विरोधकांवर आरोप करून ५ वर्ष अदृश्य झालेल्या सोमय्यांना मनसे अदृश्य झाल्याचा भास?

MNS Chief Raj Thackeray, Former MP Kirit Somaiya, Nashik Vidhansabha Election 2019

नाशिक: जळगाव येथील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा फोटो न लावण्यावरून भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार व प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे. नरेंद्र मोंदीची उंची मोठी आहे, त्यांचा प्रोटोकॉल ठरलेला असतो. त्यांची उद्धव ठाकरे यांच्याशी तुलना होऊ शकत नाही, असा टोला शिवसेनेला लगावला. लोकसभा निवडणुकीत मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच महायुतीला मते मिळाल्याचे सांगत शिवसेनेला सोमय्या यांनी डिवचले आहे.

तसेच नाशिक दौऱ्यावर असल्याने त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला देखील लक्ष केलं आहे. राज ठाकरेंसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काही खरे नाही. हा पक्ष अदृश्य झाला आहे. कालच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नाशिक मध्ये सभा झाली त्याला तुफान प्रतिसाद मिळाला. काँग्रेसला राष्ट्रीय नेता मिळतं नाही, तर मुंबईचे अध्यक्षपद घ्यायला कोणी तयार नाही. राष्ट्रवादीत शरद पवार यांच्या मागे राहणारे दुसऱ्या दिवशी इतर पक्षात दिसतात. त्यामुळे विरोधी पक्ष संपुष्टात आले आहेत.

त्या संपूर्ण घोटाळ्याबाबत राज्य सरकारने समिती गठित करून दिलेल्या अहवालानुसार मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्या प्रकरणातील एका कारखाना खरेदी प्रकरणात संचालक असलेल्या रोहित पवार यांचे नावदेखील असल्याचे सोमय्या यांनी नमूद केले.

शिवसेनेला मानसन्मान न देता गृहीत धरले जाते का? या प्रश्नावर भूमिका मांडताना महायुतीमधील सर्व पक्षांना सन्मानाची वागणूक दिली जाते. मात्र, पंतप्रधान पदाबाबत काही प्रोटोकॉल पाळावे लागतात, असेही त्यांनी सांगितले. ईडीच्या अहवालात शरद पवार यांचे नाव आल्याने दु:ख झाल्याचे कारण सांगत अजित पवार यांनी राजीनामा दिल्याची चर्चा झाली. मात्र, या प्रकरणातील ईडीची चौकशी पूर्ण झाल्यानंतरच राजीनामा नाट्यामागील खरे नाट्यदेखील उलगडले जाईल, असे संकेतदेखील सोमय्या यांनी दिले.

दरम्यान, पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बँकेविरोधात अनेक ठेवीदारांनी बँक व्यवस्थापकाविरोधात तक्रार केलेली असताना भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनीही पीएमसी बँकेविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी विनंती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) यांच्याकडे केली आहे. मात्र स्वतःच्या पक्षाशी संबंधित लोकं त्यात सामील असल्याचे त्यांना प्रसार माध्यमांनी विचारले असता त्यांनी मुंबई आरबीआय कार्यालयाकडून पळ काढला होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#KiritSomaiya(31)#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x