15 January 2025 5:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपया 31 पैशाचा शेअर मालामाल करतोय, अप्पर सर्किट हिट, यापूर्वी 589% परतावा दिला - Penny Stocks 2025 Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल
x

नाशिकमध्ये भरधाव वाहनाने सात लहान मुलांना उडवलं, एकाचा जागीच मृत्यू

नाशिक : वडाळागावात राहणारी ७ लहान मुलं आज सकाळी ३ वाजण्याच्या सुमारास कालिका देवीच्या दर्शनाला घरातून निघाली होती. दरम्यान, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळ येताच एका भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिल्याने सर्वजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील एकाचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.

इस्पितळात दाखल करण्यात आलेल्या जखमींपैकी दोघांची परिस्थिती गंभीर असल्याचे समजते. सकाळी ३ वाजता घटना घडली तेव्हा बऱ्यापैकी शुकशुकाट होता. त्यामुळे जखमींना उपचार मिळण्यास सुद्धा बराच उशीर झाला होता. सध्या जखमींवर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सकाळी झालेल्या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या त्या वाहनचालकाचा सध्या स्थानिक पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, जागीच मृत्यू झालेल्या मुलाचे नाव विशाल पवार असून त्याचे वय ११ वर्ष असल्याचे समजते.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x