22 February 2025 9:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी Bonus Share News | 1 वर 1 फ्री बोनस शेअर देणार ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड डेट पूर्वी गुंतवणूकदारांची धावपळ UPI ID | आता UPI द्वारे पेमेंट करताना मोजावे लागतील एक्सट्रा चार्जेस, या गुगल-पे ने केली सुरुवात, अपडेट जाणून घ्या Railway Ticket Booking | ऑनलाइन की काऊंटर रेल्वे टिकीट, दोघांमधील स्वस्त तिकीट कोणते, हे माहित असु द्या Home Loan with SIP | पगारदारांनो, होम लोन EMI सह 15% एसआयपी करा, लोन फिटताच संपूर्ण व्याज वसूल होईल
x

VIDEO | राज ठाकरे नाशिकच्या माजी महापौरांना म्हणाले 'मास्क काढ'

MNS Chief Raj Thackeray, Former mayor, Remove mask, Nashik

नाशिक, ०५ मार्च: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी राज ठाकरे यांचे विनामास्क नाशकात आगमन झाले. राज ठाकरेंच्या स्वागतासाठी माजी महापौर अशोक मुर्तडक आले होते. यावेळी राज ठाकरे यांनी मुर्तडक यांना “मास्क काढ” असा सूचक इशारा केला. त्यामुळे राज ठाकरेंच्या ‘विनामास्क आग्रहा’ची चर्चा रंगली आहे.

राज्यभरात कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून मास्क वापरावे अशी सूचना वारंवार राज्य सरकार आणि प्रशासनाकडून केली जात आहे. तर दुसरीकडे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वागतासाठी आलेल्या नाशिकच्या माजी महापौरांना मास्क काढण्यास भाग पाडल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

राज ठाकरे आज सकाळी नाशिकमध्ये ते दाखल झाले आहे. यावेळी त्यांचं स्वागत करण्यासाठी मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हॉटेलच्या परिसरात एकच गर्दी केली होती. राज ठाकरे यांचं स्वागत करण्यासाठी फुलाचा पुष्पगुच्छ घेऊन माजी महापौर अशोक मुर्तडक समोर आले होते. अशोक मुर्तडक यांनी तोंडावर एकावर एक असे दोन मास्क घातले होते. राज ठाकरे यांनी त्यांच्या तोंडावर दोन मास्क पाहिले आणि ‘मास्कवर मास्क’ असं विचारताच मुर्तडक यांनी मास्क बाजूला केले.

 

News English Summary: Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray is on a two-day visit to Nashik. At this time Raj Thackeray arrived in Nashik without a mask. Former Mayor Ashok Murtadak had come to welcome Raj Thackeray. At this time, Raj Thackeray warned Murtadak to “remove the mask”. Therefore, the discussion of Raj Thackeray’s ‘Vinamask Agraha’ is colorful.

News English Title: MNS Chief Raj Thackeray asks former mayor to remove mask at Nashik video news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x