22 December 2024 7:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, कंपनीबाबत अपडेट, मोठी कमाई होईल - Vikas Lifecare Share Price Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: TATAMOTORS
x

नाशिक | भाजपला मदत करत किंगमेकर मनसे महाविकास आघाडीचा मार्ग अवघड करणार?

MNS, BJP, Nashik Municipal Corporation

नाशिक, २५ फेब्रुवारी: नाशिक महापालिका स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा मनसे साथ देणार आहे. सभापतीपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पक्षाला मदत करणार आहे. सांगली महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष खबरदारी घेताना दिसत आहे.

भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडी दोघांचेही प्रत्येकी 8 सदस्य असल्यामुळे रंगत वाढली आहे. नाशिक महापालिकेत स्थायी समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत मनसे किंगमेकर ठरणार आहे. दोन दिवसांपूर्वी सांगली महापालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत आलेल्या अनुभवामुळे भारतीय जनता पक्ष खबरदारी घेताना दिसत आहे. स्थायी समितीचे भारतीय जनता पक्षाचे 8 सदस्य गुजरातला रवाना झाले आहेत.

तौलनिक संख्याबळाच्या आधारे नाशिकच्या महापौरांनी स्थायी समितीचे सदस्य जाहीर केले. नाशिक महापालिकेत स्थायी समितीवर भारतीय जनता पक्षाचे 8, शिवसेनेचे 5, काँग्रेसचा 1, राष्ट्रवादीचा 1, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 1 सदस्य असेल. महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष सामना होणार असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थायी निवडणुकीत किंगमेकर ठरणार आहे.

 

News English Summary: MNS will once again support Bharatiya Janata Party in the election of Nashik Municipal Corporation Standing Committee Chairman. Maharashtra Navnirman Sena will help Bharatiya Janata Party in the election for the post of Speaker. The Bharatiya Janata Party (BJP) seems to be taking precautions against the backdrop of Sangli municipal elections.

News English Title: MNS will once again support BJP in the election of Nashik Municipal Corporation news updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x