14 November 2024 12:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजी वाढणार - NSE: JIOFIN Vodafone Idea Share Price | पेनी शेअर पुन्हा रॉकेट होणार, रेटिंग अपडेट, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IDEA Horoscope Today | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस कसा राहील, जीवनात आनंद आणि समाधान प्राप्त होईल - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा सल्ला काय - NSE: SUZLON IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल तगडा परतावा, कमाईची संधी सोडू नका - GMP IPO NBCC Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांच्या सल्ला, सकारात्मक अपडेट नंतर पुन्हा तेजी येणार - NSE: NBCC Smart Investment | श्रीमंतीचा महामंत्र पहाच, म्युच्युअल फंडातून कमवाल पैसाच पैसा आणि पैशाने पैसा वाढवा - Marathi News
x

सर सलामत तो हेल्मेट पचास | नाशकात आजपासून 'नो हेल्मेट, नो पेट्रोल' अभियान

No Helmet No Petrol in Nashik

नाशिक, १५ ऑगस्ट | आपल्या देशाची संस्कृती ही कुटुंब वत्सल असल्याने कुटुंबासाठी आपले जीवन सुरक्षित असणे, ही आपली प्राथमिकता आहे. त्यासाठी कोणतेही वाहन चालवितांना आपण सर्वांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. या अनुषंगानेच आज (रविवारी) जिल्ह्यात ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ ही मोहीम आजपासून राबविण्यात येत आहे. ‘सर सलामत तो हेल्मेट पचास’ यानुसार स्वत:च्या सुरक्षेसाठी नागरीकांनी हेल्मेट वापरून या उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

आज भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सदभावना पोलीस पेट्रोल पंप, गंगापूर रोड येथे मंत्री भुजबळ यांच्या हस्ते ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ मोहिम शुभारंभ कार्यक्रम पार पडला. गेल्या पाच वर्षात शहरात ७८२ अपघातात ८२५ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. अपघाती मृतांमध्ये ४६७ हे दुचाकीस्वार असून त्यापैकी ३९७ जणांनी हेल्मेट परिधान केले नसल्याचे समोर आले आहे.

अशा अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस आयुक्त पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणारा हा उपक्रम स्तुत्य असून, कोणत्याही परिस्थितीत नागरीकांचा जीव वाचविणे हेच या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. नागरीकांनी वाहतुकीच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास खऱ्या अर्थाने जबाबदार नागरिक म्हणून देशाच्या विकासात हातभार लावला जाईल, अशी भावना भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

हेल्मेट न घातल्याने होणाऱ्या अपघातांचे गांभीर्य लक्षात घेवून, सर्व पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही कॅमेरे लावून हेल्मेट न घालणाऱ्या बेशिस्त नागरीकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी, अशा सुचना देखील यावेळी भुजबळ यांनी दिल्या आहेत. ही मोहिम यशस्वीपणे राबवून देशात आदर्श निर्माण करू असेही यावेळी भुजबळ म्हणाले. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी व त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस आयुक्तालयातर्फे प्रत्येक पेट्रोल पंपावर माहिती फलक लावून जनजागृती करण्यात येणार आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: No Helmet No Petrol campaign in Nashik news updates.

हॅशटॅग्स

#Nashik(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x