महत्वाच्या बातम्या
-
लोटसचं ऑपरेशन | वसंत गीतेंची मिसळ पे चर्चा | राष्ट्रवादी-शिवसेना की पुन्हा मनसे?
इतर पक्षातील नेते भाजपात येत नसल्याने माजी आमदार बाळासाहेब यांना पुन्हा पक्षात घेऊन भाजपने आमच्याकडे भरती होतं आहे असा केविलवाणा प्रयत्न केला होता. मात्र राजकीय पत संपलेले बाळासाहेब सानप कोणत्याही पक्षाला नकोसे होते आणि अखेर अपरिहार्यता म्हणून पुन्हा तिकीट नाकारलेल्या भाजपमध्ये सामील झाले. विशेष म्हणजे भाजपने देखील एखादा माजी मुख्यमंत्री भाजपात येतोय असा प्रचार सुरु केला. मात्र सानप यांच्या येण्याने भाजपाला अजून पणवती लागली आहे. कारण नाराज नेते भाजप सोडू लागले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
नाशिकमध्ये भाजपाला मोठं खिंडार पडणार | शिवसेना धक्का देण्याचा तयारीत
नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सानप यांचा फायदा होऊ शकत असल्याने भारतीय जनता पक्षानेही सानप यांना पक्षात घेण्याची तयारी दर्शवली आणि त्यांना प्रवेश दिला. मात्र, दोन वर्षात तीन पक्ष बदलणाऱ्या नेत्याला पक्षात प्रवेश कशासाठी दिला जात आहे? असा सवाल भारतीय जनता पक्षाच्या एका गटातून उपस्थित होत आहे. सानप हे आज पक्षात येतील आणि महापालिका निवडणुकीनंतर पुन्हा त्यांनी पक्ष बदलला तर? असा सवालही भारतीय जनता पक्षामधील या गटाकडून विचारला जात आहे. पण सानपांच्या पक्षप्रवेशानंतर आता भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. कारण, अनेक नाराज नगरसेवक भाजपला रामराम ठोकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजप नेत्यांकडून पुन्हा तीच चूक | सानप यांच्या प्रवेशाने अनेक नगरसेवक पक्ष सोडण्याचा तयारीत
नाशिकचे माजी आमदार बाळासाहेब सानप (Former Nashik MLA Balasaheb Sanap) यांनी शिवसेनेला धक्का देत पुन्हा भारतीय जनता पक्षाचा हात धरला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Opposition Leader Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत सानप यांनी मुंबईत भारतीय जनता पक्ष प्रवेश केला. “महाविकास आघाडीतील आमदारांमध्ये अस्वस्थता असल्यामुळे पक्षात बाहेरील नेत्यांचे आगमन होणार असल्यांच्या पुंग्या सोडल्या जात आहेत. मात्र वेगवेगळ्या पक्षातून आलेले राजकीय नेते प्रगल्भ आहेत” असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं.
4 वर्षांपूर्वी -
महापालिका निवडणुका | जागावाटपात अडचण आल्यास निकालानंतर एकत्र येऊ - भुजबळ
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे जागावाटप होईपर्यंत आघाडीतील प्रत्येक घटक पक्ष आपल्या पक्षाचा संघटनात्मक विस्तार करीत राहील. भारतीय जनता पक्षासह विविध पक्षांत नाराज आहेत. परंतु त्यांना प्रवेश देतांना वरिष्ठ पातळीवर निर्णयानंतरच त्याचा पक्षप्रवेशाचा निर्णय होईल. जागावाटपात अडचणी आल्यास स्वतंत्र निवडणूक लढता येईल. निवडणूक निकालानंतर देखील एकत्र येण्याचा पर्याय असेल, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
कंगनाला भेट घ्यायला वेळ | मग कांदा उत्पादकांनाही वेळ द्या | शेतकऱ्यांची मागणी
केंद्र सरकारने कांद्यावर अन्यायकारक निर्यातबंदी लादून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना आर्थिक नुकसानीला सामोरे जाण्यास भाग पाडले आहे. मोदी सरकार समाज माध्यमाचा मोठय़ा प्रमाणात आधार घेऊन देशभरातील शेतकरी, शेती विकासाचे स्वप्न दाखवून सत्तेत आले. परंतु, सरकारची प्रत्यक्ष कृती मात्र शेतकरी विरोधी राहिल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केला आहे. या पार्श्वभूमीवर, निर्यातबंदी विरोधात शनिवारपासून शेतकरी समाज माध्यमांवर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी -
नाशिक हादरलं | एकाच कुटुंबातील चौघांची गळा चिरुन हत्या
नांदगाव तालुक्यातील वाखारीजवळील जेऊर येथे एकाच कुटुंबातील चार जणांची अज्ञाताकडून हत्या करण्यात आल्याने नाशिक जिल्हा हादरला आहे. चव्हाण कुटुंबातील पती-पत्नी आणि दोन लहान मुलांची हत्या केल्याची घटना रात्री घडली. या हत्याकांडामुळे नांदगाव तालुका हादरला आहे. गळा चिरुन हत्या करण्यात आल्याने चव्हाण कुटुंब रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. सकाळी ही बाब उघड झाली आहे. दरम्यान, घटनास्थळी मालेगांव , नांदगाव पोलीस दाखल झाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
नाशिकमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना डॉक्टरांकडून टाळाटाळ, पवारांकडून चिंता व्यक्त
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूरनंतर आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. नाशिक जिल्ह्यातही करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येनं झाला असून, प्रसार नियंत्रणासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा पवारांनी आढावा घेतला. शहरातील रुग्णसंख्या वाढत असताना डॉक्टरांकडून टाळाटाळ केली जात आहे. यावर चिंता व्यक्त करत पवार यांनी डॉक्टरांनाही इशारा दिला.
4 वर्षांपूर्वी -
भाजपचे आमदार फुटू नयेत म्हणून वरिष्ठ त्यांना सत्ता येण्याचं लॉलीपॉप दाखवत आहेत - भुजबळ
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. ही भेट राजकीय नव्हती. आम्हाला सरकार पाडण्यात काहीही कुठलाही रस नाही. आत्ता कोरोनाची लढाई सुरु आहे. त्यामुळे कोरोनाच्या संदर्भात आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ही भेट होती. महाराष्ट्रातली कोरोनाची परिस्थिती मी अमित शाह यांच्या कानावर घातली आहे. तसेच फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यामुळे पुन्हा राज्यातील सरकार पडणार अशी चर्चा सुरु झाली.
4 वर्षांपूर्वी -
सामान्यांना २ किमीच्या मर्यादा असताना अक्षय कुमार हेलिकॉप्टरने नाशिकला, चौकशीचे आदेश
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार नाशिक दौऱ्यामुळे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला अक्षय कुमार दोन दिवस नाशिकजवळ मुक्कामी होता. अक्षय कुमार हेलिकॉप्टरने नाशिकमध्ये आला होता त्यामुळे अक्षय कुमारचा हा दौरा वादात सापडण्याची शक्यता आहे. लॉकडाउनच्या काळात हेलिकॉप्टरला परवानगी व शहर पोलिसांनी दिलेला बंदोबस्त या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
नाशिक महागरपालिकेचे तब्बल ६०-७० कोटी YES बँकेत अडकले; प्रशासनाची पंचायत
रिझर्व्ह बँकेनं येस बँकेवर निर्बंध घातले आहेत. या निर्बंधांमुळे खातेधारकांना महिन्याभरासाठी ५० हजार रुपयांपर्यंत रक्कम काढता येणार आहेत, मात्र त्यापेक्षा अधिक रक्कम खात्यातून काढायची असल्यास रिझर्व्ह बँकेची विशेष मंजुरी घ्यावी लागणार आहे. केवळ अपवादात्मक परिस्थितीत खातेधारकांना पैसे काढता येणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाची लागण महाराष्ट्रातही, नाशिकमध्ये आढळला संशयित रुग्ण
भारतात कोरोनाव्हायरसने पुन्हा शिरकाव केल्यानंतर आता महाराष्ट्रालाही कोरोनाचा धोका आहे. नवी दिल्ली, तेलंगणा, राजस्थान पाठोपाठ आता महाराष्ट्रातही कोरोनाव्हायरसचा संशयित रुग्ण सापडला आहे. मंगळवारी नाशिकमध्ये हा संशयित रुग्ण आढळून आला. नाशिकमध्ये एका व्यक्तीमध्ये कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसून आलीत. त्याला विषाणूची लागण झाल्याचा संशय आहे. या संशयित रुग्णाच्या रक्ताचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत. आता तिथल्या रिपोर्टची प्रतीक्षा आहे.
5 वर्षांपूर्वी -
उद्धव कडाडले! काहींच्या हट्टामुळे सत्ता गेली, स्थिती पुन्हा येईल; थेट RSS व मोदींना पत्र
नाशिक भाजपमधील अंतर्गत कलह चांगलाच उफाळून आला आहे. स्थायी समिती सभापती उद्धव निमसे यांनी शनिवारी आपली कारकीर्द संपताना काही पक्ष नेत्यांवर गंभीर आरोप केले. पक्षातील काही नेत्यांनी आपल्याला प्रचंड त्रास दिला, अवास्तव मागण्या केल्या, असा गंभीर आरोप उद्धव निमसे यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर स्थानिक नेत्यांनी देखील अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना तातडीने बदलावे, अशी मागणी निमसे यांनी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
नाशिक: पेट्रोल फेकून महिलेला ४ जणांकडून जिवंत जाळण्याचा प्रयत्न
निफाड तालुक्यातील लासलगाव बसस्थानकाच्या आवारात एका महिलेवर पेट्रोल फेकून काही अज्ञात हल्लेखोरांनी तिला जाळण्याचा प्रयत्न केला आहे. घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले असून मुख्यमंत्र्यांच्या बंदोबस्तात व्यस्त पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
5 वर्षांपूर्वी -
नाशिक: अडगावकर सराफाच्या दुकानात हजारो गुंतवणूकदारांची धाव; मोठा गोंधळ
गुंतवणुकीच्या नावाखाली नाशिकमध्ये फसवणुकीचा प्रकार समोर आलाय. नाशिकच्या आडगावकर सराफने ‘सुवर्णसंधी’ या नावाने योजना सुरू केली होती. या योजनेत मोठ्या प्रमाणात नागरिकांनी पैसे गुंतवले. मात्र कालावधी संपून देखील त्यातील पैसे, दागिने पुढील सहा महिने उलटूनही गुंतवणूकदारांना मिळाले नाहीत. तेव्हा आज कॅनडा कॉर्नर येथील आडगावकर सराफ शॉपमध्ये हजारो गुंतवणूकदारांनी मोठा गोंधळ घातला. परतावा आणि मुद्दलही मिळत नसल्यानं गुंतवणूकदार संतप्त झाले.
5 वर्षांपूर्वी -
पवार पंतप्रधान व्हावेत; २ वर्षांपूर्वी जे बाळा नांदगावकर बोलले ते राऊत आज बोलले
महाराष्ट्र हा परिवर्तनाचा केंद्रबिंदू आहे. दिल्लीच्या तख्तावर मराठी माणूस पंतप्रधानपदी बसावा हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. महाविकास आघाडीचा पॅटर्न हा देशातील परिवर्तनाची नांदी आहे. राज्यातील सर्वच्या सर्व ४८ खासदार याच विचाराचे निवडून यायला हवेत. आगामी लोकसभा निवडणुकीत २०२४ ला हे परिणाम दिसतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
5 वर्षांपूर्वी -
नाशिकमध्ये एसटी-रिक्षाचा भीषण अपघात; २० ठार
नाशिकमधील देवळा येथे बस आणि रिक्षाची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर बस आणि रिक्षा शेजारील शेतात असणाऱ्या विहिरीत जाऊन कोसळली. या अपघातात १० ते ११ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सात ते आठ जणांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले आहेत. अपघातग्रस्त बस मालेगावकडून कळवण येथे चालली होती. बस आणि रिक्षाचालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.
5 वर्षांपूर्वी -
साईबाबा जन्मस्थळाचा वाद; शिर्डी आजपासून बंद
साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण केल्याच्या निषेधार्थ शनिवारी मध्यरात्रीपासून शिर्डी शहर बेमुदत काळासाठी बंद करण्यात आले आहे. शिर्डी ग्रामस्थांनी शनिवारी रात्री झालेल्या ग्रामसभेत हा निर्णय घेतला. बंद काळात साईबाबा मंदिर उघडे राहणार असून, दुकाने, बाजार मात्र बंद राहतील. या बंदमध्ये पंचक्रोशीतील गावे सहभागी होणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
नाशिक: महाविकास आघाडीमुळे मनसेचे दिलीप दातीर यांचा पोटनिवडणुकीत पराभव
नाशिकमध्ये दोन जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे प्रयोग यशस्वी झाले आहेत. नाशिकमध्ये प्रभाग क्रमांक २६ च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे मधुकर जाधव विजयी झाले आहेत. इथं महाविकास आघाडी प्रयोग यशस्वी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे शिवसेनेनं जागा राखली आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेचे उमेदवार मधुकर जाधव यांना पाठिंबा जाहीर केला होता. जाधव यांच्याविरोधात सेनेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत गेलेले उमेदवार दिलीप दातीर हे उभे होते.
5 वर्षांपूर्वी -
ज्यांनी बाळासाहेबांना धोका दिला, त्यांचा सत्यानाश झाला: मंत्री गुलाबराव पाटील
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं आडनाव ठाकरे नसतं, तर ते आज संगीतकारांमध्ये दिसले असते, अशी जहरी टीका शिवसेनेचे आमदार आणि नवनिर्वाचित पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे. नाशिकमध्ये पोटनिवडणुकीच्या प्रचारात ते बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
'ठाकरे' आडनाव नसते तर राज ठाकरे संगीतकारांमध्ये दिसले असते: मंत्री गुलाबराव पाटील
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं आडनाव ठाकरे नसतं, तर ते आज संगीतकारांमध्ये दिसले असते, अशी जहरी टीका शिवसेनेचे आमदार आणि नवनिर्वाचित पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे. नाशिकमध्ये पोटनिवडणुकीच्या प्रचारात ते बोलत होते.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News