महत्वाच्या बातम्या
-
विखेंची नगरमध्ये ताकद नव्हती; सर्व १२ जागा जिंकू म्हणत ३ जिंकल्या: राम शिंदे
महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कर्जत-जामखेडच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांचा विजय झाला होता. रोहित पवार यांना १३५८२४ तर भारतीय जनता पक्षाचे राम शिंदे यांना ९२४७७ मते मिळाली. राेहित पावर यांचा तब्बल ४३,३४७ मतांनी विजय झाला आहे. त्यामुळे मंत्री राम शिंदे यांना ५ वर्ष तरी घरी बसावं लागणार हे निश्चित झालं. निवडणुकीपूर्वीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे राजकीय वारसदार म्हणून चर्चेत आलेले रोहित पवार यांनी पहिल्याचा दणक्यात भाजपच्या एका मंत्र्याला पराभूत करून घरी बसवला होतं. सध्या कर्जत-जामखेडमधील रोहित पवारांचा वाढता राजकीय आवाका पाहता राम शिंदेंना पुढच्या दुसराच मतदारसंघ शोधावा लागेल अशी शक्यता आहे. त्यामुळे राम शिंदे देखील संतापलेले दिसतात.
5 वर्षांपूर्वी -
मनसे'नंतर वसंत गीते भाजपाला रामराम ठोकण्याच्या तयारीत; भुजबळांची भेट घेतली
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गीते यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे. ‘छगन भुजबळ यांना सदिच्छा दिल्या आणि त्यांचं स्वागत केलं. त्यांचे आशीर्वाद घेण्याकरीता भेट घेतली,’ अशी प्रतिक्रया वसंत गीते यांनी दिली आहे. तसंच यावेळी वसंत गीते यांनी भुजबळांवर चांगलीच स्तुतीसुमने उधळली.
5 वर्षांपूर्वी -
यापुढे फक्त मनसे पक्षहित? मनसे नाशिकच्या दत्तक पुत्रांसोबत; महापौरपद भाजपाकडे
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात ऐतिहासिक अशी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महाविकासाआघाडी अस्तित्वात आली आहे आणि दुसऱ्याबाजूला २५ वर्षांपूर्वीची भाजप-शिवसेनेची युती केंद्रापासून संपुष्टात आली आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना पाठिंबा जाहीर करत अप्रत्यक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पसंती दिली होती. मात्र त्याला शिवसेनेने तीव्र विरोध केला होता.
5 वर्षांपूर्वी -
नाशिक: पवारांकडून जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीची पाहणी; शेतकऱ्यांच्या भेटीगाठी
राज्यातील सत्ता स्थापनेवरून भारतीय जनता पक्ष-शिवसेनेत वाद सुरू असताना दुसरीकडे शरद पवार हे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावले आहेत. शरद पवार सकाळी अकरा वाजेच्या सुमारास नाशिकमध्ये दाखल झाले. इगतपुरीमधील भात पिकाच्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली. शेतकऱ्यांचं नुकसान आणि त्यांच्या व्याथा ते जाणून घेत आहेत. आमच्या हातचं पीक गेलंय. खूप नुकसान झालंय. जगावं की मरावं असा प्रश्न आमच्या समोर आहे. मात्र सरकारतर्फे कुणीच आलेलं नाही, असं शेतकऱ्यांनी पवारांना सांगितलं.
5 वर्षांपूर्वी -
नाशिक: लष्कर भरतीच्या ६३ जागांसाठी २० हजार तरुण; भीषण बेरोजगारीचं वास्तव
नाशिकच्या देवळाली कॅम्पमध्ये लष्कराच्या भरतीसाठी तब्बल ३० हजार तरुण दाखल झाले आहेत. देवळाली कॅम्प येथील ११६ टीए पॅरा बटालियनच्या ६३ जागांसाठी आजपासून लष्कराने भरतीची प्रक्रिया सुरू केलीय. या भरतीसाठी फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातील ९ राज्य व ३ केंद्र शासित प्रदेशातील शेकडो युवक देवळालीत दाखल झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
दत्तक नाशिक'मधील अतिहुशार सरकारी इंजिनियर आणि रस्त्यांची कामं: सविस्तर
आपल्या देशात पायाभूत सुविधा उभारताना कशाचा कशालाच ताळमेळ नसतो याची अनेक उदाहरणं समोर आली आहेत. एखादो रास्ता बनवताना त्याला करोडो रुपये खर्च येतो आणि तो साधारण ५-१० वर्ष तरी टिकावा ही साधारण अपेक्षा असते. काँक्रीटचा रस्ता बनवताना तर खूप काळजी घावी लागते. म्हणजे रास्ता बनवण्यापुरीच रस्त्याखालून जाणाऱ्या केबल्स आणि जलवाहिन्यांची तरतूद करणं गरजेचं असतं. तसे न केल्यास पुन्हा तयार झालेला रस्ता खोदून कामं पूर्ण करावी लागतात आणि त्यातून पुन्हा सरकारी कॉन्ट्रॅक्टर आर्थिक वाटमाऱ्यांचे रस्ते खुले करतात.
5 वर्षांपूर्वी -
नाशिक: विरोधकांवर आरोप करून ५ वर्ष अदृश्य झालेल्या सोमय्यांना मनसे अदृश्य झाल्याचा भास?
जळगाव येथील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा फोटो न लावण्यावरून भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार व प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे. नरेंद्र मोंदीची उंची मोठी आहे, त्यांचा प्रोटोकॉल ठरलेला असतो. त्यांची उद्धव ठाकरे यांच्याशी तुलना होऊ शकत नाही, असा टोला शिवसेनेला लगावला. लोकसभा निवडणुकीत मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच महायुतीला मते मिळाल्याचे सांगत शिवसेनेला सोमय्या यांनी डिवचले आहे.
5 वर्षांपूर्वी -
नाशिकमध्ये येणारा KIA मोटर्स प्रकल्प नाशिकच्या दत्तक बापाने नागपूरला पळवून नेला - मनसेचा आरोप
ऑस्ट्रेलियन कर मेकर “KIA” मोटर्स कंपनी आपला प्रकल्प नाशिकमध्ये सुरु करणार होती परंतु नाशिकचे दत्तक बाप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प नागपूरला पळवून नेला असा गंभीर आरोप नाशिकचे मनसेचे उमेदवार नितीन भोसले यांनी केला आहे. तसेच महाराष्ट्राच्या वाटेचं पाणी हे नालायक सरकार गुजरातला देत आहे असा देखील गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
धक्का! नाशिकमधील भाजप-शिवसेनेतील युती तुटली
नाशिकमधील भाजप-शिवसेनेतील युती तुटली असून शिवसेनेच्या ३५० पदाधिकाऱ्यांसह ३६ नगरसेवकांनी राजीनामे दिलेत. यामुळे नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. नाशिक पश्चिममधील शिवसेनेची बंडखोरी रोखून नेत्यांची मनधरणी करण्यात भाजप नेते आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांना अपयश आलं आहे. सिंधुदुर्गानंतर आता नाशिकमध्येही शिवसेना-भाजप युतीला झटका बसला आहे.
5 वर्षांपूर्वी -
#VIDEO: समाजातील प्रत्येक घटक नाराज तरी फडणवीसांचा २४० जागांचा दावा
मागील काही दिवसांचा विचार करता निवडणुकीची हवा पूर्ण पलटल्याचे दिसत आहे. अगदी रस्त्यावर ते समाज माध्यमांपासून सर्वत्र सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका होताना दिसत आहे. त्यात भारतीय जनता पक्षाच्या सर्वच नेत्यांनी राज्यातील मूळ प्रश्नांना बगल देत सर्वत्र जम्मू-काश्मीर संबंधित कलम ३७० हा प्रचाराचा प्रमुख मुद्दा केलं आहे आणि त्यामुळे सामान्यांनी सत्ताधाऱ्यांवर पुन्हा लोकसभेप्रमाणे लष्कर आणि इतर भावनिक मुद्यांवरून राजकारण केल्याचा आरोप करत, आम्ही एकदा फसलो मात्र पुन्हा फसणार नाही असं म्हणत समाज माध्यमं देखील भाजप-शिवसेनेवर तुटून पडली आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मनसेचे राहुल ढिकले आधीपासूनच भाजपच्या संपर्कात होते हे चौथ्या यादीत सिद्ध झालं
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली चौथी यादी जाहीर केली आहे. यामध्ये पक्षाने मुक्ताईनगर मतदारसंघातून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं तिकीट कापत त्यांची कन्या रोहिनी खडसे यांना उमेदवारी दिली आहे. तिकीट कापलं जाणं हा एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
#VIDEO: पुणे-नाशिकमध्ये मनसेच्या या पुराव्यामुळे होऊ शकते भाजपाची पोलखोल
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने काल आपल्या १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, दक्षिण कराडमधून अतुल भोसले यांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात उतरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, तब्बल १२ विद्यमान आमदारांचा पत्ता कापण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
नाशिक: वसंत गीते भाजपातही नाराज; समर्थकांची बैठक बोलावली
विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची पहिली यादी भाजपने जाहीर केल्यानंतर पक्षाची डोकेदुखी वाढली आहे. कारण तिकीट न मिळालेल्या नेत्यांनी बंडाचा झेंडा फडकवला सुरुवात केली आहे. युतीतील बंडखोरांनी आता आघाडीशी जवळीक केल्याचंही पाहायला मिळत आहे. तर काही बंडखोरांनी अपक्ष लढण्याची तयारी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राम मंदिराचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे; हे वाचाळवीर कुठून टपकतात? मोदींचा उद्धव यांना टोला
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली असून यात्रांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याची रणनीती आखली आहे. सत्ताधारी भाजपनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली महाजनादेश यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा आता अंतिम टप्प्यात आहे.
5 वर्षांपूर्वी -
पाच वर्षात राज्यात शेतकऱ्यांचा विकास झाला: पंतप्रधान नरेंद्र मोदी
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली असून यात्रांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याची रणनीती आखली आहे. सत्ताधारी भाजपनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली महाजनादेश यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा आता अंतिम टप्प्यात आहे.
5 वर्षांपूर्वी -
विधानसभा: आज मोदींचा नाशिक दौरा; मात्र भाजपाला कांदाफेकीची भीती?
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर काढण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या वेळी भारतीय जनता पक्षाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार असून, सभेची तयारी पूर्ण झाली आहे. मोदी आणि फडणवीस यांच्यासह अर्ध्या मंत्रिमंडळाच्या उपस्थितीत होत असलेल्या या जाहीर सभेच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
नाशिक: बनावट नोटा प्रकरणातील आरोपी छबू नागरेचा शिवसेनेत प्रवेश
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरु आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील पदाधिकाऱ्यांचा त्यात सर्वात मोठा समावेश आहे. दिग्गज नेत्यांना थेट मातोश्री आणि वर्षा निवासवर प्रवेश दिले जाती आहेत. त्यात अनेक ठिकाणी कोणतीही तत्व आणि पार्श्वभूमी न पाहता केवळ निवडणूक जिंकायच्याच या उद्देशाने प्रवेश देणं सुरु आहे.
5 वर्षांपूर्वी -
भुजबळांना शिवसेनेत घेणार नाही, नाशिकमध्ये पक्ष फुटण्याच्या भीतीने उद्धव यांचा निर्णय
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी भारतीय जनता पक्ष शिवसेनेते प्रवेश केला आहे. त्यानुसार राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री छगन भुजबळ हे पुन्हा घरवापसी करणार असल्याची चर्चा आहे. मात्र ही चर्चा केवळ एक अफवा आहे, असे छगन भुजबळ यांनी सांगितले आहे. तरी देखील छगन भुजबळ यांच्या सध्याच्या हालचालींवरून भुजबळ हे शिवसेना प्रवेश करणार असल्याचं बोलल जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
नाशिकच्या रस्त्यावर धावणार 'पिंक ऑटो'
शहरातील महिलांना स्वयंपूर्णतेकडे नेण्यासह त्यांना प्रवासात सुरक्षेची हमी देणाऱ्या पिंक रिक्षा नवी दिल्ली, मुंबई, पुण्यानंतर आता नाशिक शहरातील रस्त्यावरही धावणार आहेत. स्थायी समितीच्या माजी सभापती हिमगौरी आहेर-आडके यांच्या महत्वाकांक्षी योजनेला मूर्त स्वरूप आले असून, महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून शहरातील महिलांना रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण व परवाने दिले जाणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री शिवसेनेचाचं होणार, शिवसेनेची पोस्टरबाजी; मग फडणवीस?
आगामी निवडणुकीत युती निश्चित मनाली जात असली तरी जसजशा निवडणुका जवळ येत आहेत तसतसा भारतीय जनता पक्ष आणि सेनेतील कलगीतुरा रंगण्यास सुरुवात होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर कार्यकर्ते आणि पदाधीकारी आक्रमक होताना दिसत आहेत. त्यात कालच शिवसेनेने उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानल्याचं वृत्त सर्वत्र वाचण्यास मिळालं. मात्र आता शिवसेनेचा दुसरा अंक सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना
- EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम