महत्वाच्या बातम्या
-
कांद्याला एक-दीड रुपया भाव, शेतकऱ्याने तो विकून सगळे पैसे मोदींना 'मनीऑर्डर' केले
या सिजनमध्ये कांद्याला अवघा एक-दीड रुपयाचा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचाच प्रत्यय काल नाशिक मध्ये आला आहे. २०१४ मध्ये “बहुत हुआ किसान पर अत्याचार, अब की बार मोदी सरकार” अशी घोषणा देत सत्तेत आलेल्या पंतप्रधान मोदींची या शेतकऱ्याने चांगलीच कोंडी केली आहे. एकूण सात क्विंटल ५० किलो कांदा विकून मिळालेले १,०६४ रुपये संजय साठे या शेतकऱ्याने थेट मोदींना मनिऑर्डर करून पाठवले आणि ‘ठेवा तुम्हालाच’ असा थेट संदेश पंतप्रधांना दिला आहे.
6 वर्षांपूर्वी -
मुंढेंची बदली झाल्याच्या आनंदाने भाजपाचा फटाके फोडून आनंदोत्सव
कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय महानगर पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाल्याच्या निमित्ताने नाशिक भाजपने फटाके फोडून दिवाळी साजरी केली आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या दबावानेच मुंढे यांची अवघ्या ९ महिन्यांमध्ये नाशिकच्या आयुक्त पदावरुन उचलबांगडी करण्यात आल्याची चर्चा रंगली आहे.
6 वर्षांपूर्वी -
राज-पवारांच्या विमान प्रवासावर टीका, आज उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटील एकाच गाडीने प्रवास
शिवसेना दिल्ली ते गल्ली भाजपसोबत सत्तेत बसून राज्यात तब्बल १२ मंत्रिपद उपभोगत आहे आणि केंद्रात एक कॅबिनेट मंत्रिपद आहे. परंतु, स्वबळाचा नारा देताना शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिल्ली ते गल्लीपर्यंत भाजपच्या नेत्यांवर टीका आणि आगपाखड करण्याची एकही संधी सोडत नाहीत. परंतु आज नाशिक दौऱ्यावर आलेल्या शिवसेना पक्षप्रमुखांनी चक्क महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत एकाच गाडीतून प्रवास केला. त्यांच्यासोबत मिलिंद नार्वेकर सुद्धा गाडीत होते.
6 वर्षांपूर्वी -
मराठवाड्यासाठी विविध धरणांतून पाणी सोडण्यात आले.
सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर आज अखेर मराठवाड्यासाठी विविध धरणांमधून पाणी सोडण्यात आले आहे. निळवंडे धरणातून सकाळी ८.४० च्या सुमारास जायकवाडी धरणासाठी ४२५० क्युसेक्स इतके पाणी सोडण्यात आले आहे. तर मुळा धरणातून ६,००० क्युसेक्सक इतके पाणी सोडण्यात आले असे प्रश्नाने कळवले आहे.
6 वर्षांपूर्वी -
जायकवाडी धरणात पाणी सोडण्यावरून नगर-नाशिक विरुद्ध मराठवाडा संघर्ष
दुष्काळजन्य परिस्थिती ओढावल्याने नगर-नाशिक विरुद्ध मराठवाडा असा पाणी संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत. नाशिक जिल्ह्यांमधील धरणांमधून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यावरून अहमदनगर – नाशिक विरुद्ध मराठवाडा असा संघर्ष सध्या सुरू आहे. अहमदनगर – नाशिकमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे जायकवाडीला पाणी देण्यास स्थानिक प्रतिनिधींचा आणि लोकांचा तीव्र विरोध होत आहे. परंतु, राज्य पाटबंधारे विभागाच्यावतीने धरणात पाणी सोडण्याची तयारी सुरू झाली आहे असे वृत्त आहे. आज जिल्हाधिकाऱ्यांची अकरा वाजता बैठक घेण्यात आहे. त्यामुळे या बैठकीनंतर पाणी सोडण्यात येणार का? यावर अंतिम निर्णय होणार असल्याचे समजते.
6 वर्षांपूर्वी -
छगन भुजबळांना जीवे मारण्याचं धमकी पत्र
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांना जीवे मारण्याची धमकी आल्याचे वृत्त आहे. जर तुम्ही मनुस्मृतीला विरोध केला तर आम्ही तुमचा सुद्धा दाभोलकर, पानसरे करु असे धमकी पत्र भुजबळांना आल्याची बातमी आहे. भुजबळांच्या नाशिकमधील ‘भुजबळ फार्म’ हाऊसवर एका निनावी पत्राद्वारे ही धमकी देण्यात आल्याचं समजतं. दरम्यान, एनसीपीच्या नाशिकमधील पदाधिकाऱ्यांनी नाशिक पोलिस आयुक्तांची भेट घेऊन, यासंदर्भात रीतसर तक्रार नोंदवणार असल्याची माहिती दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी येथे साई समाधीच्या दर्शनाला
पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी येथे साई समाधीच्या दर्शनाला
6 वर्षांपूर्वी -
नाशिकमध्ये भरधाव वाहनाने सात लहान मुलांना उडवलं, एकाचा जागीच मृत्यू
वडाळागावात राहणारी ७ लहान मुलं आज सकाळी ३ वाजण्याच्या सुमारास कालिका देवीच्या दर्शनाला घरातून निघाली होती. दरम्यान, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळ येताच एका भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिल्याने सर्वजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील एकाचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
शासनाच्या चुकीमुळं एका रात्रीत उपनिरीक्षकांवर पुन्हा पोलीस कॉन्स्टेबल बनण्याची वेळ
ज्या दिवशी पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्तीचं पत्र मिळालं त्याच दिवशी न्याधिकरणाचा आदेश देत सर्व नियुक्ती रद्दीचं पत्र प्रशिक्षणार्थींच्या हाती आलं आणि होत्याचं नव्हतं झालं असच म्हणावं लागेल. महाराष्ट्र सरकारी यंत्रणेतला सावळा गोंधळ असच काहीस चित्र आहे. विशेष म्हणजे नऊ महिन्यांच्या खडतर प्रशिक्षणानंतर पोलीस उपनिरीक्षक नियुक्ती पत्राऐवजी नियुक्ती रद्दीचं पत्र प्रशिक्षणार्थींच्या हाती आलं आणि अनेकांना धक्का बसला.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचे माजी खासदार दिवंगत राजाभाऊ गोडसेंच्या कुटुंबीयांच राज ठाकरें'कडून सांत्वन
शिवसेनेचे नाशिकमधील पहिले खासदार राजाभाऊ तथा राजाराम परशराम गोडसे यांचे मुत्रपिंड विकाराने १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी पंचवटीतील खासगी रूग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले होते . त्यांचं वय ५९ वर्षांचे होते. कट्टर शिवसैनिक म्ह्णून ओळख असलेले राजाराम परशराम गोडसे हे काही काळ मनसेमध्ये सुद्धा होते.
6 वर्षांपूर्वी -
नाशिककरांच्या तीव्र संतापापुढे भाजप नरमली, मुंढेंविरोधातील अविश्वास प्रस्ताव मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नगरसेवकांना दिले आहेत. त्यामुळे नाशिककरांच्या तीव्र संतापापुढे भाजप नरमली असल्याची चर्चा नाशिक शहरात रंगली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मराठा आणि बहुजन समाजात फूट पाडण्याचा सरकारचा डाव: शरद पवार
मराठा समाजच्या आंदोलकांनी हिंसा तसेच जाळपोळीचे प्रकार थांबवून शांततेने आंदोलन करण्याला प्राधान्य द्यावे आणि मराठा व बहुजन समाजात फूट पाडण्याचा सरकारचा डाव हाणून पडावा असं आवाहन राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
मराठा समाजाची ‘महाराष्ट्र बंद’ची हाक, पंढरपुरात इंटरनेट बंद
मराठा आरक्षणासाठी तसेच विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाजाने आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. मात्र या बंद मधून मुंबई, ठाणे, नवी मुंबई या शहरांना वगळण्यात आलं आहे. परंतु राज्यात इतर ठिकाणी कडकडीत बंद पाळला जाणार आहे. सुरक्षेचं कारण पुढे करत पंढपुरातील इंटरनेट बंद करण्यात आल्याचं वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
संख्याबळ असलेले विरोधक नव्हे, तर संख्याबळ नसलेले राज ठाकरेच आगामी निवडणुकीत भाजपला उजवे ठरतील: सविस्तर
मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध पोटनिवडणुका, नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांचे निकाल आणि भाजपाची घोडदौड पाहता, त्यांच्या समोर आमदार, खासदार असं मोठं संख्याबळ असणारे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसारखे पक्ष सुद्धा फिके पडताना दिसत आहेत. तर पदवीधर निवडणुकांचे निकाल हे जवळजवळ निश्चित असतात आणि त्या निवडणुकीचा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीशी संबंध जोडणे अवघड आहे. परंतु पदवीधर निवडणुकीत सुद्धा भाजपने कोकणात चमत्कार केला तर नाशिकमध्ये ते गाफील राहिल्याने जागा गमवावी लागली होती.
6 वर्षांपूर्वी -
आरपीआय आठवले गटात फूट, वेगळा युनायटेड रिपब्लिकन पक्ष स्थापन करणार
भारतीय जनता पक्षाने दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटात उभी फूट पडली आहे. त्यामुळे नाराज पदाधिकाऱ्यांनी युनायटेड रिपब्लिन पक्ष या नावाने नवा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, त्याची अधिकृत घोषणा ४ ऑगस्ट रोजी नाशिक येथे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे हा रामदास आठवले आणि भाजप या दोन्ही पक्षांना निवडणुकीपूर्वी धक्का मानला जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
मनसे सत्तेत असताना नाशिक महानगर पालिकेत केलेले कचरा व्यवस्थापन...विरुद्ध औरंगाबादमधील कचराकोंडी
मनसे सत्तेत असताना नाशिक महानगर पालिकेत केलेले कचरा व्यवस्थापन…विरुद्ध औरंगाबादमध्ये झालेली प्रचंड कचराकोंडी आणि मुख्यमंत्र्यांचे हतबल होऊन औरंगाबाद महानगरपालिका बरखास्त करण्याचा इशारा
6 वर्षांपूर्वी -
औरंगाबादमधील कचराकोंडीने नाशिकमधील मनसेच्या काळातील कचरा व्यवस्थापनाच महत्व अधोरेखित झालं?
परंतु औरंगाबाद महापालिकेतील कचराकोंडीने आणि वाईट अनुभवातून, नाशिक महापालिकेत मनसेच्या सत्ताकाळात झालेलं कचरा व्यवस्थापन आणि कचरा व्यवस्थापनाचं शहराच्या दृष्टिकोनातून महत्व अधोरेखित होत आहे. एकूणच औरंगाबादमधील तब्बल ५ महिण्यापासून झालेल्या कचराकोंडीवर तोडगा काढण्यात सत्ताधारी शिवसेनेला आणि भाजपला अक्षरशः अपयश आले आहे. अनेक वर्षांपासून केवळ टेंडरशाहीत गुंतलेल्या सत्ताधारी आणि प्रशासनाने औरंगाबाद बकाल केलं असून रोजच जगन सुद्धा तोंडावर रुमाल ठेऊन करावं लागत आहे आणि आता पावसामुळे मोठ्या प्रमाणावर रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
आज चौथ्या दिवशीही दूधकोंडी कायम, जनावरांसह चक्काजाम आंदोलन
राज्यातील दूधकोंडी चौथ्या दिवशीही सुरूच आहे. ग्रामीण भागात आंदोलन अजून तीव्र करण्यात आलं आहे. तिकडे सोलापुरात ‘दुधाच्या दरात वाढ करण्यात यावी’ या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारपासून राज्यभर दूध बंद आंदोलन सुरुच आहे.
6 वर्षांपूर्वी -
तीच झलक! अमित ठाकरेंचा सक्रिय राजकारणातील प्रवेश ठरू शकतो तरुणांसाठी आकर्षणाचा विषय
राज ठाकरेंचे चिरंजीव सक्रिय राजकारणात कधी येणार हा सर्वांसाठी चर्चेचा विषय होते आहे. अर्थात प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे आणि राज ठाकरे अस संपूर्ण कुटुंबच एक विचारधारा असलेलं विद्यापीठ म्हणून महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला परिचित आहे. त्यामुळे असा वारसा लाभलेल्या कुटुंबातील तिसरी पिढी जेव्हा सक्रिय राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या कानावर पडू लागतात, तेव्हा त्याबद्दल कुतूहल निर्माण होणारच.
6 वर्षांपूर्वी -
नाशिकमध्ये वसंत गीते समर्थकांमध्ये फूट, भाजप'ला रामराम करून राष्ट्रवादीत प्रवेश: भुज'बळ' पावर
नाशिक भाजपमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता आहे. भाजपचे महत्वाचे पदाधिकारी व वसंत गीते समर्थक भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहेत. या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश निश्चित झाल्याचे वृत्त आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ जामिनावर बाहेर आल्यानंतर या घडामोडींना जोर आला आहे. भाजप’मधील पक्ष फुटी नाशिकमधून सुरु होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News