27 December 2024 7:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअरवर ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: BEL Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 55 टक्केपर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर ब्रेकआऊट देणार. तज्ज्ञांनी दिले तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRFC Suzlon Share Price | सुझलॉन शेअर टॉप लेव्हलवरून 25% घसरला, आता 100 रुपयांच्या पार जाणार - NSE: SUZLON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS NBCC Share Price | एनबीसीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार - NSE: NBCC
x

नाशिकमध्ये सोमवारपासून 8 वी ते 12वी पर्यंतच्या शाळा सुरु | पाणी कपातीचीही भुजबळांची घोषणा

Schools Reopen in Nashik

नाशिक, १७ जुलै | डेल्टा व्हेरिएंट आणि रुग्णसंख्येतील वाढ या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात येत असल्याची घोषणा नाशिकचे पालकमंत्री आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केलीय. भुजबळ यांनी आज नाशिकमधील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी निर्बंधांची घोषणा केली. त्यानंतर नाशिकमध्ये उद्यापासून सरकारी, राजकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तसंच सर्व दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंतच सुरु ठेवण्याचे आदेश भुजबळ यांनी प्रशासनाला दिले आहेत.

नाशिक जिल्ह्याची लोकसंख्या 73 लाख आहे. आतापर्यंत 12 लाख 81 हजार नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर 3 लाख 80 हजार लोकांनी दुसरा डोसही घेतलाय. बाकी लोकांची लसीकरण अद्याप झालेलं नाही. ऑगस्टमधील पहिल्या आठवड्यापर्यंत लसीचा साठा सुरळीत होईल. तसंच ऑक्सिजनचं उद्दिष्टही जास्त ठेवलं आहे, अशी माहिती भुजबळ यांनी दिलीय.

जिल्ह्यातील 8 वी ते 12वी पर्यंतच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील एक महिन्यात ज्या गावात एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाही, अशा गावात शाळा सुरु होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 1 हजार 24 शाळांपैकी कोरोनामुक्त 335 गावातील 296 शाळा सुरु होत आहे. एका बाकड्यावर एकच मुलगा बसेल. शाळांना नियम पाळावे लागतील. गावात रुग्ण सापडला तर शाळा बंद होणार, असंही भुजबळ यांनी सांगितलं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Schools will be reopen in Nashik from Monday news updates.

हॅशटॅग्स

#Nashik(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x