5 February 2025 11:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PPF Scheme | सरकारी PPF योजना ठरेल फायद्याची, अवघी 100 रुपयांची गुंतवणूक 10 लाख रुपयांचा परतावा देईल SBI Car Loan | एसबीआय बँकेकडून 5 वर्षांसाठी 8 लाखांचे कार लोन घेतल्यानंतर किती EMI हप्ता भरावा लागेल, रक्कम जाणून घ्या TATA Punch EV | धमाका ऑफर, 19,500 रुपयांच्या मासिक EMI वर घरी घेऊन या 'टाटा पंच EV, संधी सोडू नका Rent Agreement | सावधान, भाड्याने घर घेताना ॲग्रीमेंटमधील 'ही' कलमे अवश्य वाचा, अन्यथा मोठं नुकसान होईल IRB Infra Share Price | 54 रुपयाचा शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Tata Mutual Fund | जबरदस्त फंड, 2000 च्या SIP बचतीवर 2 कोटी रुपये मिळतील, तर एकरकमी 1 लाखावर 3.5 कोटी मिळतील Old Vs New Tax Regime | पगारदारांसाठी कोणती टॅक्स प्रणाली फायदेशीर ठरेल, तुमचा फायदा कुठे सोप्या शब्दांत जाणून घ्या
x

नाशिक: अडगावकर सराफाच्या दुकानात हजारो गुंतवणूकदारांची धाव; मोठा गोंधळ

Adgaonkar Jewellers, Investors demanded money back, Nashik

नाशिक: गुंतवणुकीच्या नावाखाली नाशिकमध्ये फसवणुकीचा प्रकार समोर आलाय. नाशिकच्या आडगावकर सराफने ‘सुवर्णसंधी’ या नावाने योजना सुरू केली होती. या योजनेत मोठ्या प्रमाणात नागरिकांनी पैसे गुंतवले. मात्र कालावधी संपून देखील त्यातील पैसे, दागिने पुढील सहा महिने उलटूनही गुंतवणूकदारांना मिळाले नाहीत. तेव्हा आज कॅनडा कॉर्नर येथील आडगावकर सराफ शॉपमध्ये हजारो गुंतवणूकदारांनी मोठा गोंधळ घातला. परतावा आणि मुद्दलही मिळत नसल्यानं गुंतवणूकदार संतप्त झाले.

घटनास्थळी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी पोहचले. जो पर्यंत पैसे अथवा दागिने मिळत नाही तोपर्यंत येथून न जाण्याचा निर्णय गुंतवणूकदारांनी घेतला. गुंतवणूकदार ११ महिने सलग हप्ता भरून बाराव्या महिन्याचा हप्ता सराफ भरणार होते. त्यानंतर बारा महिन्याची होणारी रक्कम अथवा तितक्याच किमतीचे दागिने मिळणार होते.

त्याच बरोबर दागिने ठेवल्यास १० टक्क्यांपर्यंत व्याज मिळणार होते. मात्र योजना उलटून पाच ते सहा महिने झाले मोबदला मिळत नसल्यानं गुंतवणूकदार संतप्त झाले आहे. याबाबत पोलीस घटनास्थळी पोहचले असले तरी अजून याबाबत तक्रार अथवा गुन्ह्यांची नोंद झालेली नाही.

तत्पूर्वी गुडविन ज्वेलर्सच्या विरोधात आतापर्यंत शेकडो नागरिकांनी तक्रार दाखल केली होती. सुमारे १ कोटीपेक्षा जास्त रक्कमेची फसवणूक झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र ५० कोटींची खंडणी मागितल्यामुळे सुरक्षित ठिकाणी स्थळी असल्याची गुडविन ज्वेलर्सच्या मालकांनी प्रसार माध्यमांना खोटी माहिती दिली होती. तसेच ग्राहकांचे पैसे परत करण्याचा शब्दही दिला होता.

गुडविन ज्वेलर्सच्या ठाणे आणि डोंबिवली शहरातील शाखेत ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने घेतलेल्या झडतीत हाती काहीच न लागल्याने गुडविन ज्वेलर्सची ही फसवणूक पूर्वनियोजित असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले होते. तसेच तपासातही हाती काहीच लागत नसल्याने या प्रकरणात मुंबई पोलिसांची मदत घेतली गेली होती. त्यानंतर भिशी आणि जादा व्याजदराचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक गुडविन ज्वेलर्सचे मालक सुधीरकुमार आणि सुनीलकुमार या दोघांनी केली होती.

 

Web Title: Story Investors demanded money back at Adgaonkar Jewellers in Nashik.

हॅशटॅग्स

#Nashik(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x