महत्वाच्या बातम्या
-
राज ठाकरे म्हणाले होते पक्ष वाढीवर कोण आडवा आला तर तुडवा त्याला... तेवढ्यात वसंत मोरे.. पहिला ह्याला!!
MNS Leader Vasant More | पुण्यातील सामान्य लोकांशी आणि त्यांच्या प्रश्नांशी जोडले गेलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्या विरोधात पुण्यातील वरिष्ठ नेत्यांचा गट कुरघोडीचे राजकारण करत असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. विशेष म्हणजे या नेत्यांचा सामान्य लोंकाशी तशी कोणतीही जवळीक नसून केवळ आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीतील तिकीट वाटपातील व्यवहाराशी त्याचा संबंध असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे निवडणुका जाहीर होण्यापूर्वी काहीही करून वसंत मोरे पक्षाबाहेर जातील अशी फिल्डिंग लावली गेल्याच वृत्त आहे.
2 वर्षांपूर्वी -
शिंदे गटाचा भाजपच्या हिंदुत्वावरच संशय? भाजप आमदार प्रसाद लाड यांचा जन्म पाकिस्तानात झालाय काय? अशी प्रतिक्रिया
Shinde Camp MLA Sanjay Gaikawad | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदींनी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानांमुळे निर्माण झालेलं वादंग अद्यापही संपलेलं नाही. त्यातच आता भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाबद्दल चुकीचं विधान केलं आहे. लाड यांच्या या विधानामुळे संपूर्ण वादाला खतपाणी मिळाल्याचंच दिसत असून विरोधकांनी यावरून भाजपची कोंडी केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र हादरला | मुंबईत 42 वर्षीय महिलेवर गँगरेप तर पालघरमध्ये 5 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार
Crime News | कुर्ल्यात एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन आरोपींनी महिलेवर सामूहिक बलात्कार तर केलाच शिवाय सिगारेटने तिचे गुप्तांगही जाळले. आरोपीने या घटनेचा व्हिडिओ बनवून महिलेला धमकी दिली की, जर तिने तोंड उघडले तर तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू. महिला कुर्ला परिसरात राहते. बुधवारी तीन जणांनी जबरदस्तीने त्याच्या घरात प्रवेश केला, असे महिलेने पोलिसांना सांगितले. त्यावेळी ही महिला घरात एकटीच होती. या महिलेवर तिन्ही आरोपींनी सामूहिक बलात्कार केला. त्यांनी महिलेला अनेक तास ओलीस ठेवले आणि बलात्कार केला.
2 वर्षांपूर्वी -
पुणे मनसेत खळबळ, वसंत मोरेंचे निकटवर्तीय निलेश माझिरेंच्या हकालपट्टीनंतर 400 कार्यकर्त्यांचा राजीनामा
Pune MNS Vasant More | मनसेसाठी महत्वाच्या असलेल्या पुणे शहरात जमिनीवरील आणि लोकांशी जोडल्या गेलेल्या पदाधिकाऱ्यांच राजकीय खच्चीकरण राज ठाकरेंच्या जवळील नेतेच करत असल्याचं खात्रीलायक वृत्त होतं. त्यापैकी पुण्यातील एक नेता हा राज ठाकरेंशी अत्यंत जवळीक असलेला असून त्या नेत्याचा सामान्य लोकांशी कोणताही संबंध नाही अशी माहिती आहे. पुण्यात पक्ष विस्तार किंवा पक्ष संघटनेच्या बळकटीशी काडीचाही संबंध नसलेले वरिष्ठ स्थानिक पदाधिकारी वसंत मोरे आणि त्यांच्या जवळील कार्यकर्त्यांचे प्रचंड खच्चीकरण करत असल्याची माहिती समोर आली होती. आता त्याला दुजोरा मिळत आहे आणि विशेष पुण्यातील त्याच कुचकामी नेत्यांना पक्षाध्यक्ष महत्व देतं आहेत अशा तक्रारी समोर आल्या होत्या. आता त्याप्रमाणे गोष्टी घडू लागल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही.
2 वर्षांपूर्वी -
फडणवीसांचे लाडके आमदार प्रसाद लाड यांचं धक्कादायक विधान, म्हणाले 'छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला'
Chhatrapati Shivaji Maharaj | महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करण्याची भारतीय जनता पक्षामध्ये स्पर्धाच रंगली आहे. राज्यपाल कोश्यारी, सुधांशू त्रिवेदीं, मंगलप्रभात लोढा यांच्यापाठोपाठ आता भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनीही भलतेच विधान केले आहे. शिवरायांचा जन्म हा कोकणामध्ये झाला होता, असं वक्तव्य लाड यांनी केलं आहे. लाड यांच्या विधानामुळे वाद पेटला आहे.
2 वर्षांपूर्वी -
एक 'सोंगाड्या' आहे जो सकाळी भगवा आणि दुपारी हिरवा असतो, मनसेच्या गजानन काळेंचा धार्मिक टोला कोणाला?
Sushma Andhare | शिवसेनेच्या सुषमा अंधारे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर मनसे प्रवक्त्याने टीका केली आहे. मनसे नेते गजानन काळे यांनी संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांचं नाव न घेता टीका केली आहे. महाराष्ट्रात वांद्रे मातोश्री येथे असा एक “सोंगाड्या” आहे जो सकाळी भगवा, दुपारी हिरवा आणि रात्री सप्तरंगात असतो… तरी बाईला कोण कधी उठतो व कधी झोपतो याचं जास्त पडलेलं, अशी टीका गजानन काळे यांनी केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
आज या विकृत लोकांच्या तावडीत देश गेला आहे, छत्रपती शिवरायांच्या अवमान नाट्यांवर उदयनराजे संतापले
MP Udayanraje Bhonsale | छत्रपती शिवाजी महाराजांना जुन्या काळातील आदर्श म्हणणाऱ्या भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवण्यासाठी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झालेत. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती मुर्मू यांना पत्र पाठवल्यानंतर कोणतीही कार्यवाही न झाल्यानं उदयनराजे आज रायगडावर जाऊन भूमिका मांडली आहे.
2 वर्षांपूर्वी -
सिंधुदुर्ग दौरा | जिल्ह्यात पक्ष विस्तारासाठी गेले आणि कार्यकारिणी बरखास्तीची वेळ, मुंबईतील कार्यकर्त्यांच्या भरोसे सिंधुदुर्ग दौरा
Raj Thackeray | राज ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. कालपासून सिंधुदुर्गातून दौऱ्याला सुरुवात झाली. दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ तालुक्यातील मनसे पदाधिकाऱ्यांबरोबर राज ठाकरे संवाद साधणार होते. सिंधुदुर्गातील संघटनात्मक बांधणीसाठी ही मनसेची महत्त्वाची बैठक होती. राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या वेळी बाळा नांदगावकर, अमित ठाकरे यांच्यासह मनसे नेते उपस्थित होते. मनसेची भाजपसोबतची जवळीक पाहता त्यांच्यामध्ये कोकणातील राजकारणावरही परिणाम होईल असं वाटलं होत, पण कोकणात मनसे नावालाच आहे याचं जिवंत उदाहरण समोर आलं आहे. कारण, पक्षाध्यक्ष स्वतः जिल्ह्यात आलेले असताना पदाधिकारी न फिरकल्याने मोठी चर्चा सुरु झाली आहे. अनेकांना याबद्दल माहितीच नाही अशी उडवाउडवीची कारण दिली जातं असली तरी याबद्दल प्रसार माध्यमांवर वृत्त सुरु असताना मनसेने दिलेली कारणं न पटणारी आहेत.
2 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंची आजारावरून नक्कल, सुषमा अंधारेंनी सभा गाजवत राज ठाकरेंचा मुद्देसूद 'राजकीय बँड' वाजवला
Sushma Andhare | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जशास तसे प्रत्युत्तर दिलंय. सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रेची सभा मुलुंडमध्ये झाली. यावेळी त्यांनी भाजप, शिंदे गटासह मनसेवर टीका केली. उठ दुपारी अन् घे सुपारी असा त्यांचा कार्यक्रम असतो अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. एकूण सुषमा अंधारेंनी या सभेत मुद्देसूद राज ठाकरेंच्या राजकारणाची पिसं काढल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे राज ठाकरेंवरील टीकेला उपस्थितांनी तुफान प्रतिसाद दिल्याचं देखील पाहायला मिळालं. मात्र यापुढे राज ठाकरेंनी किंवा मनसे नेत्यांनी अधिक राजकीय आगाऊपणा केल्यास सुषमा अंधारे अजून तुफान हल्ला चढवतील असं देखील दिसू लागलंय.
2 वर्षांपूर्वी -
Sushma Andhare | ऊठ दुपारी अन् घे सुपारी असा आमच्याकडे एक पठ्ठ्या, अंगावर केस नसेल तरी चालेल, पण वाया गेलेली केस नसावी
Sushma Andhare | आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या मुंबईतील धारावीचा पुनर्विकास जगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत आणि आशियातील सर्वात श्रीमंत असलेल्या गौतम अदानी यांच्या कंपनीमार्फत केला जाणार आहे. या शर्यतीत सर्वच कंपन्यांना मागे टाकत अदानी समूहाची कंपनी अदानी रिअॅल्टी या कंपनीने धारावी झोपडपट्टी पुनरुज्जीवनाच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाची बोली जिंकली आहे. आता गौतम अदानी हा प्रकल्प पूर्ण करणार आहेत.
2 वर्षांपूर्वी -
शिंदे गट फोडण्यासाठी 3000 कोटी खर्च, 2500 कोटी आमदारांवर खर्च, 500 कोटी त्यांच्या मॅनेजमेंटवर खर्च झाले, वरिष्ठ पत्रकाराचा दावा
50 Khoke Ekdam Ok? | एकीकडे ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिंदे गटाचे आमदार खूपच अस्वस्थ आहेत. हे आमदार कोणत्याही क्षणी गटातून बाहेर पडू शकतात. ते फुटू नयेत यासाठी या आमदारांना पुन्हा ५-५ कोटी रुपये देण्यात आले आहेत, असा गौप्यस्फोट चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. एका उद्योगपतीनेच आपल्याला ही माहिती दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे. खैरे यांनी केलेल्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
VIDEO | महागाई - बेरोजगारीमुळे लोकं त्रस्त, बाळासाहेबांचा पक्ष फोडून आता त्यांच्या नावाचा गुजरात निवडणुकीत भाजपकडून वापर
Balasaheb Thackeray | गुजरातमधील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापूर्वी क्रिकेटपटू रवींद्र जडेजाने बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हिडिओ ट्विटरवर ट्विट केला आहे, ज्यामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मोदींबद्दल त्यावेळच्या परिस्थितीवर एक विधान केलं होतं. या ट्विटमध्ये रवींद्र जडेजाने लिहिले की, अजून वेळ आहे, गुजराती लोकांना समजते. प्रसिद्ध क्रिकेटपटू जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा जामनगर उत्तर मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार आहेत. २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रिवाबा पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
BREAKING | बनावट स्टॅम्प पेपर घोटाळा, फडणवीसांची सखोल चौकशी करण्याचे ED ला विशेष पीएमएलए कोर्टाचे आदेश
DCM Devendra Fadnavis | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर स्टॅम्प घोटाळा प्रकरणात चौकशी करा, अशी मागणी अॅड. रवी जाधव यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी मुंबई सत्र न्यायालयात रीतसर अर्ज दाखल केला होता. मनी लॉड्रिंग प्रकरणातील आरोपी सतीश उके यांचे वकील रवी जाधव यांनी मुंबई सत्र न्यायालयात चौकशीच्या मागणीसाठी अर्ज केला होता. विशेष पीमएलए कोर्टाचे न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी जाधव यांचा हा अर्ज स्वीकारला होता.
2 वर्षांपूर्वी -
शिंदेंनी सुरतमार्गे राजकीय पलायन केलं होतं, तर इतिहासातील ती घटना 'सुरतेची स्वारी' म्हणून सर्वश्रुत, भाजपकडून चुकीचा इतिहास
Minister Mangal Prabhat Lodha | मोगल सरदार शाहिस्तेखान ३ वर्ष महाराष्ट्रात तळ ठोकून होता. त्यादरम्यान मराठा साम्राज्याला मिळणारा महसूल कमी होऊन राज्याची आर्थिक स्थिती नाजूक झाली होती. त्याला पुण्यातून हुसकावून लावल्यावर राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तातडीने हालचाल केली नसनी तर राज्याचे दिवाळे निघण्याची पाळी आली असती.
2 वर्षांपूर्वी -
'वडे-चिकन सूप' टीकेची आठवण? | ज्यांनी आजोबांचं जेवण काढलं त्यांच्यावर मी बोलणार नाही, ते माझे संस्कार नाही - आदित्य ठाकरे
Aaditya Thackeray | वेदांता-फॉक्सकॉनच्या मुद्द्यांवरुन राज्यात पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे. मंगळवारी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर घालविल्याचा आरोप करत जोरदार हल्लाबोल केला.
2 वर्षांपूर्वी -
Shivsena Party | शिवसेना पक्ष कोणाचा? मुख्य निवडणूक आयोगासमोरील सुनावणीची तारीख ठरली, पण किती काळ लागणार?
Shivsena Party | शिवसेना पक्ष कुणाचा यावर बराच काळ राजकीय चर्चा रंगली आहे. एकनाथ शिंदेंची की उद्धव ठाकरे यांच्यापैकी कोणाच्या बाजूने निकाल लागणार ते समजणार आहे. या संबंधी महत्त्वाची सुनावणी पुढील महिन्यात पार पडणार आहे. निवडणूक आयोगासमोर येत्या 12 डिसेंबर रोजी ही सुनावणी होईल, अशी माहिती समोर आली आहे. ठाकरे आणि शिंदे गट या दोन्ही पक्षांचे वकील निवडणूक आयोगासमोर या दिवशी युक्तिवाद करतील.
2 वर्षांपूर्वी -
Tarikh Pe Tarikh | न्यायमूर्ती सुट्टीवर, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सुनावणी नाही, पुढील तारीख अद्याप अस्पष्ट
Tarikh Pe Tarikh | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र आता सुनावणी लांबणीवर पडली आहे. न्यायाधीश रजेवर असल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सुभाष देसाई यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार होती. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील ५ सदस्यीय घटनापीठासमोर ही सुनावणी होणार होती. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कृष्णा मुरारी रजेवर असल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. सुनावणी पुन्हा कधी सुरू होईल हे अद्याप स्पष्ट नाही.
2 वर्षांपूर्वी -
राज्यातील प्रकल्प गुजरातला गेल्याचा वाईट वाटत नाही, इतर राज्यांचाही विकास महत्वाचा, मग पक्षाचं नाव संघराज्य नवनिर्माण सेना करा ना
Sushma Andhare | राज ठाकरे यांनी काल गट अध्यक्षांचा मेळावा घेतला. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री पदावर असताना तब्यतीचं कारण सांगून आणि आता एकनाथ शिंदे यांनी रात्री कांडी फिरविली. आता फिरतात सगळे. स्वतःच्या स्वार्थासाठी आणि पैशासाठी दिसेल तो हात हातात घ्यायचा नि फिरायचं हे मी करत नाही. उद्धव ठाकरे यांच्या अंगावर एकतरी केस आहे का. भूमिका घ्यायची नाही. फक्त पैशासाठी, स्वार्थासाठी कधी हा कधी तो, अशी टीका राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
2 वर्षांपूर्वी -
ते 16 आमदार | उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी, मोठ्या पवारांनी विशेष काळजी घावी.. अन्यथा, नेटिझन्सच्या चर्चेत झिरवळ का?
Narhari Zirwal | शिवसेना नेमकी कुणाची आणि घटना कोणाच्या बाजूने? गेल्या 3 महिन्यांपासून या प्रश्नामुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षाना केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने कागदपत्र सादर करण्याकरिता देण्यात आलेली डेडलाईन देखील संपली आहे. मात्र उद्धव ठाकरे यांच्या सेनेकडून सर्वाधिक सदस्यांनी कागदपत्र जमा करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच यावर तोडगा निघणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
त्या गुजराती आणि मारवाड्यांना विचारा तुम्ही तुमची राज्य सोडून महाराष्ट्रात का आलात? राज ठाकरेंचा राज्यपालांना प्रश्न
MNS Chief Raj Thackeray | गोरेगाव येथील नेस्को मैदनात आयोजित मनसे गटाध्यक्ष मेळाव्यात राज ठाकरे यांनी अनेक मुद्यांना हात घातला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्या आहेत. कुणाला, मान्यता मिळणार कुणाला नाही मिळणार? चिन्ह कुणाला मिळणार? याबाबत त्यांच त्यांना डोकं खाजवू द्या. असं म्हणत राज ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल