22 December 2024 6:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

नोकरीच्या शोधात आहात? मग आधी सरकारच्या 'महाजॉब्स' पोर्टलवर करा नोंदणी - वाचा सविस्तर

Mahajob portal online registration

मुंबई, ०३ जुलै | डिग्री, कौशल्य शिक्षण असून देखील नोकरी नसलेल्या तरुणांची संख्या महाराष्ट्रात मोठी आहे. सरकारी नोकरीच्या अनेक संधी कधी येऊन जातात हे अनेकदा तरुणांना कळत नाही. सध्या करोनाच्या पार्श्वभुमीवर तरुणांच्या नोकऱ्या गेल्या असून हजारो तरुण बेरोजगार झाले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या पुढाकाराने बेरोजगारांसाठी ‘महाजॉब्स’ पोर्टल (Mahajobs Portal) चालविण्यात येते. यामध्ये नोकऱ्यांसदर्भात अपडेट येत असतात. यातील तुमच्या शिक्षण आणि अनुभवानुसार असलेली नोकरी तुम्ही निवडू शकता. यासाठी सर्वात आधी तुम्हाला ‘महाजॉब्स’ पोर्टलवर स्वत:ला रजिस्टर करणे गरजेचे आहे.

राज्यातील भूमीपुत्रांना नोकरी उपलब्ध करुन देणे हा ‘महाजॉब्स’ पोर्टलचा हेतू आहे. या माध्यमातून औद्द्योगिक क्षेत्रातील कंपन्यांना लागणार कुशल/ अकुशल कामगारांना संधी मिळते. यासाठी नोंदणी आवश्यक आहे. ‘महाजॉब्स’ पोर्टलची थेट लिंक बातमीखाली देण्यात आली आहे. त्यावर जाऊन तुम्ही स्वत:ला रजिस्टर करुन नोकरी मिळवू शकता.

महाराष्ट्र सरकारच्या‘महाजॉब्स’पोर्टलवर नोंदणी:
* प्रथम अधिकृत वेबसाईट http://mahajobs.maharashtra.gov.in वर जावे
* लिंक ओपन झाल्यावर प्रथम तुम्हाला स्वत:चे नाव टाकायचे आहे. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. महाराष्ट्राचे नागरिक असलेल्यांना नोकरीत प्राधान्य मिळेल.
* तिसऱ्या कॉलममध्ये तुमचा मोबाईल क्रमांक टाका.
* यानंतर तुम्हाल ओटीपी येईल.
* मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून पडताळणी करा. तसेच ईमेल आयडीद्वारे देखील ओटीपी मिळवून नोंदणी करा. तुम्ही दिलेल्या ईमेल आयडीवर पुढील माहिती मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही वापरत असलेला ईमेल आयडी टाका.
* यानंतर तुम्हाला पासवर्ड विचारला जाईल.
* हा पासवर्ड काळजीपूर्वक टाइप करा. कॅपच्या (captcha) व्यवस्थित टाईप करून सबमिट करा. पासवर्ड टाईप करताना त्यात किमान ८ कॅरेक्टर्स असावेत, तसेच पासवर्डमध्ये किमान १ कॅपिटल अक्षर+१ लोअरकेस अक्षर , १ नंबर आणि १ स्पेशल कॅरेक्टर्स असणे आवश्यक आहे.
* यानंतर तुम्हाला शैक्षणिक आणि तुमच्या कौशल्यासंदर्भात माहिती भरणे आवश्यक आहे. ही माहिती भरल्यावर ‘Registration done successfully’ असा मेसेज येईल. आणि तूमची नोंदणी पूर्ण झाली असेल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Mahajob portal of Maharashtra government online registration in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Job Alert(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x