TCS Infosys Wipro HCL Recruitment 2021 | या IT कंपन्यांमध्ये १ लाखाहून अधिक फ्रेशर्सना नोकरीची संधी
मुंबई, 27 ऑक्टोबर | मागील वर्षांत माहिती तंत्रज्ञान (IT) क्षेत्रातील नोकर भरतीने मोठा उच्चांक गाठला आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), इन्फोसिस, विप्रो आणि एचसीएल टेक्नॉलॉजीज या चार प्रमुख कंपन्यांनी विविध क्षेत्रांतील वाढत्या मागणी आणि गगनाला भिडणाऱ्या अॅट्रिशन रेटमध्ये एक लाखाहून अधिक फ्रेशर्सची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील चार मोठ्या आयटी कंपन्या या आर्थिक वर्षात एकत्रितपणे सुमारे 1,20,000 कर्मचार्यांची नियुक्ती करण्याची योजना आखत आहेत, कंपन्यांनी त्यांच्या तिमाही महसुलातील नवीन आकडेवारीनंतर हा निर्णय घेतला आहे. परिणामी अनेक सुशिक्षित तरुणांना या बलाढ्य कंपन्यांमध्ये नोकरीची संधी (TCS Infosys Wipro HCL Recruitment 2021) मिळणार आहे.
TCS Infosys Wipro HCL Recruitment 2021. Hiring in the Information Technology (IT) sector has surged all-time high in the recent years. Four major service providers, namely Tata Consultancy Services (TCS), Infosys, Wipro and HCL Technologies are set to recruit more than one lakh freshers. The four big IT companies in the country plan to hire around 1,20,000 employees combined in this fiscal year :
यापूर्वीच टीसीएस, विप्रो, एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि इन्फोसिसने त्यांच्या नोकरभरतीचे आकडे वाढवले आहेत आणि आर्थिक वर्ष 22 च्या दुसऱ्या तिमाहीत 50,000 हून अधिक तरुणांना संधी दिली आहे. आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत हायरिंगची संख्या एक लाख (1,02,517) पेक्षा जास्त वाढविण्यात आली आहे. या चार कंपन्यांमध्ये भारतातील एकूण कर्मचाऱ्यांच्या एक चतुर्थांशपेक्षा जास्त लोक काम करतात.
आता IT कंपन्यांच्या अॅट्रिशन रेटमध्ये झपाट्याने वाढ होत आहे, ज्यामुळे त्यांना गरजेपेक्षा जास्त कर्मचारी नियुक्त करावे लागले आहेत. मोठ्या नवीन क्लाईंट कॉन्ट्रॅक्ट मिळणं आणि मजबूत तिमाही निकालांमुळे नवीन पदवीधरांना नियुक्त करण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी IT कंपन्या चांगल्याच तयारीला लागल्या आहेत.
टीसीएसनये गेल्या सहा महिन्यांत 43,000 नवीन पदवीधरांची भरती केली तरी त्यांना अजून भरती करण्याची गरज असून कंपनी त्यासाठी सज्ज झाली आहे. याबद्दल टीसीएसचे मुख्य एचआर हेड मिलिंद लक्कड यांनी सविस्तर माहीती दिली होती. काही दिवसात जलदगतीने आणखी 35,000 नवीन पदवीधरांना नोकरी देण्याची योजना तयार असल्याचं कंपनीच्या एचआर टीमने म्हटले आहे. अशा प्रकारे एकूण आर्थिक वर्षात TCS 78,000 नोकरदारांची नियुक्ती करणार असल्याचे कंपनीने जाहीर केले. TCS चा अॅट्रिशन रेट 11.9 टक्के नोंदवला गेला, जो गेल्या तिमाहीत 8.6 टक्क्यांवरून वाढला आहे. पुढील दोन ते तीन तिमाहीत हा ट्रेंड कायम राहण्याची अपेक्षा असल्याचे व्यवस्थापनाने म्हटले आहे.
दरम्यान, एचसीएल टेक्नॉलॉजीज, या वर्षी कॉलेज कॅम्पसमधून सुमारे 20,000-22,000 नवीन पदवीधरांना रोजगार देण्याची योजना आखत आहे. पुढील वर्षी 30,000 फ्रेशर्सना ऑनबोर्ड करण्याचा विचार आहे, असे व्यवस्थापनाने सांगितले. त्यामुळे TCS, एचसीएल, Wipro आणि इन्फोसिस अशा बड्या कंपन्यांमध्ये तरुणांना मोठी संधी मिळणार असून त्यांनी त्यासाठी सज्ज राहणं आवश्यक आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: TCS Infosys Wipro HCL Recruitment 2021 for 1 Lakh freshers free job alert.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL