22 January 2025 9:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Income Tax Regime | खुशखबर, 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना गिफ्ट, 1 रुपयाचाही टॅक्स भरावा लागणार नाही EPF Pension Money | खाजगी नोकरदारांना EPFO कडून इतकी महिना पेन्शन मिळणार, रक्कम फॉर्म्युला जाणून घ्या Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
x

NEET 2020 Exam | नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून उत्तरतालिका जाहीर

NEET Exam 2020, Answer Key, NTANEET website, JEE Exam 2020

नवी दिल्ली, 26 सप्टेंबर : देशभरात करोना प्रादुर्भावाच्या काळात योग्य त्या आरोग्यविषयक खबरदारीसह नीट परीक्षा १३ सप्टेंबर रोजी पार पडली. शनिवारी २६ सप्टेंबर रोजी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नीट परीक्षेची उत्तर तालिका (NEET Answer Key 2020) जारी केली.

ज्या उमेदवारांनी नीट २०२० परीक्षा दिली, त्या उमेदवारांनी नीट २०२० ची उत्तरतालिका पडताळून पाहता येईल. ही उत्तरतालिका नीटच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. ntaneet.nic.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही नीट २०२० ची उत्तरतालिका पाहू शकाल. याशिवाय या वृत्ताच्या अखेरीस दिलेल्या थेट लिंकवरूनही विद्यार्थी उत्तरतालिका पाहू शकतील.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सर्व सेट्ससाठी (E1-E6, F1-F6, G1-G6, H1-H6) उत्तरतालिका जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी या आन्सर की नुसार स्वत:च्या गुणांची पडताळणी करावी. अंतिम उत्तरतालिका लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. NEET Answer Key बाबत जर कोणाला काही आक्षेप असतील तर ते नोंदवण्याबाबतची सविस्तर सूचना नंतर जारी केली जाईल. मात्र, सध्या कोणत्याही प्रकारचे मेल विद्यार्थ्यांनी करू नये, हरकतींविषयीची स्वतंत्र सूचना करणयात येईल, असे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने कळवले आहे.

सुमारे १५ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. देशभरात ३,९०० पेक्षा अधिक परीक्षा केंद्रांवर ही तीन तासांची पेन-पेपर परीक्षा दिली गेली. कोविड – १९ च्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक खबरदारीचे सर्व उपाय योजण्यात आले होते.

 

News English Summary: NEET 2020 Answer Key – NEET 2020 Answer Sheet has been released on September 26, 2020 by Allen For Code For E1- E6, F1-F6, G1-G6, H1-H6 by the Conducting authority of the National Testing Agency, candidates can check the Answer Key in two phases by end of September or early October. Students can download the NEET 2020 Answer Key for all the sets from this page. Using NEET 2020 Answer Key, candidates can calculate the probable score by adding four marks for the correct answer and deducting one mark for an incorrect answer. Detailed Information regarding NEET 2020 Answer Key read this article below. NEET Exam 2020 Answer Key

News English Title: NEET Exam 2020 answer key released by NTA on NTANEET website Marathi News LIVE latest Updates.

हॅशटॅग्स

#NEET EXAM 2020(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x