Netflix Updates | भारतात ‘इतक्या’ दिवसांसाठी मोफत कन्टेंट पाहता येणार
नवी दिल्ली, २० नोव्हेंबर: सध्या अनेक जण टीव्ही, थिएटर्सपेक्षा ओटीटी प्लॅटफॉर्म्सना अधिक पसंती देताना दिसत आहेत. यासाठीच काही कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी नवनव्या ऑफर्स घेऊन येत आहेत. सध्या लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सनंही (Popular OTT platform Netflix) एक मोठी घोषणा केली आहे.
नेटफ्लिक्सनं भारतात दोन दिवसांसाठी मोफत सबस्क्रिप्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. Netflix StreamFest अंतर्गत युझर्सनाही ही मोफत सेवा देण्यात येणार आहे. नेटफ्लिक्च्या या फेस्टदरम्यान युझर्सना कोणत्याही प्रकारचे प्रिमिअम कंटेट पाहता येणार आहे. तसंच यासाठी त्यांना पैसैही मोजावे लागणार नाहीत. परंतु यासाठी युझर्सना ईमेल आयडी अथवा मोबाईल क्रमांकाद्वारे साईन इन करावं लागणार आहे.
प्रिमिअम युझर्सना ज्या कंटेटचा अॅक्सेस दिला जातो तो सर्व कंटेट युझर्सना या दोन दिवसांत मोफत पाहता येणार असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. दरम्यान, साईन अप केल्यानंतर आपल्या क्रेडिट अथवा डेबिट कार्डाची माहितीही द्यावी लागणार नाही.
Netflix StreamFest अंतर्गत मोफत कंटेट पाहण्यासाठी Netflix.com/StreamFest वर भेट देता येईल किंवा अॅप डाऊनलोड करूनही याचा लाभ घेता येईल. याव्यतिरिक्त Netflix.com/StreamFest जाऊन युझर्सना रिमांईडरही सेट करता येणार आहे. परंतु यासाठी कंपनीनं एक अट घातली आहे. यादरम्यान मोफत सेवेचा लाभ घेणाऱ्या युझर्सना एचडी ऐवजी केवळ स्टँडर्ड डेफिनेशन कंटेंटच पाहायला मिळेल.
तर दुसरीकडे नेटफ्लिक्स स्मार्टफोन, टीव्ही, गेमिंग कन्सोलमध्येही पाहता येणार असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. याव्यतिरिक्त नेटफ्लिक्स टीव्हीलाही कास्ट करता येईल. नेटफ्लिक्स ५ डिसेंबर रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून ते ६ डिसेंबर ११.५९ पर्यंत मोफत पाहता येणार आहे. स्ट्रीम फेस्टदरम्यान युझर्सची संख्या मर्यादित केली जाणार आहे. जर यादरम्यान तुम्हाला StreamFest is at capacity हा मेसेज दिसला तर तुम्ही कधी नेटफ्लिक्स पाहू शकाल हे तुम्हाला सांगितलं जाईल.
दरम्यान, ओटीटी प्लेटफॉर्म नेटफ्लिक्सवर Netflix मेंबरशिप नसल्यासही आता कंपनीकडून नेटफ्लिक्सचे काही शो आणि मूव्हीज प्रेक्षकांना मोफतमध्ये पाहता येणार आहेत. नेटफ्लिक्सने यासंदर्भात एक यादी जाहीर केली आहे, जी भारतासह संपूर्ण जगात विनामूल्य उपलब्ध होणार आहे.
यूजर्सला netflix.com/in/watch-freeवर, यादीतील विनामूल्य शो किंवा मूव्ही पाहता येणार आहे. Netflixने दिलेल्या माहितीनुसार, यूजर्स कंम्प्यूटर आणि अँन्ड्ऱॉईड डिव्हाईसचा उपयोग करुन Netflixच्या ओरिजनल मूव्हीज, टीव्ही शो ऑनलाईन पाहू शकतील.
स्ट्रेंजर थिंग्स (Stranger Things), मर्डर मिस्ट्री (Murder Mystery), एलिट (Élite), बॉस बेबीः बॅक इन बिजनेस (Boss Baby: Back in Business), बर्ड बॉक्स (Bird Box), व्हेन दे सी अस (When They See Us), लव इज ब्लाइंड (Love Is Blind), द टू पोप्स (The Two Popes), अवर प्लेनेट (Our Planet) आणि ग्रीक अँड फ्रेन्की (Grace and Frankie) यांसारखे शो यूजर्सला फ्रीमध्ये पाहता येणार आहेत.
ओटीटी कंपनीकडून ही ऑफर पहिल्यांदाच आली नसून, गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यातही कंपनीने आपल्या काही ओरिजनल्सचे, पहिले एपिसोड भारतात विनामूल्य वापरण्याचा ऍक्सेस दिला होता. त्याशिवाय नेटफ्लिक्सकडून आपले काही शोज YouTubeवरही फ्रीमध्ये उपलब्ध केले जातात.
News English Summary: Currently, many people seem to prefer OTT platforms over TVs and theaters. That’s why some companies are coming up with new offers for their customers. Currently popular OTT platform Netflix has also made a big announcement. Netflix has decided to offer a free two-day subscription in India. This free service will also be offered to users under Netflix StreamFest. During this fest of Netflix, users will be able to watch any type of premium content. Also, they will not have to pay for it. But for this, users have to sign in with email id or mobile number.
News English Title: Netflix free weekend access in December access to premium content India News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार