22 December 2024 7:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, कंपनीबाबत अपडेट, मोठी कमाई होईल - Vikas Lifecare Share Price Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: TATAMOTORS
x

जनतेचं सरकार असल्याचं सांगणाऱ्या शिंदे सरकारच्या जनतेला दिवाळीत टोप्या, 'आनंदाचा शिधा' पाकिटातून गोड तेलाचा पुडा गायब

Anandacha Shidha

Anandacha Shidha | दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्य गरिब जनतेला दिलासा मिळावा यासाठी मोठा गाजावाजा करत शिंदे सरकारने आनंदाचा शिधा वितरण सुरू केले आहे. पण गोंधळ उघड झाल्यावर हा आनंदाचा शिधा ऑफलाईन पद्धतीने वितरण करण्यात येणार असल्याची घोषणा झाली.

महाराष्ट्रातील प्राधान्य कुटूंब व अंत्योदय अन्न योजनेतील पात्र सुमारे १ कोटी ६२ लाख शिधावाटप पत्रिका लाभार्थींमधील सुमारे ७ कोटी नागरिकांना दिवाळीनिमित्त वाटप करण्यात येणा-या आनंदाचा शिधा या शिधासंचाचे वितरण कालपासून ऑफलाईन पद्धतीने करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे १ किलो साखर, १ किलो रवा, १ किलो चणाडाळ व १ लिटर पामतेल या चार वस्तू लवकरात लवकर मिळू शकतील अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी व पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली होती. मात्र शिंदे सरकारचा भोंगळ कारभार उघड झाल्याने आता भर दिवाळीत लोकांचा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळतंय.

प्रथम फोटो मार्केटिंगवर भर :
प्रथम ‘आनंदाचा शिधा’च्या पिशव्यांवर स्टिकर लावण्याचे काम सुरु असल्याने वाटपास उशीर झाल्याचा आरोप झाला. त्यातच आता ‘आनंदाचा शिधा’ पाकिटातून तेल गायब झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात आज दिवाळीच्या दिवशी देखील आनंदाचा शिधा वाटप केला जातोय. परंतु पॅकेटमध्ये केवळ ३ वस्तू दिल्या जात आहे. सद्या अनेक ठिकाणी रवा,साखर आणि चना डाळ या पाकिटातून दिल्या जात असून, गोड तेलाचा पुडा मात्र गायब आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड, पैठण तालुक्यासह इतर ठिकाणी देखील तेल मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे रेशन दुकानदारांना डाळ रवा आणि साखरच द्यावी लागते, यासाठी 75 रुपये आकारले जात आहेत. त्यामुळे आता नागरिकांना अंदाजे 125 रुपये पेक्षा अधिक पैसे देऊन बाजारातून तले विकत घ्यावे लागणार आहे. यामुळे नागरिकांना आनंदाची शिधा 200 रुपयांना पडत आहे. आता शिंदे-फडणवीस सरकारची ‘आनंदाचा शिधा’ 100 एवेजी 200 रुपयांना पडत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Anandacha Shidha Packets missing oil at Aurangabad check details 24 October 2022.

हॅशटॅग्स

#Anandacha Shidha(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x