15 November 2024 4:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

अंधेरी पूर्व पोटनिवडणुक, सर्व ठरवून चाललंय, राज ठाकरेंना पुढे करून भाजप-शिंदे गटाची नवी चाल? प्रकरण स्क्रिप्टेड असल्याचं दिसतंय

Murji Patel

Andheri East By Poll Election | शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर ही पहिली निवडणूक होतेय. ठाकरे आणि शिंदेगटासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती त्यांनी या पत्राच्या माध्यमातून केली आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात होण्यापूर्वीच रंगत आलीये. अंधेरी पोटनिवडणुकीबद्दल आतापर्यंत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी कोणतंही भाष्य केलेलं नव्हतं. मात्र, आज राज ठाकरे यांनी पत्रातून त्यांची भूमिका मांडलीये. विशेष बाब म्हणजे राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमदेवार ऋतुजा लटके यांना पाठिंबा जाहीर केलाय.

मात्र यामागील एकूण घडामोडी समजून घेतल्यास सर्वकाही शिस्तबद्ध घडवलं जातंय हे समोर येईल. मुळात उमेदवारी अर्ज सादर करण्यापूर्वी राज ठाकरेंना ही राजकीय सुबुद्धी सुचली नाही, परंतु काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकांतात चर्चा करून त्याला पुणे महानगपालिकेतील कामाचं कारण देत बगल दिली. त्यानंतर आज सकाळी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार (मुरजी पटेल हे भाजप पेक्षा आशिष शेलार यांचे उमेदवार आहेत) राज ठाकरेंना भेटले आणि त्यालाही वयक्तिक कारण देत बगल दिली गेली.

मुख्यमंत्री शिंदे, आशिष शेलार आणि राज ठाकरेंच्या बैठकीतील मूळ हेतू
सध्या उद्धव ठाकरेंप्रती भावनिक सहानुभूतीची लाट आहे. त्यामुळे भाजप उमेदवाराचा पराभव जवळपास निश्चित आहे. परिणामी त्याचा थेट भाजपबद्दल आणि शिंदे गटाबद्दल नकारात्मक संदेश जाणार आणि इथला मराठी सहित बहुभाषिक मतदार उद्धव ठाकरेंसोबत असल्याचा संदेश मुंबई आणि राज्यभर जाणार. मग उद्धव ठाकरेंसोबत असलेली ‘भावनिक सहानुभूती’ कशी थोपवायची यावर राज ठाकरे, शिंदे आणि भाजपमध्ये चर्चा झाली. त्यातून अंधेरी पूर्वेतील पोटनिवडणुकीतील उमेदवारी मागे घेतल्यास भाजप आणि शिंदे गटाला मुद्दा मिळेल आणि आम्ही सुद्धा भावनिक विचार केला असा संदेश देण्याचा निष्कर्ष काढण्यात आला. पण, आता पुढाकार घ्यायचा कसा असा प्रश्न आला तेव्हा, शिंदे गटाने आणि भाजपने तर ऋतुजा लटकेंना अप्रत्यक्षरीत्या राजीनाम्यापासून अडकवून ठेवलं आणि उमेदवारीसाठी विषय ताणून धरला होता, म्हणून राज ठाकरेंनी असं पत्र देवेंद्र फडणवीसांना द्यायचं आणि ते भाजप-शिंदे गटाने विचार करण्याचं मान्य करून मान्य करून आम्ही माणुसकी दाखवली असं चित्र उभं करायचं, असा हा खेळ होता. पण आपण शिवसेना उमेदवाराच्या विरोधात भाजपाला समर्थन केल्याचा संदेश जाऊ नये म्हणून निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या क्षणी राज ठाकरे यांनी स्वतःच्या बाजूने हे राजकीय पत्ते टाकल्याचं म्हटलं जातंय

विषय कोर्टातही जाणार आहे
तसेच अंधेरी पूर्व जागा शिवसेनेने जिंकल्यास मुंबई महानगरपालिकेत भाजप, शिंदे गट आणि मनसेची राजकीय कोंडी होणार आहे. त्यात शिवसेना आता मुरजी पटेल यांच्या विरोधात कोर्टात जाणार आहे आणि त्यांच्या विरोधात हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टासबधित कागदपत्र असल्याने भाजप-शिंदे गटाची मोठी गोची झाली आहे असं खात्रीलायक वृत्त आहे. त्यानंतर निवडणूक अर्ज मागे घेण्याची तारीख जवळ असल्याने काल अचानक राजकीय धावपळ झाली आणि शिंदे-राज ठाकरेंची भेट झाली. त्यानंतर शेलार यांनी राज ठाकरेंची भेट होऊन एक निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलं आहे. त्यामुळे राज ठाकरे पुन्हा राजकीय दृष्ट्या वापरले जातं आहेत किंवा ते स्वतःचा राजकीय वापर करू देतं आहेत असाच अंदाज व्यक्त होतो आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Andheri East By Poll Election updates over Shinde Group BJP meeting with Raj Thackeray check details 16 October 2022.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x