15 November 2024 4:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

कृषीमंत्री रस्त्यावरून जातात पण गावात आणि शेतात येत नाहीत, सरकारने वाऱ्यावर सोडलं, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे कृषि मंत्र्यांवर आरोप

Abdul Sattar

Minister Abdul Sattar | परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. शिवसेनेतील बंडाळीनंतर उद्धव ठाकरे मुंबई बाहेरच्या दौऱ्यावर असून, त्यांच्या दौऱ्यापूर्वी घडलेल्या एका घटनेची सध्या प्रचंड चर्चा होतेय, ती म्हणजे राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी घेतलेली शेतकरी कुटुंबाची भेट. आता या भेटीचा संबंध थेट उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याशी लावला जातोय.

उद्धव ठाकरे औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले आहेत. या दौऱ्यात उद्धव ठाकरे व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आलेल्या ऋषिकेश ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या घरी जाणार असं समजते. दरम्यान, सध्या दुष्काळग्रस शिंदे सरकारमधील मंत्र्यांवर प्रचंड संतापल्याचे पाहायला मिळते आहे.

स्थानिक शेतकरी म्हणतात, आमच्या शेतात पाणी घुसलं, आख्ख पीक वाहून गेलं. मका, सोयाबीन पाण्यात गेले आहेत. अधिकारी लोकं तिथं गेल्यानंतर धुळकावून लावतात. मोसंबीची झाडं लावली. त्याला दोन महिने झाले. तहसील कार्यालयातले लोकं उडवाउडवीची उत्तरं देतात. मग शेतकऱ्यांनी काय करायचं. पुलावरून उडी खायची की काय करायचं. कर्मचारी उडवाउडवीची उत्तरं देतात. त्यामुळं त्यांना पगार कशाचा देता, असा सवाल शेतकऱ्यानं केला.

परतीच्या पावसानं पार वाट लावली आहे. हातातोंडाशी असलेला घास हिरावून नेला. घोषणा झाल्या पण, शेतकऱ्याच्या खांदावर अजून एक रुपयासुद्धा आला नाही. शेतकऱ्याच्या घरात गोडधोड करायला एक रुपयासुद्धा शिल्लक राहिला नाही. पाऊस असा झाला की, घरं राहिली नाही. पिकं राहिली नाही. किट अजून पोहचली नाही. दिवाळी नाही, आज दुष्काळ आहे. सरकार किती देतं त्यावर अवलंबून आहे. अजूनपर्यंत कोण्या अधिकाऱ्यानं येऊन पाहिलं नाही. ना कुठला अधिकारी आला, ना कुठले लोकप्रतिनिधी आले. कृषीमंत्री रस्त्यावरून जातात पण गावात आणि शेतात येत नाहीत. कृषिमंत्री अब्दुल सत्तार आमच्या जिल्ह्याचे असून आम्हाला आधार कुणाचाच नाही. आम्हाला या सरकारने वाऱ्यावर सोडलं, असल्याचा संतापही शेतकऱ्यांनी व्यक्त केला. कृषिमंत्री बाहेर असतात. त्यांना भेटायची परवानगी मिळत नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Aurangabad draught affected Farmers allegations on state agriculture minister Abdul Sattar check details 23 October 2022.

हॅशटॅग्स

#Abdul Sattar(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x