16 April 2025 6:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA Suzlon Share Price | 54 रुपयांचा शेअर पुढे किती फायद्याचा? गुंतवणूकदारांसाठी अपडेट, फायदा की नुकसान? - NSE: SUZLON Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
x

उचल प्रोजेक्ट टाक गुजरातला, साल्यांनो ती बुधवार पेठ गुजरातला देऊन टाका आणि साड्या घालून फिरा, बाबाराजे भाजपवर संतापले

Babaraje Deshmukh

Shivbhakt Babaraje Deshmukh | साताऱ्याचे शिवभक्त बाबाराजे देशमुख यांनी यापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल केला होता. त्यामध्ये त्यांनी शिवसेना आमदार जाधव यांची प्रशंसा केली होती. शिंदे-फडणवीस सरकारने जरी आमदार जाधव यांची सुरक्षा काढून घेतली असली तरी राज्यात माझ्या संघटनेचे एक लाख सदस्य आहेत. ते सर्वजण आमदार जाधव यांना सुरक्षा देतील, अशी ग्वाही दिली होती.

काही दिवसांपूर्वी दिवाळीच्या निमित्ताने आमदार भास्कर जाधव चिपळूणला होते. या वेळी शिवभक्त बाबाराजे देशमुख यांनी चिपळूणला येऊन त्यांची भेट घेतली होती. तुम्ही बिनधास्तपणे महाराष्ट्रात फिरा आणि राज्यभर तुमच्या भाषणांचा सुरू असलेला धडाका असाच चालू राहू द्या, संरक्षणाची चिंता करू नका. जिथे जाल तिथे तुमच्या संरक्षणाची जबाबदारी आम्ही घेऊ”, असा शब्द देशमुख यांनी जाधव यांना दिला होता.

राज्यातील उद्योग राज्याबाहेर, बाबाराजे देशमुख संतापले :
एअरबस टाटाचा प्रकल्प गुजरातला गेल्याच्या आरोप-प्रत्यारोपांवरुन सध्या महाराष्ट्रातील वातावरण तापलं आहे. अशातच सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोपांना उत्तर दिली. वेदांता फॉक्सकॉन, एअरबस टाटा आणि इतर प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळात बाहेर गेल्याचा आरोप त्यांनी काही कागदपत्र दाखवत केला. यावर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी त्वरित पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलं.

आदित्य ठाकरे म्हणाले म्हणाले, ही बातमी जर देवेंद्र फडणवीस यांनी वाचली असती तर त्यांना लक्षात आलं असतं की देसाई काय म्हणत आहेत? २०१६ ला जो मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रम झाला त्यात यासंबंधीची बोलणी झाली होती. त्यावेळी फॉक्सकॉनचा हा MoU साईन झाला होता.

पण देवेंद्र फडणवीस यांनी आणलेला प्रस्ताव हा तामिळनाडूत गेला आहे. फॉक्सकॉन आणि वेदांता फॉक्सकॉन या दोन प्रकल्पांमध्ये जमीन आस्मानाचा फरक आहे. वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प सेमी कंडक्टर चीप साठी होता. मोबाईल फोनसाठी नव्हता. माझी उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की कृपया महाराष्ट्राची दिशाभूल करू नका. फॉक्सकॉन कंपनी MoU साईन करून बसली पण त्यांनी ती जागा घेतलीच नाही.

बाबाराजे भाजपवर संतापले :
दरम्यान, राज्यातील अनेक उद्योग गुजरातला फिरवले जातं असल्याने बाबाराजे देशमुख प्रचंड संतापल्याच पाहायला मिळतंय. उचल प्रोजेक्ट टाक गुजरातला, साल्यांनो ती बुधवार पेठ गुजरातला देऊन टाका आणि साड्या घालून फिरा, असं म्हणत बाबाराजे देशमुख हे भाजपवर प्रचंड संतापले आहेत असं पाहायला मिळतंय. यावर त्यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली आहे. तसेच राज्यातील तरुणांना पेटून उठण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलं आहे.

काय आहे तो व्हिडिओ :

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Babaraje Deshmukh attacked on BJP over moving projects from Maharashtra to Gujarat check details 01 November 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Babaraje Deshmukh(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या