22 December 2024 6:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

Bharat Jodo Yatra | राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला सर्वच राज्यांमध्ये प्रचंड पाठिंबा, उद्या तेलंगणा प्रवेश

Bharat Jodo Yatra

Bharat Jodo Yatra | काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला दक्षिण भारतात प्रचंड पाठिंबा मिळत आहे. शनिवारी कर्नाटकातील रायचूर येथील येरागेरा गावातून यात्रेला पुन्हा सुरुवात झाली. आंध्र प्रदेशातून शुक्रवारी सायंकाळी पुन्हा कर्नाटकात दाखल झाले. २३ ऑक्टोबरला ही यात्रा तेलंगणमध्ये प्रवेश करणार आहे. सर्वच राज्यांमध्ये राहुल गांधींना भेटण्यासाठी तरुण, तरुणी, वृद्ध ते लहान मुलांची तुफान गर्दी होताना दिसत आहे. विशेष म्हणजे गोदी मीडियाला सुद्धा दाखल घेणं भाग पडलं आहे तर भाजपचा आयटी सेल सुद्धा हतबल झाल्याचं पाहायला मिळतंय. प्रत्येक विषय भाजपवर उलटत असल्याने भाजपमध्ये चिंता वाढली आहे. देशात बेरोजगारी आणि महागाईचा गडद होऊ लागल्याने भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये धार्मिक विषयांना बळ देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कन्याकुमारी ते काश्मीर अशी काँग्रेसची भारत जोडो यात्रा ७ सप्टेंबरपासून सुरू झाली. ती एकूण ३५७० किलोमीटर धावेल. आतापर्यंत राहुल गांधी यांनी 1215 किमीचा प्रवास पूर्ण केला आहे. हे आणखी २३५५ किमी अंतर कापेल. त्यांनी पूर्ण केलेल्या प्रवासात तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. आज प्रवासाचा ४५ वा दिवस आहे. तीन दिवस आंध्र प्रदेशचा दौरा केल्यानंतर शुक्रवारी ही यात्रा पुन्हा कर्नाटकात दाखल झाली. रायचूरमध्ये पादचारी रात्रभर थांबले होते.

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि पवार स्वागत करणार
काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही यात्रा तेलंगणामार्गे महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. इथे शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राहुल यांचं स्वागत करून यात्रेचा मंच शेअर करणार आहेत. आंध्र प्रदेशात या यात्रेला मोठा पाठिंबा मिळाला. यात्रेदरम्यान राहुल गांधी यांना भेटण्यासाठी मोठ्या संख्येने मजूर आणि शेतकरी हजर राहतील असे वृत्त आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Bharat Jodo Yatra getting great response check details 22 October 2022.

हॅशटॅग्स

Bharat Jodo Yatra(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x