22 November 2024 6:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांमध्ये वाद टोकाला, शिफारशींना गृहमंत्र्यांकडून केराची टोपली

CM Eknath Shinde

CM Eknath Shinde Vs Devendra Fadnavis | मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये मतभेद झाल्याचे वृत्त समोर आले आहे. पोलिसांच्या व अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून मतभेद झाल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस दिल्लीत महत्त्वाच्या बैठकीसाठी गेले आहेत. अंधेरी पोटनिवडणुकीतील माघार व कार्यकर्त्यांनी दाखवलेली नाराजी हासुद्धा विषय असु शकतो असे जाणकार व्यक्त करत आहेत. राज्यात अलीकडे सनदी अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल झाल्या असल्या तरी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना अजूनही मुहूर्त मिळालेला नाही. यावरून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे.

शिंदे समर्थक आमदारांनी सुचवलेल्या नावांना केराची टोपली:
आमदारांनी सुचवलेले नावे आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या यादीत तफावत असल्यामुळे वाद सुरु झाला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एका व्यासपीठावर सुद्धा दिसत नाहीय, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. निवडणूक प्रचार, शहरातील, तसेच जिल्ह्यातील महत्त्वाचे निर्णय पोलिसांच्या हातात असल्याने आपल्या मर्जीतील अधिकारी नेमण्यावरुन शिंदे-फडणवीस यांच्यामध्ये नाराजी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिले आहे. दरम्यान, शिंदे समर्थक आमदारांच्या बदल्यांच्या शिफारशींना फडणवीस जुमानत नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतापून साताऱ्याला निघून गेल्याच वृत्त आहे.

रविवारी एकत्र येणे सुद्धा टाळले :
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांमध्ये नाराजगी असल्याने त्यांनी रविवारी एकत्र येणे सुद्धा टाळले होते. रविवारी सकाळी राजभवन येथे स्टार्टअप यात्रांमधील विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्याचा तर ठाण्यात श्रीमद् भागवत कथा ज्ञान महायज्ञाचा व सायंकाळी ठाण्यातच ऑल इंडिया बंजारा सेवा संघ आयोजित भव्य सत्कार समारंभ असे मुख्यमंत्र्यांचे व उपमुख्यमंत्र्यांचे एकत्र तीन कार्यक्रम होते. मात्र या तिन्ही कार्यक्रमांपैकी एकाही कार्यक्रमाला हे दोघे एकमेकांसमोर आले नाहीत. बंजारा सेवा संघाच्या तिसऱ्या कार्यक्रमाला दोघांनी हजेरी लावली मात्र वेगवेगळी.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांत शनिवारी १५ ऑक्टोबर रोजी वर्षा या शासकीय निवासस्थानी बैठक झाली. या वेळी विविध विषयांसह पोलिसांच्या आणि इतर अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर चर्चा झाली. राज्यात शिंदे – फडणवीस सरकार आले त्यालाही आता शंभर दिवस उलटून गेले. मात्र बदल्यांचा विषय अजून मार्गी लागलेला नाही आहे. यावरून उपमुख्यमंत्री फडवणीस यांनी नाराजी व्यक्त केली. ते स्वतः गृहमंत्री असल्याने त्यांच्याकडे याबाबत वारंवार विचारणा होत आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री हे अनेकदा कार्यक्रमाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचत नाहीत त्याबद्दल सुद्धा फडवणीस यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते. हम साथ साथ है, म्हणणारे अल्पावधीतच दूर जातात की काय? अशी शंका निर्माण झाल्याची चर्चा विरोधकांत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Clashes between CM Eknath Shinde and DCM Devendra Fadnvis check details 18 October 2022.

हॅशटॅग्स

#CM Eknath Shinde(90)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x