15 January 2025 1:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN
x

नुकसानग्रस्त शेतकरी राहिला बाजूला, मुख्यमंत्री गणपती, दहीहंडी, दिवाळी भेटीनंतर स्वतःच्या शेतात मुक्कामी, विशेष फोटोसेशनही

CM Eknath Shinde

CM Eknath Shinde | राज्यातील भागात पावसात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. उभे पीक पाण्यात गेले असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. राज्यातील शेतकरी भीषण आर्थिक संकटात सापडला आहे. प्रशासनाने व विमा कंपन्यांनी तात्काळ दखल घेत झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घ्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. एका बाजूला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेत आहेत. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकसानग्रस्त शेतकरी सोडून स्वतःच्याच शेतात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पोहोचल्याच पाहायला मिळतंय.

महाराष्ट्रात गेल्या साडेतीन महिन्यांपूर्वी सत्तापालट झालं आणि राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले. गणपती, दहीहंडी आणि नवरात्रौत्सवात जिथे बघावं तिथे शिंदे कार्यक्रमात व्यस्त असल्याचं बघायला मिळालं. एकाबाजूला शेतकऱ्यांसाठी योग्य निर्णय घेत असल्याचं सांगितलं जातं असताना दुसऱ्या मदत शेतकऱ्यांकडे पोहोचत नसल्याच्या प्रचंड तक्रारी समोर आल्या आहेत. दिवाळीनिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वाटप योजना सुरु केली त्यातही अनेक गोष्टी गायब करताना त्या पॅकेट्सवर मोदींचा फोटो छापला गेला पण स्व. बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वगळण्यात आला होता. अय शिंदे त्यांच्या या सर्व बिझी शेड्यूलमधून वेळ काढत स्वत:च्या शेतीची मशागत करण्यासाठी वेळ काढला. तिथे त्यांनी आपल्या गुरांना चारा घातला. पिकांना पाणी दिलं. शेतीची पाहणी केली.

शिवारात फिरण्यासाठी इलेक्ट्रीक गाडी
मुख्यमंत्री एकनाथ शेती आज त्यांच्या स्वत:च्या साताऱ्यातील दरे गावात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी या शेतीबरोबर गोशाळा ही तयार केले आहे. गोशाळेतल्या गाईंना रसायनमुक्त असलेला चारा दिला जातो. याशिवाय मुख्यमंत्र्यांच्या शेततळ्यात मत्स्योत्पादनही केलं जातं. एकनाथ शिंदेंनी शेततळ्यात असलेल्या माशांना स्वत:च्या हाताने खाऊ घातले. संपूर्ण शिवारात फिरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इलेक्ट्रीक गाडीचा वापर केला. या गाडीचं स्टेअरिंग मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या हातात ठेवलं होतं.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: CM Eknath Shinde at Satara Farm check details 01 November 2022.

हॅशटॅग्स

#CM Eknath Shinde(90)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x