22 December 2024 6:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, कंपनीबाबत अपडेट, मोठी कमाई होईल - Vikas Lifecare Share Price Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: TATAMOTORS
x

फक्त हातवारे करत बोलण्यात चलाखी, शिंदेंच्या त्या व्हिडिओकडे दुर्लक्ष, अन 2021 मधली चिटकूळ दाखवत फडणवीसांची गोल-गोल मांडणी

DCM Devendra Fadnavis

DCM Devendra Fadnavis | इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर केंद्र सरकारने मंजूर केलं आहे. महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक्स हब करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. केंद्र सरकारने दिलेली ही भेटच आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. लवकरच मला अपेक्षा आहे की नवीन वर्षात महाराष्ट्राला केंद्र सरकार टेक्सटाईल पार्कही देणार आहे. त्यामुळे राज्यात टेक्सटाईल क्लस्टर तयार होणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. नवीन वर्षात त्यासंदर्भात याची घोषणा करण्यात येईल असंही फडणवीस यांनी सांगितलं.

एकीकडे महाराष्ट्रात आमचं सरकार येऊन तीनच महिने झाले आहे तरीही एक फेक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रय़त्न होतो आहे की महाराष्ट्रातून उद्योग चालले आहेत. यात काही राजकीय पक्ष, त्यांची इको सिस्टिम आणि दुर्दैवाने बोटावर मोजण्याइतके चार-पाच एचएमव्ही पत्रकार आहेत. एचएमव्ही म्हणजे हीज मास्टर व्हॉईस. या सगळ्यांनी मिळून महाराष्ट्राच्या बदनामीचा घाट घातला आहे.

अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या कारकीर्दित भ्रष्टाचार, गृहमंत्री जेलमध्ये, पोलीस आयुक्त जेलमध्ये इतके भयंकर कांड झाले की कुणीही राज्यात गुंतवणूक करायला तयार नव्हतं. महाराष्ट्रातली विस्कटलेली घडी जागेवर आणण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. महाराष्ट्रात २५ हजार कोटींच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावांना आम्ही मान्यता केली आहे. आज पुन्हा एकदा २५ हजार कोटींचे प्रस्ताव एका बैठकीत आमच्या सरकारने मंजूर केले आहेत असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

तेव्हा सुभाष देसाईंनीच सांगितलं होतं – फडणवीस
फॉक्सकॉन महाराष्ट्रात येणार नाही हे उद्धव ठाकरेंच्या काळात मंत्री असलेले सुभाष देसाईच सांगितले होते. जेव्हा हा प्रकल्प गेला तेव्हा अशी का भूमिका घेतली की प्रकल्प आमच्याच काळात गेला? पहिला फेक नेरेटिव्ह हाच तयार करण्यात आला. अनेक ठिकाणी त्यांनी स्टेटमेंट केलं आहे. यानंतर टाटा एअरबसवरून आम्हाला दोषी धरलं जातं आहे. २३ सप्टेंबर २०२१ ची बातमी आहे. यात गुजरातला प्रोजेक्ट जाणार असल्याचं म्हटलं आहे. एकाच पेपरचं नाही १४ फेब्रुवारी २०२२ ला उद्धव ठाकरेंचं सरकार होतं तेव्हा बिझनेस वर्ल्डनेही हीच बातमी दिली आहे. संडे एक्स्प्रेसनेही अशीच बातमी दिली आहे. आता यासंदर्भात आम्ही विरोधी पक्षात गेलो म्हणजे आपलं राज्य विसरत नाही.

२०२१ ची बातम्या दाखवत विषयावर गोलगोल चर्चा केली :
एकूण फडणवीसांनी दाखवलेल्या जुन्या प्रिंटमध्ये केवळ हेडलाईन दाखवत मूळ बातमीत काय लिहिलं आहे ते लपवून, विषय हातवारे करत गोलगोल फिरवत आहेत हे स्पष्ट दिसत आहे. मात्र, फडणवीसांनी जुन्या प्रिंट दाखवताना वेदांता आणि फॉक्सकॉनवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात जाहीरपणे ऑन रेकॉर्ड जनतेला सांगितलेलं की वेदांता आपल्याकडे येणार आहे. त्या व्हिडिओकडे कानाडोळा करत जुन्या बातम्यांच्या केवळ हेडलाईन दाखवत मूळ बातमी लपवली हे स्पष्ट झालं आहे, कारण पत्रकारांनी सुद्धा ती मूळ बातमी वाचली आणि फडणवीस धूळफेक करत आहेत हे स्पष्ट झालं.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: DCM Devendra Fadnavis Press Conference check details 31 October 2022.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x