22 November 2024 1:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

हे सामान्यांचं शिंदे सरकार प्रशासन?, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या शवविच्छेदनासाठी कुटुंबियांकडून फोन-पेवर दीड हजाराची लाच घेतली

CM Eknath Shinde

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, काल नंदुरबार दौऱ्यावर होते. काल सकाळी त्यांच्या हस्ते नंदुरबार नगरपालिकेच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी कृषीमंत्री अब्दुल सत्तार, दादा भुसे, गुलाबराव पाटील, डॉ. विजयकुमार गावित आणि शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचीही उपस्थिती होती. यानंतर छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरच्या आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थिती लावली होती.

या दरम्यान, व्यासपीठावर माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचं भाषणं सुरु होतं. त्यावेळी रघुवंशी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना नंदुरबार नगरपरिषदेच्या नुतन इमारतीसाठी शासनाकडून अद्याप बाकी असलेला 7 कोटी 28 लाख रुपयांचा निधी देण्याची मागणी केली. तसंच माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आठवण सांगितली. विलासराव देशमुख आलेले असताना त्यांनी एक कोटी रुपयांचा निधी 3 दिवसात मंजूर केला असे सांगितले.

त्यानंतर, चंद्रकांत रघुवंशी यांनी ही मागणी करताच लगेचच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात फोन फिरवला आणि करून तात्काळ आदेश काढण्यासाठी भुमिका घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन गेल्याने अधिकाऱ्यांनी 3 मिनिटात आदेश काढले. अशा पद्धतीने मंचावरुनच त्यांनी 7 कोटी 28 लाख रुपयांचा निधी मंजूर केला. एकाबाजूला शिंदे संधी मिळेल तिथे मोबाईलवर फोन करून लगेच कामं करत असल्याची वृत्तवाहिन्यांवर पेरणी करण्यासाठी राजकीय स्टंट करत असल्याचं मागील ३ महिने पाहायला मिळतंय. मात्र दुसरीकडे, सामान्य शेतकऱ्यांची कशी थट्टा लावली आहे त्याचा प्रत्यय आला आहे.

मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकरी आत्महत्याचे सत्र सुरु आहे. कारी येथील लक्ष्मण वाघे या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या कुटुंबाने पैसे नसल्याने दिवाळी साजरी केली नाही, हे सांगताना त्यांचे दुःख अनावर झाले. या शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्यांचे शवविच्छेदन करण्यासाठी पांगरी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे पोस्ट मार्टमचे काम करणारी व्यक्ती बगाडे याने 2,500 रुपयांची मागणी केली. पैसे नसल्याचं सांगितल्यानंतर बगाडे यानं 1,500 रुपये फोन पेवर स्वीकारले. पैसे दिल्याशिवाय पोस्ट मार्टम न केल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय.

मृत शेतकऱ्याच्या पत्नीने आणि मुलाने काय म्हटलं ?
काल माझ्या पतीनं जीवन संपविलं. प्रशासनाकडून अद्याप कुणी आले नाहीत. मृतक लक्ष्मण वाघे यांची पत्नी म्हणाली, बर वाटतं नव्हतं. रानातून घरी आले. लेकरू कर्जबाजारी झालं. सोयाबीन पेरलं ते पाण्यात गेलं. मृतकाचे मुलगा म्हणाला, सोयाबीन सध्या पाण्यात आहे. त्यामुळं तिथून काही उत्पन्न मिळेल, याची शास्वती नाही. दिवाळीला कुणाचीही मदत मिळाली नाही. राज्य सरकारकडून एक रुपयासुद्धा मिळाला नाही. असं म्हणून तो अक्षरशः रडायला लागली. त्याचे अश्रू अनावर झाले होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Farmer suicide due to lack of money paid 1500 rupees on PhonePe for postmortem at Osmanabad check details 30 October 2022.

हॅशटॅग्स

#CM Ekanath Shinde(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x