21 April 2025 5:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

सांगोल्यात काय ते रस्ते, काय ते खड्डे, काय तो भ्रष्टाचार समद ओके हाय, शहाजी बापू पाटलांच्या बोगस कामाची मनसेकडून पोलखोल

MLA Shahaji Bapu Patil

MLA Shahaji Bapu Patil | शिंदे यांच्या राजकीय बंडानंतर आमदार शहाजी बापू पाटील हे काय झाडी काय डोंगर काय हॉटेल मध्ये फेमस झाले. एकाबाजूला एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंसोबत या ना त्या कारणाने एकत्र दिसत आहेत, तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी शिंदे गटाच्या नेत्यांनी केलेल्या बोगस कामांची पोलखोल करत आहेत. सांगोला तालुक्यात रस्ते, खड्डे आणि भ्रष्टाचार समोर आला आहे. आमदार शहाजी बापू पाटील यांच्या फंडातून रस्त्यांची कामे झाली परंतु निकृष्ट दर्जाची कामे झाल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आरोप केला आहे.

आमदार शाहजी बापू पाटील यांनी दिनांक 31 ऑगस्टला मोठ्या थाटामाटात उद्घाटन केलेल्या सांगोला तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 386 या रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप सांगोला तालुक्यातील मनसे तालुकाध्यक्ष अक्षय विभुते यांनी केला आहे. दरम्यान याबाबत विभुते यांनी याचा व्हिडिओ व्हायरल केला असल्याने जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान पुढच्या 15 दिवसांमध्ये चौकशी करावी व दोषी कॉन्ट्रॅक्टरची लायसन्स जप्त करावेत. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

आदित्य ठाकरे सांगोला तालुक्यात जाणार
दरम्यान, आदित्य ठाकरे शहाजीबापू पाटील यांच्या सांगोला तालुक्यातील नुकसानग्रस्त संगेवाडी आणि मांजरी येथे बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. विशेष म्हणजे याच गावातून शहाजीबापू पाटील यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला होता, अशी माहिती शिवसेनेचे लक्ष्मण हाके यांनी दिली आहे.

दुसरीकडे, गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांची . जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगरमध्ये होणारी सभा अखरे रद्द झाली. या सभेवरुन दिवसभर जळगावात हायव्होल्टेज ड्रामा रंगला होता. सभा रद्द झाली असली तरी सुषमा अंधारे चर्चेत आल्या आहेत. सुषमा अंधारे यांची सभा रद्द झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केले आहेत

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: MNS leader exposed MLA Shahaji Bapu Patil development work check details 05 November 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MLA Shahaji Bapu Patil(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या