4 December 2024 12:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | कुबेरचा खजिना आहे हा स्वस्त शेअर, दिला 2000% परतावा, खरेदीला गर्दी - BOM: 540693 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीबाबत अपडेट, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड-न्यूज, 53% डीएसह 2 भत्त्यांमध्ये मोठी वाढ झाली
x

नव्या निवडणुका नवे सवंगडी, मनसेकडून संभाजीराजे-शिवेंद्रराजेंच्या भूमिकेकडे दुर्लक्ष आणि राष्ट्रवादी लक्ष

Har Har Mahadev

Har Har Mahadev Movie | झी स्टुडिओच्या हर हर महादेव आणि महेश मांजरेकर यांच्या वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटांच्या विरोधात सध्या वातावरण तापलेलं दिसून येतं आहे. या चित्रपटांमध्ये चुकीचा इतिहास दाखविण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबतं संभाजीराजे छत्रपती यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं अराध्य दैवत आहे. त्यांच्या आयुष्यावर सिनेमा येणं ही चांगलीच बाब आहे मात्र इतिहासाची मोडतोड झाल्यास गप्प बसणार नाही असा इशारा दिला आहे. संभाजीराजे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन वेडात मराठे वीर दौडले सात आणि हर हर महादेव या चित्रपटांवरून संताप व्यक्त केला होता.

संभाजीराजे छत्रपती यांच्यानंतर साताऱ्याची गादीही या चित्रपटांविरोधात आक्रमक झाली आहे. भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी इतिहासाचा खेळ करणाऱ्या चित्रपटांना बॉयकॉट करावं, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. ते म्हणाले, चित्रपटांमधे इतिहासाची मोडतोड करून इतिहासाचा खेळ करू नये, असं केल्यास या चित्रपटांना लोकांनी बॉयकॉट करावं. हे चित्रपट पाहू नये, अशी हाक दिली.

दरम्यान, छत्रपती संभाजीराजेंच्या भूमिकेचं समर्थन करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात चित्रपटाचा शो बंद पाडला. यावेळी तिकिटाचे पैसे परत मागणाऱ्या प्रेक्षकांना मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला. शो दरम्यान झालेल्या राड्यानंतर जितेंद्र आव्हाडांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या काळातील मावळ्यांच्या आयुष्यावर काढल्या जाणाऱ्या चित्रपटातून इतिहासाशी तथ्यांची तोडमोड केली जात असल्याचा आरोप होतोय. छत्रपती संभाजीराजे यांनी आक्षेप घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशा चित्रपटांविरुद्ध आक्रमक झाले आहे. सोमवारी रात्री (७ नोव्हेंबर) जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यातील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहातील हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला.

मनसेची टीका
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रेक्षकांना धक्काबुक्की आणि मारहाण केल्याच्या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी टीका केलीये. ‘मराठी प्रेक्षकांना मारहाण करुन बाहेर काढण्याचा अधिकार जितुद्दिन मियांना कोणी दिला आहे? सत्ता गेल्याच्या हतबलतेतून हे सुरू आहे का? सरकारने जितेंद्र आव्हाड व त्यांच्या चमचांवर कारवाई करावी. सिनेमाबद्दल मतभेद एका बाजूला पण ही गुंडगिरी चालणार नाही. सिनेमा पाहायचा की नाही हे लोक ठरवतील’, अशी टीका मनसेचे नेते गजानन काळे यांनी केलीये. विशेष म्हणजे मारहाणीचा इतिहास असलेले मनसे नेते आज धक्काबुक्की आणि मारहाणीच्या प्रकारांवर टीका करत आहेत. तसेच राज्यातील रोजगार राज्याबाहेर गेले तेव्हाही मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं नाही. त्यामुळे मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचे गोडवे गाणाऱ्या मनसे नेत्यांनी सध्या नवा राजकीय गडी निवडल्याची चर्चा सुरु झाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: MNS Stand on Har Har Mahadev Marathi Movie check details 08 November 2022.

हॅशटॅग्स

Har Har Mahadev(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x