15 January 2025 1:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा
x

Sanjay Raut | नडले, भिडले, पण ईडीपुढे झुकले नाही, 5 महिन्यांनंतर संजय राऊत यांना जामीन मंजूर

Sanjay Raut

Sanjay Raut | पत्राचाळ घोटाळ्यासंदर्भात संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती. मात्र आज १०० दिवसांनी संजय राऊत यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. संजय राऊत यांना जामीन मिळू नये असं ईडीने म्हटलं होतं. मात्र आज संजय राऊत यांना काही वेळापूर्वीच जामीन मिळाला आहे. संजय राऊत यांना ३१ जुलैला अटक करण्यात आली होती. आता तब्बल १०० दिवसांनी संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. PMLA कोर्टाने या संदर्भातला निर्णय दिला आहे. इतके दिवस ते ऑर्थर रोड तुरुंगात होते.

आज कोर्टामध्ये मोठ्या संख्येनं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. प्रचंड गर्दी तरी टाचणी पडली तरी आवाज येईल, इतकी शांतता होती. सर्वाचंं लक्ष हे न्यायाधीश एम जी देशपांडे यांच्या निकालाकडे लागलं होतं. तब्बल दीड तासांच्या प्रतिक्षेनंतर न्यायाधीश देशपांडे यांनी संजय राऊत यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे.

ईडीकडून अटर्नी जनरल अनिल सिंह यांनी जोरदार युक्तिवाद करून राऊत यांचा जामीन अंमलबजावणी कालावधी पुढे ढकलण्याची मागणी केली. अपील करण्यासाठी कालावधी मागितला. अनिल देशमुख यांच्या प्रकरणाचा दाखला दिला. संजय राऊत यांना जामीन मिळाल्यामुळे ईडीला हा मोठा धक्का मानला जात आहे. ईडी या प्रकरणी मुंबई हायकोर्टामध्ये जाणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Sanjay Raut granted bail after 100 plus days check details 09 November 2022.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x