22 November 2024 12:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

जातात तिथे धु-धु धुतात, आता शिंदे गटाच्या शायर नेत्याला सुषमा अंधारेंनी जळगावातच धुतलं, कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला

Sushma Andhare

Sushma Andhare | पाच आमदार शिंदे गटात गेले म्हणून जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेची ताकद कमी झाली असं नाही. सत्ता असतानाही यांना वाय प्लस सुरक्षा घेवून फिराव लागतं आहे. यातच काय ते उत्तर आलं, असं म्हणतं जळगावमध्ये शिवसेनेची ताकद अद्याप कायम असल्याचा दावा शिवसेनापक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला. त्या कालपासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या असून बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात त्यांची सभा होणार आहे.

शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्याच मतदारसंघात जाऊन ललकारले आहे. सुषमा अंधारे यांनी भाषेवरून थेट गुलाबराव पाटील यांच्यांवर जोरदार हल्ला चढवला आहे. मी तुम्हाला तोंडभरून भाऊ म्हणते आणि तुम्ही माझा बाई असा एकेरी उल्लेख करता? ही कोणती पद्धत आहे? असा संतप्त सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे.

सुषमा अंधारे काल धरणगावात होत्या. यावेळी त्यांनी संवाद साधताना थेट गुलाबराव पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. गुलाबराव पाटील गद्दारीचा शिक्का घेऊन फिरत आहे. गुलाबराव पाटील यांना पाणीवाले बाबा व्हायचं आहे. मात्र, धरणगावात 25 दिवस पाणी सुटत नाही. पाणी पिनेवाला बाबा तुम्ही आहात. पण ते पिण्याचं पाणी आहे की सायंकाळी ग्लासात घेण्यात येणारे पाणी आहे, याचा शोध घ्यायला हवा, असा हल्ला सुषमा अंधारे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर चढवला.

गुलाबराव पाटील माझा बाई म्हणून एकेरी उल्लेख करतात. मी तुमचा हजारवेळा भाऊ म्हणून उल्लेख करते. तरीही तुम्ही माझा एकेरी उल्लेख करता. ही कोणती पद्धत आहे? असा सवाल त्यांनी केला. शेतकऱ्यांचे नुकसान झाले. पण त्यावर ते चकार शब्द बोलत नाहीत. त्यावर बोलण्यासाठी अभ्यास असायला हवा. कसे बोलतील?, असा टोलाही त्यांनी गुलाबराव पाटील यांना लगावला. तसेच गुजरातला जाणाऱ्या प्रकल्पावरून राज्य सरकारवर टीकाही केली. ज्याला ज्यातलं कळत नाही. त्यांना मंत्रीपद देण्यात आलं आहे. त्यामुळेच राज्यातील प्रकल्प बाहेर जात आहे. एक एका प्रकल्पामुळे राज्यातील लाखो मुलांना रोजगार मिळाला असता.

आणखी काय म्हणाल्या
मी काय सांगते आहे ते नीट समजून घ्या. महाप्रबोधनच्या वाशीतल्या सभेतच मी म्हटलं होतं. माझ्या भावासमोरचा माईक तुम्ही खेचून घेता. माझ्या भावाला तुम्ही कागद देता. माझा भाऊ (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) कॉपी करून पास झालेला नाही. असं असताना तुम्ही त्यांना कॉप्या कशाला पुरवता? मी जेव्हा हे बोलले तेव्हा काही लोक हसले. पण दादाहो हा टिंगल करण्याचा विषय नाही. ज्याअर्थी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वारंवार असा अपमान करतात, वारंवार माईक काढून घेतात, गिरीश महाजनांसारखी सुमार बुद्ध्यांक असलेली मंडळी जेव्हा त्यांना समजावू पाहतात तेव्हा त्याचा अर्थ साधा नसतो. ही गोष्ट भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांचे लोक जाणीवपूर्वक करत आहेत.

मराठा मुख्यमंत्र्याला बुद्ध्यांकच नाही हे भाजप ठसवू पाहतं आहे. तुमच्या सांगण्याप्रमाणे आणि चंद्रकांत पाटील यांनी उल्लेख केला तसा मनावर दगड ठेवून आम्ही मराठा मुख्यमंत्री महाराष्ट्राला दिला पण त्याला बुद्ध्यांकच नाही हे ठसवण्याचा प्रयत्न भाजपकडून सातत्याने केला जातो आहे असाही गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी आपल्या भाषणात केला. मराठा समुदायाकडे नेतृत्वाची क्षमता नाही असं या सगळ्यातून ठसवलं जातं आहे. लोकांवर बिंबवण्यासाठी कागद देणं, माईक काढून घेणं हे प्रकार केले जातात. तुम्ही काहीही प्रश्न विचारला तरी मुख्यमंत्री म्हणतात उपमुख्यमंत्र्यांना विचारून सांगतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shivsena leader Sushma Andhare political attack on minister Gulabrao Patil check details 02 November 2022.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x