23 December 2024 12:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

त्या राणेच्या चायना आयटमला माझ्यासमोर उभं करा, मशाल त्याच्या तोंडात घालून थंड-गरम आहे ते सांगतो, ठाकरेंचा आगरी नेता संतापला

Shivsena

Shivsena Janardan Patil Palghar | काही दिवसांपूर्वी अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली गेली होती. या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. शिंदे गट आणि ठाकरे गट दोन्हीसाठी ही निवडणूक म्हणजे लिटमस टेस्ट मानली जातं होती, पण २ दिवसांनी भाजपने आपल्या उमेदवाराला अर्ज मागे घेण्यास सांगितला आणि भाजप पराभवाच्या भीतीने घाबरल्याची चर्चा सुरु झाली आहे.

दरम्यान, भाजपचे आमदार नितेश राणे हे अंधेरी पूर्व येथील निवडणूक अधिकारी कार्यालयात आले होते. त्यावेळी त्यांना उद्धव ठाकरेंच्या गटाला निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या मशाल या चिन्हाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी नितेश राणे यांनी मशाल चिन्हाची खिल्ली उडवली होती. नितेश राणे म्हणाले होते, “उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाला निवडणूक आयोगाने दिलेलं चिन्ह म्हणजे मशाल नसून तो आइस्क्रिमचा कोन आहे. उद्धव ठाकरेंचं चिन्ह मशाल असूच शकत नाही. निवडणूक आयोगालाही कळलं की हा थंड माणूस आहे त्यामुळे आईस्क्रिमचा कोनच त्यांना चिन्ह म्हणून दिला आहे.” असं म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि मशाल चिन्हाची खिल्ली उडवली होती.

यावर आगरी नेते आणि पालघर जिल्हाअध्यक्ष शिवसेना लोकसभा संघटक जनार्दन (मामा) पाटील यांना पत्रकारांनी नुकताच हा प्रश्न विचारताच ते संतापले आणि म्हणाले, “त्या राणेच्या चायना आयटमला माझ्यासमोर उभं करा, मशाल त्याच्या तोंडात घालून ती थंड आहे की गरम आहे ते सांगतो, तुमही ठरावा ठिकाण आणि मी येतो तिकडे असं सांगत ते संतापले. कट्टर शिवसेना आगरी नेते असलेले जनार्दन (मामा) पाटील हे पालघरमधील अत्यंत डॅशिंग नेते म्हणून शिवसेनेत प्रसिद्ध आहेत. हितेंद्र ठाकूर यांच्यासोबत देखील ते थेट राजकीय पंगा घेतात. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर आता पालघरचे मोठी जवाबदारी सोपवली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shivsena Uddhav Balasaheb Thackeray party leader Janardan Patil from Palghar check details 19 October 2022.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x