23 February 2025 2:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

मुख्यमंत्री शिंदेनी शिवसेनेतील फुटीची तुलना थेट इंडिया-पाकिस्तान मॅचसोबत केली, मराठी नेटिझन्सकडून शिंदेंविरोधात दिवाळीत शिमगा

CM Ekanath Shinde

CM Eknath Shinde | टीम इंडियाने कालच्या सामन्यात पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवला. टीम इंडियाच्या या कामगिरीमुळे देशवासियांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा कालच्या सामन्यामुळे प्रभावित झाल्याचं पाहायला मिळालं. काल टीम इंडियाने एक मॅच जिंकली. तशीच मॅच आपण तीन साडेतीन महिन्यांपूर्वी जिंकलीय, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील फुटीची तुलना थेट इंडिया पाकिस्तान मॅच सोबत केल्याने समाज माध्यमांवर त्यांच्यावर भर दिवाळीतही जहरी टीका सुरु झाली आहे. अनेक प्रसार माध्यमांच्या सोशल मीडियाच्या अधिकृत अकाऊंटवरून नेटिझन्स शिंदेंना झापताना दिसत आहेत. तसेच दहीहंडी पासून सुरु झालेलं एकच पुराण आता बंद करा असं देखील अनेकांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री
दिवाळीबरोबच काल भारताने पाकिस्तानविरुद्ध जो सामना जिंकला, त्याचा आनंदही आपण आज साजरा करतो आहे. तुम्ही टीव्हीवर बघितलं असेल तर, काल मेलबर्नच्या मैदानातही आपली ‘बाळासाहेबांची शिवसेना, झळकली होती. कालचा सामना जसा जिंकला, तसाच सामना आम्ही तीन-साडेतीन महिन्यांपूर्वी खेळलो आणि जिंकलोही. तो सामना महाराष्ट्राने, देशाने बघितला. लोकांच्या मनातलं राज्य आणण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आम्ही सत्तेत येताच, आधी आपली परंपरा, संस्कृती, सण, उत्सव साजरे करण्याची परवानगी दिली”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

गर्दी पाहून एकच राजकीय तुणतुणं – दहीहंडी
तत्पूर्वी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील टेंभी नाका येथील दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली होती. त्यावेळी केलेल्या भाषणातून एकनाथ शिंदे यांनी याच राजकीय बंडाळीला आपण किती शौर्य केलं असं जाहीर प्रदर्शन मांडलं होतं. तेव्हा शिंदे म्हणाले होते, दीड महिन्यापूर्वी आम्हीदेखील ५० थरांची हंडी फोडली असल्याचं त्यांनी म्हटलं होते. त्यामुळे आधी दीड महिन्यापूर्वी, नंतर तीन साडेतीन महिन्यांपूर्वी आणि आता पुढे एक एक घटना किंवा उत्सव घडत राहतील तेव्हाही मुख्यमंत्री असेच एकच तुणतुणं विविध कालावधी नुसार सांगत राहतील अशी शक्यता आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Story CM Ekanath Shinde compare rebel in Shivsena with India Pakistan cricket match check details 24 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CM Ekanath Shinde(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x