17 April 2025 3:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर PSU स्टॉक मालामाल करणार, जबरदस्त तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC Vedanta Share Price | 27 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, BUY रेटिंग, यापूर्वी 11,485% परतावा दिला - NSE: VEDL Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉकबाबत तज्ज्ञांचे महत्वाचे संकेत, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअर्समध्ये हलकी तेजी, लॉन्ग टर्ममध्ये 400% रिटर्न दिला, अपडेट जाणून घ्या - NSE: GTLINFRA Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY, SELL की Hold करावा? - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER
x

तेलंगणात सुद्धा टीआरएसचे आमदार फोडण्यासाठी ऑपरेशन '100 खोके एकदम ओक', पोलिस धाडीत रंगेहात पकडले

Telangana Operation Lotus

Operation Lotus in Telangana | तेलंगणा राष्ट्र समितीचे (टीआरएस) 4 आमदार खरेदी करण्याचा प्रयत्न तेलंगणाने उघड केला आहे. टीआरएसने असा दावा केला आहे की फार्महाऊसच्या शोधादरम्यान तीन जणांना अटक करण्यात आली. हे तिघे केसीआरचा पक्ष टीआरएसचे आमदार खरेदी करण्यासाठी आले होते. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि धनादेशही जप्त करण्यात आले आहेत.

रामचंद्र भारती उर्फ सतीश शर्मा, हरयाणातील फरिदाबाद येथील पुजारी, तिरुपती येथील श्रीमानथ राजा पीठमचे पोंटिफ सिंहयाजी आणि हैदराबादमधील डेक्कन प्राइड या रेस्टॉरंटचे मालक नंदकुमार अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. टीआरएसमधील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले की, “या तिघांनी टीआरएसच्या आमदारांना सत्तेच्या पदांव्यतिरिक्त प्रत्येकी १०० कोटी रुपयांची ऑफर दिली.

या छाप्यानंतर माध्यमांना माहिती देताना पोलिस आयुक्तांनीही सांगितले की, त्यांना अशी माहिती मिळाली होती की, हे तीनही आमदारांना पैशाने भुरळ घालण्याचा प्रयत्न करीत होते आणि पक्ष निष्ठा बदलण्यासाठी इतर गोष्टींसह राजकीय फायद्याचे सौदे करत होते. “मिळालेली माहिती अशी होती की ते राजकीय सौदेबाजीसाठी सल्लामसलत करत होते. ज्याच्या आधारे पोलिसांनी फार्महाऊसवर छापा टाकला. आम्ही आरोपींवर कायदेशीर कारवाई करू,’ असे आयुक्त म्हणाले.

मोईनाबाद येथील फार्महाऊसवर या तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले. हे फार्महाऊस आमदार पायलट रोहित रेड्डी यांचे असल्याची माहिती आहे. या घडामोडींचा विचार करता, असे दिसते की टीआरएसने भाजपला धोबीपछाड दिला आहे. उच्चपदस्थ सूत्रांनी प्रसार माध्यमांना दुजोरा दिला की, भाजपच्या राज्य युनिटलाही घोडेबाजाराची कल्पना देण्यात आली नव्हती. केवळ दिल्ली भाजपचे नेते या ऑपरेशनवर लक्ष ठेवून होते अशी माहिती मिळाली आहे. 31 ऑक्टोबर रोजी राज्यात भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या जाहीर सभेत आमदारांनी फोडून भाजपात सामील करून केसीआर यांच्याविरोधात रणशिंग फुंकण्याचे भाजपच्या दिल्लीश्वरांनी ठरवले होते असं वृत्त केसीआर यांच्या जवळील लोकांनी दिलं आहे, म्हणून या ऑपरेशन लोटसला वेग देण्यात आला होता, आणि हे राजकीय भांड फुटलं असून दोषींविरोधात अनेक पुरावे हाती लागल्याचं वृत्त आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Telangana Operation Lotus exposed by KCR check details 27 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Telangana Operation Lotus(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या