21 November 2024 2:38 PM
अँप डाउनलोड

औरंगाबाद लिपिक परीक्षा ऑगस्ट २०१३ VOL-1

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
नामाचे क्रियापदात रुपांतर करून वाक्याचा अर्थ न बदलता विधान तयार करा.‘उन्हामुळे त्याच्या चेहऱ्यावर घाम आला.’
प्रश्न
2
एखाद्या व्यक्तीने मद्य सेवन केले किंवा नाही हे ओळखण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते?
प्रश्न
3
मुंबई व नांदेड हि शहरे जवळपास एकाच अक्षवृत्तावर असून सुद्धा मुंबईचे तापमान नांदेडपेक्षा कमी आहे. कारण……
प्रश्न
4
‘भाकरी, अक्का, अण्णा, अडकित्ता’, हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत रूढ झाले आहेत?
प्रश्न
5
नंदुरबार ह जिल्हा ……प्रशासकीय विभागात येतो.
प्रश्न
6
स्फोटक पदार्थ शोधण्याकरिता कोणत्या प्रजातीच्या श्वानाचा वापर करतात?
प्रश्न
7
भामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे स्थित आहेत?
प्रश्न
8
‘लोभाजीरावाने जास्त जमीन प्राप्त करण्यासाठी खूप धावाधाव केली पण अति लोभाने त्याचा मृत्यू झाला’ म्हणतात ना………
प्रश्न
9
‘समकालीन ‘ म्हणजे काय?
प्रश्न
10
‘अ’ आणि ‘अ’: यांना काय म्हणतात?
प्रश्न
11
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासाठी युरेनिअम पुरविणारी ‘अरेवा’ ही कंपनी कोणत्या देशात आहे?
प्रश्न
12
कोणत्या जिल्ह्याचा सर्वात कमी भूभाग वनाखाली आहे?
प्रश्न
13
सहकारी संस्थेच्या स्थापनेसाठी किमान …….सभासद असावे लागतात.
प्रश्न
14
‘अतिशय’, ‘अतिक्रमण’, ‘अतिरेक’- शब्दसिधी प्रकार ओळखा.
प्रश्न
15
समाजात चांगला बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणारा ….
प्रश्न
16
खालीलपैकी कोणती आपत्ती पृथ्वीच्या भूगर्भातून उद्भवते ?
प्रश्न
17
केलेले उपकार विसरणारा …….
प्रश्न
18
खालील पैकी कोणत्या एका गटातील नद्या पश्चिम घाटात उगम पावून पश्चिमेकडे जातात?
प्रश्न
19
खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात नारळ लागवडीचे सर्वाधिक क्षेत्र आहे?
प्रश्न
20
‘तीळतीळ ‘, ‘हालहाल’, ‘हळुहळु’- शब्द प्रकार ओळखा.
प्रश्न
21
सहकारी संस्थांची नोंदणी ….कडे करावी लागते?
प्रश्न
22
‘भंडारदरा धरण’ महाराष्ट्रातील…..या जिल्ह्यात आहे.
प्रश्न
23
भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती ….कडून होते.
प्रश्न
24
विधान पुर्ण करा. सारांश लेखन हे मूळ उताऱ्यातील शब्दसंख्येच्या…..शब्दात करण्याची प्रथा आहे.
प्रश्न
25
महाराष्ट्रातील दगडी कोळशाचे सर्वात जास्त साठे …..येथे आहे.
प्रश्न
26
‘घरावरून हत्ती गेला’- या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा ध्वन्यर्थ ओळखा.
प्रश्न
27
इंदिरा गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीचे किमान वय किती असावे लागते?
प्रश्न
28
‘अलीकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही’- या विधानातील विधेयविस्तार ओळखा.
प्रश्न
29
माहिती अधिकार अधिनियम खाली अर्ज केलेल्या तारखेपासून मागील …….वर्षापूर्वीची माहिती मागता येते.
प्रश्न
30
खालीलपैकी शब्दाची कोणती जात विकारी नाही?
प्रश्न
31
हातवारे म्हणजे काय?
प्रश्न
32
खालीलपैकी कोणता कर केंद्र सरकार आकारणी आणि वसुली करते, परंतु उत्पन्न केंद्र व राज्यात विभागण्यात येते?
प्रश्न
33
‘चिल्लीपिल्ली’ ह शब्द कोणत्या भाषेतील आहे?
प्रश्न
34
‘अति’या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
प्रश्न
35
इएफटीम्हणजे काय?
प्रश्न
36
सरकारी व सरकार अनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये अपंगांसाठी किमान किती आरक्षण बंधनकारक आहे?
प्रश्न
37
मिश्र वाक्य कोणते?
प्रश्न
38
‘अर्थ’ या शब्दाचा एक अर्थ ‘आशय’ असा होतो तर दुसरा अर्थ कोणता?
प्रश्न
39
माहितीच्या अधिकाराची चळवळ महाराष्ट्रात सुरु करण्याचे श्रेय खालीलपैकी कोणत्या व्यक्तीकडे जाते?
प्रश्न
40
अपमान केल्यास कुणाला राग येत नाही? वाक्याचा प्रकार सांगा.
प्रश्न
41
‘मांजरा पठार’ कुठल्या भागात आहे ?
प्रश्न
42
‘तू लवकर घरी आलास म्हणजे आपण बागेत जाऊ’ अधोरेखित शब्दाचा उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
43
अनेक वेदग्रंथांमध्ये या शब्द समूहासाठी योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
44
पुढील वाक्यात योग्य पर्याय भरा. मुलाच्या पराक्रमाने ऊर….आला.
प्रश्न
45
‘घेता दिवाळी, देता शिमगा’ या म्हणीचा अर्थ कोणता?
प्रश्न
46
श्वानपथकातील श्वानाचे कार्य कोणत्या प्रमुख वैज्ञानिक तत्त्व व इंद्रियावर अवलंबून आहे?
प्रश्न
47
खालीलपैकी कोणता जिल्हा पुणे प्रशासकीय विभागात येत नाही?
प्रश्न
48
‘अष्टावर्त ‘ या संस्कृत शब्दातील मराठी अर्थ खालीलपैकी कोणता?
प्रश्न
49
भाषा म्हणजे काय?
प्रश्न
50
‘घरोघरी मातीच्या चुली’ या म्हणीला पर्यायी म्हण कोणती?
प्रश्न
51
आजन्म, आमरण, यथाशक्ति हे शब्द ……समासाचे आहेत.
प्रश्न
52
खालीलपैकी ऱ्हस्व स्वर कोणता?
प्रश्न
53
आगरकरांना हिंदुस्थानच्या अभ्यासातून काय जाणवले?
प्रश्न
54
माहिती तंत्रज्ञान कायदा २००० ह कायदा कशाकरिता आहे?
प्रश्न
55
केंद्रीय जन माहिती अधिकारी अथवा राज्य जन माहिती अधिकारी यांच्या निर्णयांविरुद्ध …..दिवसात अपील करता येते.
प्रश्न
56
नागरी सुविधांच्या दृष्टीकोनातून प्रामुख्याने ….ही सेवा पुरविण्याची जबाबदारी नियोजन प्राधिकरणाची आहे.
प्रश्न
57
आपत्ती व्यवस्थापन प्रणालीतील पहिली पायरी कोणती?
प्रश्न
58
भारतीय संविधानाप्रमाणे व्यवसायकर कपातींची कमाल….वार्षिक मर्यादा आहे.
प्रश्न
59
महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती?
प्रश्न
60
‘शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे’-प्रयोग ओळखा.
प्रश्न
61
स्टँडर्ड अॅण्ड पुअर्स’ ही संस्था जगातील विविध देशांचे …..मानांकन ठरविते.
प्रश्न
62
‘कोल्हापूरी चिवडा’, ‘नागपुरी संत्री’, ‘पंढरीचा महिमा’ ही………विशेषणे आहेत.
प्रश्न
63
संयुक्त वाक्य कोणते?
प्रश्न
64
‘एसइझेड’ म्हणजे काय?
प्रश्न
65
खालील उतारा वाचून त्यावर आधारित प्रश्न क्रमांक ७७ ते ८१ ची उत्तरे द्या. आगरकर हे महाराष्ट्रातील एक सच्चे बुद्धिवादी समाजसुधारक म्हणून प्रसिद्ध आहेत. जुन्या नव्या परंपरापूजकांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी सामाजिक सुधारणेचा सतत आग्रह धरला हे खरे आहे. पण त्यांच्या सुधारणावादाचा आशय साकल्याने व सम्यकदृष्टीने तपासून पहिला तर त्याचे मूळ त्यांच्या प्रखर राष्ट्रनिष्ठतच आहे असे दिसून येईल. एम.ए.चा अभ्यास चालू असताना टिळकांचा आणि त्यांचा स्नेह जडला; आणि त्या दोघांनी तेव्हाच “राजसेवेचा सामान्य मार्ग सोडून देऊन आपापल्या मनासप्रशस्त वाटेल त्या रीतीने आपल्या हयातील आपल्या हातून होईल तेवढे देशकार्य करण्याचा निश्चय केला होता. “हिंदुस्थानातील एकंदर परिस्थितीचा त्यांनी अभ्यास केला आणि सध्याच्या स्थितीत ज्ञानप्रसार आणि विचार परिवर्तन यांखेरीज दुसरा तरणोपाय नाही अशी त्यांची खात्री पटली म्हणून विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, प्राचार्य आपटे, प्रो. केळकर यांच्या समवेत त्यांनी शिक्षणसंस्था आणि वृत्तपत्रे यांच्याद्वारे लोकशिक्षणाचे कार्य हाती घेतले. आपल्या वृत्तपत्रीय लेखांतून त्यांनी विविध विषयांचा जो परामर्श घेतला, त्याचा उद्देश निव्वळ जिज्ञासापूर्ती किंवा ज्ञानानंद असा नसून देशहित, देशोन्नती हाच होता. ‘केसरी’च्या ध्येयधोरणांबद्दल दुमत होण्याचे कारण नाही. ‘सुधाकर’ या नावामुळे मात्र समजुतीचा घोटाळा होण्याचा संभव आहे, पण ‘सुधारणा काढण्याचा हेतू’ या लेखात खुद्द आगरकरांनीच आपले मनोगत व्यक्त केले आहे. नैसर्गिक संपत्तीची अनुकूलता असूनही हिंदूस्थानच्या ऐतिहासिक चित्रपट किती निराशाजनक आहे ते या लेखात त्यांनी दाखवून दिले आहे. वृक्षाचे रूप योजून आपल्या वैयक्तिक आणि सामुहिक जीवनाच्या शिलावस्थेचे व नि:सत्वपणाने त्यांनी चित्र रेखाटले आहे. आपल्या देशाची प्रगती खुंटवणाऱ्या कारणमालिकेत त्यांनी फक्त सामाजिकच नव्हे; तर राजकीय बाबींचाही निर्देश केलेला आहे. भरतखंडरुपी जरठ झाड कसे तरी अजून उभे आहे! पण त्यात काही त्राण उरलेले नाही. शेकडो वर्षाच्या स्थितीशीलतेमुळे ते आतून अगदी शुष्क होत आले आहे; आणि त्याचे खोड व फांद्या डळमळू लागल्या आहे. त्याचे जीर्णत्व नाहीसे होऊन त्याला नवीनावस्था यावी, त्याची पूर्ण वाढ होऊन जगाला त्याच्या भव्यतेचा पुन्हा साक्षात्कार घडावा, अशी अपेक्षा असेल, त्या त्याची खूपखच्ची करून त्यात अर्वाचीन कल्पनांचे भरपूर पाणी दिले पाहिजे. या कल्पनांचा उगम जरी युरोपातील देशांत झालेला असला, तरी तेथे आज जी सुधारणा दृष्टीस पडत आहे ती मागील अनेक सुधारणांचे सार आहे. आगरकरांच्या वृत्तपत्रीय लिखाणाचा हेतू …….हा होता.
प्रश्न
66
प्रत्येक माहिती आयुक्त पदधारणाच्या दिनांकापासून …. वर्षाच्या कालावधीकरिता आपले पद धारण करील.
प्रश्न
67
नागपूर आणि अमरावती विभाग …..या नावाने ओळखला जातो.
प्रश्न
68
योग्य शब्दयोगी अव्ययाचा वाक्यात उपयोग करा.डोळ्यांनी ….पाहून देव दिसत नाही, अंत:चक्षूंनी पाहावा लागतो.
प्रश्न
69
‘अनल’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
प्रश्न
70
रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.-शब्दांच्या पूर्वी उपसर्ग लागून जे शब्द तयार होतात त्यांना ….शब्द म्हणतात.
प्रश्न
71
‘तू आला नसतास तरी चालले असते’- अर्थाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
72
आगरकरांच्या सुधारणावादाचा पाया त्यांच्या ……
प्रश्न
73
आगरकरांच्या वृत्तपत्राचे नाव ….होते.
प्रश्न
74
‘विघ्न’ म्हणजे काय?
प्रश्न
75
बॉक्साइटचा उपयोग मुख्यत्वे ….. मिळविण्यासाठी केला जातो.
प्रश्न
76
भारताने सर्वात पहिला कोणता सुपर कॉम्पुटर तयार केला?
प्रश्न
77
मुंबई मेट्रो प्रकल्प उभारणीसाठी ……..संस्था आहे.
प्रश्न
78
‘पुस्तक’ हा शब्द मराठीत कोणत्या लिंगात वापरतात?
प्रश्न
79
कोणत्या जिल्ह्याचा सर्वात कमी भूभाग वनाखाली आहे?
प्रश्न
80
कोणत्याही वाक्यात अथवा काव्यात एका किंवा अधिक वर्णाची पुनरुक्ती होते तेव्हा …….अलंकार होतो.
प्रश्न
81
खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही?
प्रश्न
82
वाक्य प्रकार ओळखा.विधान – जेव्हा मोठी घंटा होते, तेव्हा शाळा सुटते.
प्रश्न
83
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये आपत्ती निवारणाबाबत दक्षता व माहिती देण्यासाठी …..हि नि:शुल्क दूरध्वनी सेवा सुरु आहे.
प्रश्न
84
‘पावसासोबत गारा पडतील’ या विधानातील काळ ओळखा.
प्रश्न
85
खालीलपैकी कोणती घटना नैसर्गिक आपत्ती नाही?
प्रश्न
86
पहिल्या आशियाई क्रीडा स्पर्धा कोणत्या देशामध्ये पार पाडल्या?
प्रश्न
87
नैसर्गिक न्यायाच्या नियमाचा उद्देश काय आहे?
प्रश्न
88
रेन वॉटर हार्वेस्टिंग कशाशी संबंधित आहे?
प्रश्न
89
‘पुढारी’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा.
प्रश्न
90
श्री. अण्णा हजारे यांनी नवी दिल्ली येथे कोणत्या विधेयकाबाबत आंदोलन केले?
प्रश्न
91
‘हेला’ या शब्दाचे स्त्रिलिंगी रूप लिहा.
प्रश्न
92
वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक विकारी शब्दाला …….म्हणतात.
प्रश्न
93
भारतात ‘मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा बालकांचा हक्क कायदा’  कधीपासून लागू झाला?
प्रश्न
94
‘आकाश पाताळ एक करणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?
प्रश्न
95
‘गंगायाम् घोष:’- या वाक्यातील ध्वन्यर्थ ओळखा.
प्रश्न
96
महाराष्ट्रातील ग्रामीण ते शहरी स्थलांतराचे ….हे सर्वात महत्वाचे कारण आहे.
प्रश्न
97
सर्वसामान्य व्यवहारात एका विशिष्ट खुणेचा सर्व व्यक्तीच्या ओळखीकरिता प्रयोग केला जातो, ती म्हणजे ……….
प्रश्न
98
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते स्थळ ‘युनेस्कोने ‘ जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेले नाही?
प्रश्न
99
महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे?
प्रश्न
100
हिंदुस्थानच्या स्थितीशीलतेसाठी आगरकरांनी कोणते रूपक वापरले आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x