26 December 2024 6:41 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-102

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
योग्य विधाने ओळखा. अ) केंद्रीय आर्थिक व्यवहारासंबंधीच्या कबिनेट समितीने मसूर या डाळी पिकासाठी किमान आधारभूत किंमत ३९५० प्रतीकिंटल ठरविली आहे. ब) मोहरी आणि सूर्यफुल पिकासाठी किमान आधारभूत किंमत ३,७०० रु. प्रतीक्विटल ठरविली आहे.
प्रश्न
2
‘लक्ष्मी’ हे रोबोट (मानवयंत्र) नुकतेच चर्चेत होते त्याविषयीची विधाने विचारात घ्या. अ) भारतीय बँकिंग क्षेत्रात वापरात असलेला हा पहिला रोबोट आहे. ब) चेन्नई ‘सिटी युनियन बँकेत’ हा रोबोट कार्यान्वित आहे.
प्रश्न
3
‘स्टील आथोरेटी ऑफ इंडिया’ (SAIL) विषयी पुढील विधाने विचारात घ्या. अ) ही भारत सरकारच्या मालकीची स्टील (पोलाद) उत्पादक कंपनी आहे. ब) या कंपनीस २०१६ चा उद्योग प्रशासनासंबंधीचा ‘सुवर्ण मयूर पुरस्कार’ (Golden Peacock Award) जाहीर झाला आहे.
प्रश्न
4
खालीलपैकी योग्य विधान/ ने कोणती आहेत. अ) अमेरिकन सार्वत्रिक निवडणूक २०१६ मध्ये कमला हरीस या भारतीय वंशाच्या महिलेची अमेरिकन सिनेटवर निवड झाली आहे. ब) अमेरिकन सिनेटवर निवडणूक जाणाऱ्या कमला हरीस या पहिल्या भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरीक आहेत.
प्रश्न
5
२०१६ च्या ब्राझिलियन ग्रांड प्रिन्स या स्पर्धेचे विजेतेपद जिंकणारा लुईस टमिल्टन हा कोणत्या संघाचा खेळाडू आहे. अ) अमोनिया           ब)क्लोरीन           क)शिसे           ड)ओझोन
प्रश्न
6
‘सूर्यकिरण’ हा संयुक्त सैन्य सराव खालीलपैकी कोणत्या देशांदरम्यान आयोजित केला जातो.
प्रश्न
7
चुकीचे विधान ओळखा. अ) डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकन सिनेटचे सदस्य म्हणून लुसियाना प्रांतातून निवडून आले आहेत. ब) ट्रम्प हे २० जानेवारी २०१७ रोजी अमेरिकन अध्यक्षपदाची शपथ घेतली. क) ट्रम्प यांच्या पक्षाने अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत ४८ टक्के मते मिळविली आहेत.
प्रश्न
8
हिंदी महासागर परिसरातील देशांच्या उच्चस्तरीय आंतरमंत्रालयीन गटाने कोलंबो येथे जाहीर केलेले ‘कोलंबो घोषणापत्र’ कशासंबंधी आहे.
प्रश्न
9
खालीलपैकी कोणत्या दिवशी ‘जागतिक निमोनिया दिवस’ पाळला जातो.
प्रश्न
10
‘कालिदास सन्मान’ पुरस्काराविषयी पुढील विधाने विचारात घ्या. अ) हा पुरस्कार मध्यप्रदेश सरकारकडून दिला जातो. ब) दरवर्षी दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारची स्थापना १९८० साली झाली आहे. क) हा पुरस्कार फक्त भारतीय नाट्यक्षेत्रातील व्यक्तींनाच दिला जातो.
प्रश्न
11
२०१५ चा ‘हँड इन हँड’ संयुक्त सैन्य सराव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडला होता.
प्रश्न
12
३६ व्या ‘भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याची’ संकल्पना (Theme) काय आहे.
प्रश्न
13
‘आदिती अशोक’ हिच्याविषयी विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. अ) आदिती ही भारतीय गोल्फपटू आहे. ब) आदितीने ‘महिला युरोपियन टूर टायटल’ ही स्पर्धा जिंकली आहे.
प्रश्न
14
औष्णिक विद्युत प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या धुलीकणांचे (फ्लायअश) वापर धोरण/जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते.
प्रश्न
15
२०१६ च्या जागतिक निमोनिया दिनाची संकल्पना काय आहे.
प्रश्न
16
‘३६ व्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्या’ विषयी विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. अ) या व्यापार मेळ्यामध्ये २७ देशातील कंपन्या सहभागी झाल्या आहेत. ब) या वर्षीच्या व्यापार मेळ्यासाठी दक्षिण कोरिया या देशाची भागीदारी देश म्हणून निवड झाली आहे. क) या वर्षीच्या व्यापार मेळ्यासाठी फोकस कंट्री म्हणून ‘बेलारूस’ या देशाची निवड झाली आहे.
प्रश्न
17
‘राज बिसारीया’ यांच्या विषयीची विधाने विचारात घ्या. अ) बिसारीया यांना २०१५- १६ चा ‘कालिदास सन्मान’ पुरस्कार जाहीर झाला आहे. ब) दक्षिण भारतातील आधुनिक नाट्य कलेचे जनक म्हणून पी.टी.आय. ने त्यांचे वर्णन केले आहे. क) ‘भारतेंदू अकडमी ऑफ ड्रामाटिक आर्ट’ या नाट्यसंस्थेची स्थापना त्यानी केली आहे.
प्रश्न
18
पुढील विधाने विचारात घ्या. अ) आर्थिक व्यवहारासंबंधीच्या कबिनेट समितीने गहू या खाद्यान्न पिकाची किमान आधारभूत किंमत नोव्हेंबर २०१६ मध्ये १०० रु. ने वाढविली आहे. ब) २०१५ साली गहू या खाद्यान्न पिकासाठी किमान आधारभूत किंमत १५२५ रु. होती.
प्रश्न
19
‘वसंतराव साखर संस्थे’ विषयी विधाने विचारात घ्या. अ) साखर उद्योगाच्या विकसनासाठी कार्य करणारी ही महाराष्ट्र सरकारची संस्था आहे. ब) या संस्थेची स्थापना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी १९७५ साली पुण्याजवळील मांजरी येथे केली होती.
प्रश्न
20
’36 व्या ‘भारत-आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्या’ विषयी विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. अ) हा व्यापार मेळा १४ ते १८ नोव्हेंबर या कालावधीसाठी दिल्ली येथे आयोजित केल गेला आहे. ब) या व्यापार मेळ्याचे उदघाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झाले. क) ‘मेक एन इंडिया’ ही या वर्षीच्या व्यापार मेल्याची संकल्पना आहे.
प्रश्न
21
२०१६ च्या अमेरिकन सार्वत्रिक निवडणुकीमध्ये………… अ) प्रमिला जयपाल यांची हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजवर निवड झाली आहे. ब) प्रमिला जयपाल या वॉशिंग्टनमधून निवडून आल्या आहेत. प्रतिनिधी सभेत निवडून येणाऱ्या त्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला आहेत.
प्रश्न
22
योग्य पर्याय निवडा. अ) किमान आधारभूत किंमत केंद्रीय कबिनेटची आर्थिक व्यवहार समिती (CCEA) ठरविते. ब) किमान आधारभूत किमती ठरविण्यासाठी ‘कृषी खर्च आणि किंमत आयोगाचा सल्ला विचारात घेतला जातो.
प्रश्न
23
आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी रोखण्यासंबंधीच्या ‘इंटरपोलीस’ या पोलीस संघटनेविषयीची विधाने विचारात घ्या. अ) या संघटनेचे मुख्यालय लिओन (फ्रान्स) येथे आहे. ब) ही स्वायत्त संस्था असून, या संस्थेची स्थापना ‘आंतरराष्ट्रीय पोलीस- गुन्हेगारी आयोगा’ कडून १९२३ साली झाली होती.
प्रश्न
24
योग्य विधाने ओळखा. अ) ‘हँड इन हँड’ हा संयुक्त सैन्य सराव भारत व चीन या देशांदरम्यान आयोजित केल जातो. ब) २०१६ चा ‘हँड इन हँड’ हा संयुक्त सैन्य सराव पुणे येथे पार पडला. क) २०१६ चा ‘हँड इन हँड’ हा संयुक्त सैन्य सराव एकूणातला सहावा सराव होता.
प्रश्न
25
अजय राज्याध्यक्ष यांच्याविषयी विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. अ) बर्कलेज कपिटल या अमेरिकेतील सल्ला क्षेत्रातील कंपनीचे ते व्यवस्थापकीय संचालक आहे. ब) अमेरिकेच्या कोषागार विभागात त्यांची राजकोषीय ऋण सल्लागार समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x