28 January 2025 9:24 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-103

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘राष्ट्रीय महिला आयोगाविषयी’ विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. अ) राष्ट्रीय महिला आयोग ही केंद्र सरकारची घटनात्मक संस्था आहे. ब) ही संस्था/आयोग महिलासंबंधीच्या सर्व धोरणांबाबत शासनास सल्ला देते. क) या आयोगाची स्थापना जानेवारी १९९२ साली झाली आहे.
प्रश्न
2
केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने खालीलपैकी कोणत्या मंत्रालयासोबत स्मार्ट रेल्वे स्थानके तयार करण्यासाठी समझोता करार केला आहे.
प्रश्न
3
योग्य पर्याय निवडा. अ) हवेतील धुलीकण प्रदूषण मोजताना PM 2.5 PM 10 या मापकाचा वापर केला जातो. ब) PM 2.5 म्हणजे 2.5 मायक्रोमीटरपेक्षा जास्त आकाराचे धुलीकण क) PM 10 म्हणजे 10 मायक्रोमीटरपेक्षा जास्त आकाराचे धुलीकण
प्रश्न
4
१५ नोव्हेंबर हा खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र सेनानीचा स्मृतिदिन आहे.
प्रश्न
5
पुढील विधानांवरून योग्य पर्याय निवडा. अ) २०१६ चा कबड्डी विश्वचषक भारतीय पुरुष कबड्डी संघाने इराकच्या संघाचा अंतिम सामन्यात पराभव करून जिंकला. ब) भारताने या विजयासह सलग तिसऱ्यांदा कबड्डी विश्वचषक जिंकला आहे.
प्रश्न
6
मैदानातील पंचाच्या वादातील निर्णयाची तपासणी करण्यासाठी डी.आर.एस.हा नियम खालीलपैकी कोणत्या खेळ प्रकारात वापरला जातो.
प्रश्न
7
महाराष्ट्र शासनाने दहावी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यासाठी खालीलपैकी कोणती कौशल्य विकास योजना सुरु केली आहे.
प्रश्न
8
जागतिक आरोग्य संघटनेनुसार प्रमुख सहा प्रदूषकांमध्ये खालीलपैकी कोणत्या हवा प्रदूषकांचा समावेश होतो. अ) शिसे           ब)कार्बन मोनाॅक्साईड क) नायट्रोजन डायऑक्साईड           ड)ओझोन इ) सल्फर डायऑक्साईड
प्रश्न
9
नुकतीच पश्चिम विभागीय परिषदेची (Western Zonal Council) सभा मुंबई येथे पार पडलीं, या परिषदेमध्ये खालीलपैकी कोणत्या राज्य-केंद्रशासित प्रदेशांचा समावेश होतो. अ) महाराष्ट्र           ब) गुजरात           क)कर्नाटक           ड)गोवा इ) दादरा व नगर हवेली           फ)दमन आणि दिव
प्रश्न
10
Lutrogale perspicillata हे पानमांजर प्रथमच कृष्णा वन्यजीव अभयारण्यामध्ये आढळून आले, हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे.
प्रश्न
11
‘द असोसिएटेड जर्नल लिमिटेड’ ही वृत्तपत्र क्षेत्रातील कंपनी खालीलपैकी कोणी १९३७ साली स्थापन केली होती.
प्रश्न
12
योग्य पर्याय निवडा. अ) विभागीय परिषदांची (Zonal Councils) स्थापना भारतामध्ये राज्यपुर्रचना कायदा १९५६ अनुसार करण्यात आली होती. ब) या परिषदांचा उद्येश आंतरराज्य सहकार्य व समन्वय वाढीस लागणे हा आहे. क) सध्या देशात पाच विभागीय परिषदा अस्तित्वात आहेत.
प्रश्न
13
योग्य पर्याय निवडा. अ) इंडो तिबेटन सीमा पोलीस दलाने (ITBP) नुकताच आपला ५५ वा स्थापना दिवस साजरा केला. ब) इंडो तिबेटन सीमा पोलीस दल हे अर्धसैन्य बल असून त्याची स्थापना २४ ऑक्टोबर १९६२ रोजी झाली आहे.
प्रश्न
14
पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. अ) केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने गुजरातमधील ओखा कानलूस आणि पोरबंदर-वसजालिया या रेल्वेमार्गाना ‘हरित रेल्वे कॉरीडॉर’ म्हणून जाहीर केले आहे. ब) गुजरात मधील हे हरित रेल्वे कॉरीडॉर देशातील पहिले हरित रेल्वे कॉरिडॉर आहेत.
प्रश्न
15
‘कृष्णा जलविवादा’ मध्ये खालीलपैकी कोणती राज्ये सहभागी आहेत ? अ) महाराष्ट्र           ब)कर्नाटक           क)तेलंगणा           ड)तामिळनाडू           इ)आंध्रप्रदेश
प्रश्न
16
‘राष्ट्रीय हवा गुणवत्ता निर्देशांक’ दर्शवितेवेळी मध्यम दर्जाची हवा गुणवत्ता ही खालीलपैकी कोणत्या रंगाने दर्शविली जाते.
प्रश्न
17
योग्य पर्याय निवडा. अ) नुकतेच इंदिरा गांधी कृषी विश्वविद्यालय हे प्रथिनसमृद्ध तांदूळ प्रजाती शोधल्याबद्दल चर्चेत होते. ब) इंदिरा गांधी कृषी विश्वविद्यालय छत्तीसगडमधील रायपुर यथे आहे.
प्रश्न
18
भारतीय तटरक्षक दलाविषयी पुढील विधाने विचारात घ्या. अ) भारतीय तटरक्षक दलाची स्थापना १८ ऑगस्ट १९७८ रोजी करण्यात आली. ब) भारतीय तटरक्षक दल केंद्रीय संरक्षण मंत्रालयांतर्गत कार्य करते. क) भारतीय तटरक्षक दलाचे मुख्यालय विशाखापट्टणम आंध्रप्रदेश येथे आहे. वरीलपैकी सत्य विधाने कोणती ते ओळखा.
प्रश्न
19
दिल्ली या शहराच्या वातावरणात सध्या असलेले प्रदूषण हे खालीलपैकी कशामुळे झाल्याचे दिसून येते. अ) धूर           ब)धुके
प्रश्न
20
खालील विधाने विचारात घ्या. अ) पुरुषांची कबड्डी विश्वचषक स्पर्धा आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाकडून आयोजित केली जाते. ब) पहिली पुरुष कबड्डी विश्वचषक स्पर्धा २००४ साली आयोजित केली गेली होती. क) आतापर्यंतच्या तिन्ही पुरुष कबड्डी विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताने अंतिम सामन्यात इराणच्या संघाचा पराभव केला आहे. वरीलपैकी सत्य विधान/ने कोणती ते ओळखा.
प्रश्न
21
खालीलपैकी कोणास ‘फेडरेशन इंटरनशनल आर्ट फोटोग्राफी’ (FIAP) या जागतिक फोटोग्राफी स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले आहे.
प्रश्न
22
राष्ट्रीय हवा गुणवत्ता निर्देशाकाविषयी पुढील विधाने विचारात घ्या. अ) हा निर्देशांक मोजताना आठ प्रदूषके विचारात घेतली आहेत. ब) हा निर्देशांक एकूण सहा श्रेणीमध्ये मोजला जातो.
प्रश्न
23
कृष्णा जलवादाविषयीची विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. अ) कृष्णा नदीवरील पाणी वाटपाचा वाद सोडविण्यासाठी केंद्र सरकारने १९६९ साली ‘कृष्णा जलवाद न्यायाधीकरणा’ ची स्थापना केली होती. ब) कृष्ण जलवाद न्यायाधीकरणाची स्थापना आंतरराज्य जलवाद कायदा १९५६ अनुसार झाली आहे.
प्रश्न
24
विभागीय परिषदांच्या सभेचे (Zonal Councils) अध्यक्षपद खालीलपैकी कोण भूषविते.
प्रश्न
25
पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. अ) केंद्र सरकारने ‘प्रादेशिक हवाई जोडणी योजना’ नुकतीच ‘उडान’ या नावाने सुरु करण्याचे घोषित केले आहे. ब) ‘उडान’ ही योजना जानेवारी २०१७ पासून दहा वर्षासाठी कार्यान्वित राहणार आहे. क) ‘उडे देश का आम नागरीक’ हे या योजनेचे पूर्ण नाव आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x