26 December 2024 6:19 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-104

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालीलपैकी कोणत्या वस्तूंवर नव्या वस्तू व सेवा कर रचनेनुसार २६ टक्के पेक्षा जास्त अधिभार कर लावला जाणार आहे. अ) अत्यंत महागड्या चैनीच्या वस्तू ब) महागड्या गाड्या क) तंबाखू उत्पादने
प्रश्न
2
खालीलपैकी कोणत्या देशाबरोबर भारताने नुकताच ऊर्जा क्षेत्रातील समझोता करार केला आहे.
प्रश्न
3
केंद्र सरकारव्दारा तयार केलेल्या ‘उद्योग व्यवसायासाठी अनुकूल राज्यांसाठीच्या’ अहवालानुसार खालीलपैकी कोणत्या राज्यांचा ‘उदयोन्मुख नेतृव’ (Emerging leaders) म्हणून उल्लेख केला गेला आहे. अ) कर्नाटक           ब)उत्तरप्रदेश इ) बिहार           ड) पश्चिम बंगाल इ) छत्तीसगड
प्रश्न
4
योग्य पर्याय निवडा. अ) ‘अकुला-II’ वर्गातील अण्वस्त्र वाहू पाणबुडी भारत हा रशियाकडून भाडेतत्वावर घेणार आहे. ब) भारताने या पूर्वी २०१२ साली ‘अकुला-II’ वर्गातील अण्वस्त्रवाहू पाणबुडी १० वर्षाच्या भाडेतत्वावर घेतली आहे.
प्रश्न
5
खालीलपैकी कोणता पुरस्कार साईना नेहवाल या भारतीय बडमिंटन खेळाडूस मिळालेला नाही ? अ) पद्मर्श्री              ब) पद्मभूषण क) पद्मविभूषण                ड) अर्जुन पुरस्कार
प्रश्न
6
सफर (SAFAR) या हवा गुणवत्ता मापन-दर्शन संबंधीच्या यंत्रणेचे विकसन कोणी केले आहे. अ) भारतीय विषुववृत्तीय हवामान अभ्यास संस्था (IITM) ब) भारतीय हवामान विभाग (IMD) क) राष्ट्रीय मध्यम अवधी हवामान अंदाज केंद्र (NCMRWF)
प्रश्न
7
योग्य पर्याय निवडा . अ) १ एप्रिल २०१७ पासून ई-रिक्षा आणि ई-वाहनासह सर्व प्रकारच्या वाहन निर्मात्यांना ते उत्पादित करत असलेल्या प्रत्त्येक वाहनाची कार्बन उत्सर्जन आणि ध्वनी पातळीची माहिती जाहीर करावी लागणार आहे. ब) वरील अधिसूचना केन्द्रीय पर्यावरण मंत्रालयाने केंद्रीय वाहन कायदा १९८९ अंतर्गत काढली आहे.
प्रश्न
8
हंगूल या प्राण्याचा वावर असलेले दाचीगम नशनल पार्क कोणत्या राज्यात आहे.
प्रश्न
9
सांख्यिकी शास्त्रातील पहिले आंतरराष्ट्रीय पारितोषिक (International Prize in statistics) खालीलपैकी कोणास जाहीर झाले आहे.
प्रश्न
10
हंगूल या प्राण्याविषयी पुढील विधाने विचारात घ्या. अ) हा प्राणी फक्त जम्मू आणि काश्मीर या राज्यात आढळतो. ब) हा प्राणी जम्मू काश्मिरसह हिमाचल प्रदेशातील चुंबा खोऱ्यात आढळतो. क) हा प्राणी हरीण या प्राण्याचा प्रकार आहे.
प्रश्न
11
निसर्ग संधारनासाठीची आंतरराष्ट्रीय संस्था आय.यु.सी.एन.विषयीची पुढील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा. अ) या संस्थेची स्थापना १९४८ साली झाली आहे. ब) या संस्थेचे मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे आहे. क) या संस्थेव्दारा अस्तित्वास धोका असणाऱ्या प्राण्यांची रेडलिस्ट जाहीर केली जाते.
प्रश्न
12
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जी.एस.टी. परिषदेमध्ये केंद्र सरकारने खालीलपैकी कोणत्या दरांसाठी वस्तू व सेवा कराचे प्रकार केले आहे. अ) पाच टक्के      ब)बारा टक्के      क)अठरा टक्के       ड)अठ्ठावीस टक्के
प्रश्न
13
आय.एन.एस.चक्र’ या भारतीय नौदलाकडील अण्वस्त्र वाहू पाणबुडीविषयी विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. अ) ही पाणबुडी भारताने रशियाकडून भाडेतत्वावर घेतली आहे. ब) या पाणबुडीचे पूर्वीचे नाव ‘के-१५२ नेर्पा’ हे आहे. क) भारताने रशियाकडून १० वर्षासाठी भाडेतत्वावर घेतलेली ही पहिली पाणबुडी आहे.
प्रश्न
14
खालीलपैकी कोणाची महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती झाली आहे.
प्रश्न
15
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या (IOC) एथलिटस कमिशनवर (खेळाडूंचा आयोग) खालीलपैकी कोणत्या भारतीय खेळाडूंची नियुक्ती झाली आहे.
प्रश्न
16
१ एप्रिल २०१७ पासून लागू होणाऱ्या नव्या अप्रत्यक्षकर रचनेसंबंधीची पुढील विधाने विचारात घ्या. अ) या कर रचनेनुसार अन्न, आरोग्य आणि शिक्षण सेवांवर शून्य टक्के वस्तू व सेवा कर आकारला जाणार. ब) चैनीच्या आणि सुखसोयींच्या वस्तूंवर २६ टक्के इतका जीएसटी कर लागू केला जाणार आहे.
प्रश्न
17
सार्वजनिक प्रापण धोरण २०१२ ( Public Procurement Policy 2012) अनुसार केंद्रीय मंत्रालये, विभाग आणि सार्वजनिक उद्योग यांच्याद्वारे होणाऱ्या एकूण प्रापणापैकी (खरेदीपैकी)………..टक्के हिस्सा हा अनुसूचित जाती-जमातीच्या उद्योज्कांपासुन खरेदी होणे बंधनकारक आहे.
प्रश्न
18
जलविद्युत घटापासून विद्युतनिर्मिती करण्यामध्ये दिल्ली येथील राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेतील शास्त्रांज्ञाना यश आले आहे. यासाठी त्यांनी जलविद्युतघट निर्माण करण्यामध्ये खालीलपैकी कोणते घटक वापरले आहेत. अ) जस्त                      ब)चांदी क) माग्नेशियम फेराईट                     ड) सोडियम सल्फोनेट
प्रश्न
19
उद्योग व्यवसायासाठी सर्वाधिक अनुकूल असलेल्या राज्यांच्या अभ्यास करून केंद्र सरकारच्या उद्योग धोरण आणि प्रोत्साहन विभागाने अहवाल प्रसिध्द केला आहे. या अहवालानुसार. अ) महाराष्ट्र हे राज्य नवव्या क्रमांकावर आहे. ब) तेलंगणा आणि आंध्र प्रदेश ही राज्ये प्रथम क्रमांकावर आहेत. क) गुजरात हे राज्य द्वितीय क्रमांकावर आहे.
प्रश्न
20
पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. अ) केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिली आंतरराष्ट्रीय मतदार शिक्षण परिषद नुकतीच नवी दिल्ली येथे आयोजित केली होती . ब) १९ ते २१ ऑक्टोबर २०१६ या काळात भरविल्या गेलेल्या या परिषदेचे अनावरण केंद्रीय निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी केले होते.
प्रश्न
21
‘सायनो इंडिया को-ऑपरेशन २०१६’ या संयुक्त सैन्य सरावाविषयी विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. अ) हा सैन्यसराव भारत व चीन या देशांच्या सैन्यदरम्यान ऑक्टोबर २०१६ मध्ये जम्मू आणि काश्मिरमधील लदाख येथे पार पडला. ब) हा भारत व चीन दरम्यानचा दुसरा ‘सायनो इंडिया को-ऑपरेशन’ सैन्य सराव होता.
प्रश्न
22
‘हंगूल’ या प्राण्याविषयी विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. अ) या प्राणी ‘काश्मिरी रेड स्टग’ या नावानेही ओळखला जातो. ब) या प्राण्यास आय.यु.सी.एन.या आंतरराष्ट्रीय निसर्ग संधारण संस्थेने अत्यंत धोका असलेल्या प्राण्यांच्या गटात (Critically Endangered) टाकले आहे. क) हंगूल हा प्राणी अस्वलाचा एक प्रकार आहे.
प्रश्न
23
केंद्र सरकारच्या सागरमाला या कार्यक्रमाविषयी विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा. अ) देशातील बंदरे आधारित देशाचा आर्थिक विकास घडवून आणणे हा या योजनेचा उद्देश आहे. ब) या उपक्रमाद्वारे देशातील किनाऱ्यावरील बंदरे आणि देशांतर्गत जलमार्ग यांचा पूर्ण क्षमतेने वापर करणे हा या उपक्रमाचा एक उद्येश आहे.
प्रश्न
24
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या एथलिटस कमिशनविषयी विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. अ) ऑलिंपिक समितीवर खेळाडूना प्रतिनिधित्व देण्याच्या उद्येशाने १९८१ मध्ये या आयोगाची स्थापना झाली आहे. ब) अंजेला रुगिएरो ही खेळाडू या आयोगाची अध्यक्षा असून या आयोगावर ९ उपाध्यक्ष आणि १० सदस्य आहेत. क) हा आयोग ऑलिंपिक स्पर्धेच्या आयोजनाचे प्रमुख काम करतो.
प्रश्न
25
जागतिक बँकेने खालीलपैकी कोणत्या देशास दोन अब्ज अमेरिकन डॉलर इतकी आतापर्यंतची दुसरी सर्वात मोठी मदतरुपी रक्कम हवामान बदलाचा प्रश्न सोडविण्यासाठी देण्याचे घोषित केले आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x