28 January 2025 9:37 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-105

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालीलपैकी कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक १९६ षटकार मारून भारतातील सर्वाधिक षटकार मारणारा एकदिवस क्रिकेटमधील खेळाडू असा विक्रम आपल्या नावे केला आहे.
प्रश्न
2
भारतीय नौदलाच्या सेवेत आय.एन.अरिहंत या अण्वस्त्रवाहू पाणबुडीच्या समावेशामुळे भारताचा समावेश ‘आण्विक त्रिकुट’ असणाऱ्या गटामध्ये झाला आहे. खालीलपैकी कोणकोणत्या देशांचा समावेश या गटामध्ये होतो. अ) रशिया           ब)अमेरिका           क)ब्रिटन ड)फ्रान्स           इ)चीन
प्रश्न
3
‘बिमस्टेक’ या आशियाई उपप्रादेशिक समुहाविषयी विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. अ) या समुहाची स्थापना ६ जून १९९७ रोजी बँकॉक घोषणापत्राद्वारे झाली होती. ब) या समूहामध्ये भारत. नेपाळ, बांग्लादेशासह एकूण सात देश आहेत. क) या समुहाचे मुख्यालय थायलंडमधील, बँकॉक हे आहे.
प्रश्न
4
खालीलपैकी कोणत्या भारतीय कंपनीने भारतातच संपूर्णत: बनविली गेलेली इलेक्ट्रिक बस तयार केली आहे.
प्रश्न
5
भारतीय सैनदलाच्या आण्विक अस्त्रांमध्ये खालीलपैकी कोणत्या क्षेपणास्त्रांचा समावेश होत नाही. अ) अग्नी क्षेपणास्त्र                 ब)पृथ्वी क्षेपणास्त्र क)प्रहार क्षेपणास्त्र                ड)शौर्य क्षेपणास्त्र इ)निर्भय क्षेपणास्त्र
प्रश्न
6
सफर (SAFAR- System of Air Quality and weather forecasting and Research) या यंत्रणेविषयी विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. अ) हा केंद्रीय भू-विज्ञानमंत्रालयाचा उपक्रम आहे. ब) या उपक्रमाचा उद्देश मेट्रोपॉलिटन शहरांमधील जनतेला हवेच्या गुणवत्तेची माहिती देऊन हवा गुणवत्ता राखण्याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे.
प्रश्न
7
‘नॅशनल इलेक्ट्रिक मोबिलीटी मिशन प्लन’ (NEMMP) विषयी विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. अ) हा केंद्र सरकारने सुरु केलेला उपक्रम आहे. ब) २०२० सालापर्यंत देशातील एकूण वाहनांच्या २० टक्के वाहने इलेक्ट्रिक इंधनावर चालणारी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
प्रश्न
8
१८ ऑक्टोबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाना (MSMSs) उच्च दर्जाची आणि पर्यावरणावर कोणतीही वाईट परिणाम न करता उत्पादने उत्पादित करण्याचे प्रोत्साहन देण्यासाठी कोणती योजना सुरु केलि आहे .
प्रश्न
9
देशातील सूक्ष्म पोषण द्रव्याअभावी उदभवणारे कुपोषण रोखण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील ‘नशनल समिट ऑंन फोर्टीफिकेशन ऑफ फूड’ ही परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित केली गेली.
प्रश्न
10
खालीलपैकी कोणती नदी खंबातच्या आखतात जाऊन मिळत नाही. अ) तापी      ब)माही      क)नर्मदा      ड)साबरमती
प्रश्न
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १८ ऑक्टोबर २०१६ रोजी पंजाबमधील लुधियाना येथे राष्ट्रीय अनुसूचित जाती/अनिसुचीत जमाती हब (National SC/ST Hub) या योजनेचा शुभारंभ केला, या योजनेचे उद्यीष्ट काय आहे.
प्रश्न
12
सर्वासाठी आंतरराष्ट्रीय खेळ स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या TAFISA जागतिक खेळ स्पर्धेविषयची विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. अ) २०१६ च्या या स्पर्धा इंडोनेशीयातील जकार्ता येथे आयोजित केल्या गेल्या होत्या. ब) या वर्षीच्या हा सहाव्या जागतिक ताफिसा खेळ स्पर्धा होत्या. क) भारताने या स्पर्धेत एक सुवर्ण पदकासह चार पदक जिंकले आहेत.
प्रश्न
13
योग्य पर्याय निवडा. अ) भारतातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रामधून देशाच्या एकूण जी.डी.पी.च्या ३८ टक्के जी.डी.पी उपलब्ध होतो. ब) भारतातील सूक्ष्म लघु आणि मध्यम क्षेत्रामध्ये साधारणत: ११ कोटी इतका रोजगार उपलब्ध आहे.
प्रश्न
14
योग्य पर्याय निवडा. अ) बिमस्टेक या आशियाई उपप्रादेशिक समुहाचा उद्देश आर्थिक व तांत्रिक सहकार्य घडवून आणणे हा आहे. ब) या समुहाचे मुख्यालय बांग्लादेशातील ढाका येथे आहे.
प्रश्न
15
योग्य पर्याय निवडा . अ) मॉंन्टरिअल प्रारूपाशी संबंधित ;किगली सुधारणा’ सर्व सहभागी देशांना २०१९ पासून लागू होणार आहे. ब) या बोलणीमध्ये भारतासह जगातील एकूण १९७ देश सहभागी आहेत.
प्रश्न
16
खालीलपैकी कोणत्या राज्यातील गोघा आणि दहेज ही ठिकाणे केंद्र सरकारच्या सागरमाला या उपक्रमाद्वारे जोडली आहेत.
प्रश्न
17
खालील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. अ) अमनदीपसिंग गिल यांची ‘संयुक्त राष्ट्र संघाच्या नि:शस्त्रीकरण परिषदेवर भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे. ब) संयुक्त राष्ट्र सघांची नि:शस्त्रीकरण परिषद (UN Conference on disarmament) ही संयुक्तराष्ट्र संघाचा अविभाज्य भाग आहे.
प्रश्न
18
बिमस्टेक (BIMSTEC) Bay of Bengal initiative for multisectoral technical and Economic co-operation या समूहाविषयी विधाने विचारात घ्या. अ) नुकत्याच भारतात पार पडलेल्या परिषदेत या समुहाने सर्व स्वरूपातील दहशतवादाविरुद्ध लढण्यास समर्थन जाहीर केले. ब) हा दक्षिण आशियाई आणि दक्षिण पूर्व आशियाई देशांतील सात देशांचा उपप्रादेशिक समूह आहे. क) भारत हा समुहाचा सदस्य देश आहे. वरीलपैकी सत्य विधान/ने कोणती ?
प्रश्न
19
सहाव्या जागतिक ताफिसा स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणारा डालमिया हा भारतीय खेळाडू कोणत्या खेळप्रकाराशी संबंधित आहे.
प्रश्न
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्टोबर २०१६ मध्ये हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या जलऊर्जा-विद्युत प्रकल्पांचे उदघाटन केले आहे . अ) कोल्दाम प्रकल्प ब)परबाती प्रकल्प क)त्राल प्रकल्प ड)रामपूर प्रकल्प
प्रश्न
21
खालील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. अ) भारताची जलऊर्जा विद्युत निर्मिती क्षमता १,४५,००० मेगावट इतकी आहे. ब) आतापर्यंत एकूण जलऊर्जा निर्मिती क्षमतेच्या (स्थापित क्षमतेच्या )फक्त २६ टक्के जलउर्जेचा वापर केला गेला आहे.
प्रश्न
22
शेनझोऊ -११ (Shenzhou-11) या चीनच्या अवकाश अभियानाविषयीची योग्य विधाने निवडा. अ) हे मानवी अवकाश अभियान (Manned Mission असून याद्वारे चीनने मंगळावर यशस्वीरित्या अवकाशवीर पाठविले आहेत. ब) हे चीनचे मानवी अवकाश अभियान (Manned Mission) असून याद्वारे दोन अवकाशवीर चीनच्या ‘तीयांगोंग’ या अवकाशात तयार होत असलेल्या प्रयोगशाळेवर पाठविले गेले आहेत. क) हे चीनचे पहिलेच मानवी-अवकाश अभियान आहे.
प्रश्न
23
‘मातृभूमी लिटररी अवार्ड’ हा साहित्य क्षेत्रातील पुरस्कार कोणत्या भाषेतील साहित्यिकास दिला जातो.
प्रश्न
24
पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. अ) नुकतीच नौदलाच्या सेवेत समाविष्ट केली गेलेली आय.एन.एस. अरिहंत ही पहिली स्वदेशी अण्वस्त्रवाहू पाणबुडी आहे. ब) या पाणबुडीच्या समावेशामुळे भारताचा समावेश ‘आण्विक त्रिकुट’ (nucleartriad) सुरक्षा क्षमता असणाऱ्या देशांच्या गटामध्ये झाला आहे.
प्रश्न
25
ऑक्टोबर २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशात अनावरण केलेले जलऊर्जा प्रकल्प कोणती भारतीय कंपनी विकसित करीत आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x