28 January 2025 9:19 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-115

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘बिल्डिंग पीस एन द माईन्डस ऑफ मेन अंड विमेन’ हे घोषवाक्य कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे आहे.
प्रश्न
2
‘युनेस्को’ ने ‘जागतिक वारसास्थळ’ म्हणून घोषित केलेल्या सांस्कृतिक ठिकाणांमध्ये भारतातील पुढीलपैकी कोणत्या ठिकाणाचा समावेश होत नाही. अ) छत्रपती शिवाजी टर्मिनस           ब)पावागड पुरातत्व उद्यान क) पर्वतीय रेल्वे             ड)लाल किल्ला संकुल
प्रश्न
3
‘युनेस्को’ ने भारतातील खांगचेंडझोंगा राष्ट्रीय उद्यानाला ‘मिश्र वारसास्थळ’ म्हणून घोषित केले आहे. हे उद्यान ………………..या राज्यात आहे.
प्रश्न
4
फेब्रुवारी २०१६ मध्ये ‘गुगल मप्स’ ला ह्या अपमध्ये  ………….ही नवीन सुधारणा देण्याचे गुगलने ठरविले आहे.
प्रश्न
5
भारतातील पहिल्या ‘ग्रीन रेल्वे कॉरीडॉर’ चे उध्दाटन नुकतेच करण्यात आले असून हा मार्ग कोणत्या दोन ठिकाणांदरम्यान सुरु झाला आहे.
प्रश्न
6
भारतात रेल्वेबाबत शिफारशी करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने रेल्वेसाठी सामान्य अर्थसंकल्पापासून स्वतंत्र अर्थसंकल्प मांडण्याची शिफारस केली होती.
प्रश्न
7
‘म्हादू’ या मराठी चित्रपटाचे कथाकन ज्या कथेवर आधारलेले आहे, त्या कथेचे मूळ लेखक ……हे होते.
प्रश्न
8
केंद्र सरकारने अमिताभ कांत यांच्या अध्यक्षते-खाली स्थापन केलेल्या समितीकडून कोणत्या क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीसंबंधीचे नियम व संबंधित विषय यांचा आढावा घेतला जाणार आहे.
प्रश्न
9
२२ जुलै २०१५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने ‘गोपनीयता’ हा मुलभूत हक्क नाही,असा निर्णय दिला . हा निर्णय कोणत्या केंद्रीय योजनेसंबंधी दिला गेला.
प्रश्न
10
जपानच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार ……या भारतीय वैज्ञानिकास २०१५ ला देण्यात आला.
प्रश्न
11
सप्टेंबर २०१५ मध्ये युनोने जाहीर केलेल्या ‘शाश्वत विकास उद्यिष्टां’ ची संकल्पना तिने २०१२ मध्ये आयोजित केलेल्या शाश्वत विकास परिषदेमध्ये सर्वप्रथम मांडण्यात आली होती. ती परिषद ………येथे भरली होती.
प्रश्न
12
‘भारतीय वन अहवाल-२०१३’ हा अहवाल ऑगस्ट २०१५ मध्ये प्रदर्शीत करण्यात आला.या अहवालानुसार भारतात एकूण क्षेत्रफळाच्या……………इतके टक्के वनाच्छादित प्रदेश आहे .
प्रश्न
13
‘जागतिक निवृत्ती निर्देशांका’ मध्ये भारत 88 व्या स्थानावर राहिला आहे. त्या पाहणीत पुढीलपैकी कोणती निरीक्षणे नोंदविण्यात आलेली आहेत. अ) ‘जागतिक निवृत्ती निर्देशांका’ नुसार भारताची कामगिरी ‘ब्रिक्स’ देशांमध्ये समाधानकारक राहिली आहे. ब) भारतातील वृद्धांचे जीवनमान अन्य देशांच्या मानाने खडतर असून वृद्धापकाळात इतरांवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या भारतात सर्वाधिक आहे.
प्रश्न
14
जगप्रसिद्ध अमेरिकन कार निर्माता कंपनी ‘जनरल मोटर्स’ ने गुजरातचा प्रकल्प बंद करून महाराष्ट्रात ६४०० कोटी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला, त्यांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील ………..या जिल्ह्याला फायदा होणार आहे.
प्रश्न
15
संयुक्त राष्ट्र संघटनेने निश्चित केलेली ‘शाश्वत विकास उद्धिष्टे’ साध्य करण्यासाठी विविध देशांच्या कामगिरीनुसार ‘शाश्वत विकास निर्देशांक’ तयार करण्यात आला असून त्यामध्ये भारत कितव्या स्थानावर राहिला आहे.
प्रश्न
16
सुप्रसिद्ध अभिनेता धर्मेंद्र व हेमामालिनी हे …………..या राज्याचे पर्यटन ब्रंडअम्बेसीडर बनले आहे.
प्रश्न
17
संयुक्त राष्ट्र संघटनेची ‘शाश्वत विकास उद्धिष्टे’ साध्य करण्यामध्ये ‘शाश्वत विकास निर्देशांका’ नुसार कोणत्या देशाची कामगिरी सर्वात चांगली आढळली आहे.
प्रश्न
18
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्षपदी ऑगस्ट २०१५ मध्ये ……यांची निवड करण्यात आली.
प्रश्न
19
केंद्र सरकारने 2017 पासून रेल्वेचा अर्थसंकल्प सामान्य अर्थसंकल्पात विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात रेल्वेसाठीचा स्वतंत्र अर्थसंकल्प मांडण्यास केव्हापासून सुरुवात झाली होती.
प्रश्न
20
‘वस्तू व सेवा कर’ लागू करण्यासाठी १२२ वी घटनादुरुस्ती करण्यात आली आहे. या आधीची घटनादुरुस्ती ……..या विषयाशी संबंधित होती.
प्रश्न
21
जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपटात खालीलपैकी ……यांनी अण्णा हजारे यांची भूमिका साकारणार आहे.
प्रश्न
22
राज्य सरकारने साहसी क्रीडा प्रकारामधील ‘दहीहंडी’ या खेळात …….या वर्षा खालील गोविदांना बंदी आहे.
प्रश्न
23
पुढील विधाने विचारात घ्या. अ) ‘शाश्वत विकास निर्देशांका’ नुसार ‘शाश्वत विकास उद्यिष्टे’ साध्य करणाऱ्या देशांमध्ये विकसनशील देशांची कामगिरी सर्वात उल्लेखनीय राहिली आहे. ब) या निर्देशांकामध्ये भारतापेक्षा त्यांच्या शेजारील देशांची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. यामधील चुकीचे विधान ओळखा.
प्रश्न
24
‘एचआयव्ही’ विषाणूकडून कोणत्या रक्तपेशीवर हल्ला केला जातो, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी होण्यास सुरुवात होते.
प्रश्न
25
फेसबुकला टक्कर देण्यासाठी गुगलने सुरु केलेल्या …………ही नेटवर्किंग साईट बंद करण्याचा निर्णय जुलै २०१५ मध्ये घेतला.

राहुन गेलेल्या बातम्या

x