28 January 2025 9:35 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-117

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
देशातील बालमजूरीचे उच्चाटन करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘बाल कामगार (प्रतिबंध आणि विनियमन) कायदा,१९८६’ संमत करण्यात आला.मात्र या कायद्यातील तरतुदी राज्यघटनेतील ……..या कलमाशी विसंगत असल्याने या कायद्यात २०१६ मध्ये दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रश्न
2
देशातील कौशल्य विकास आणि उद्यमशीलतेवरील राष्ट्रीय धोरण २०१५ मध्ये लागू करण्यात आले आहे. मात्र स्वांतत्यानंतर देशातील कौशल्य विकासासाठीचे पहिले धोरण कधी आणले गेले होते.
प्रश्न
3
पुढील विधाने विचारात घ्या. अ) देशातील १५ ते २४ वयोगटातील युवक कौशल्याच्या अभावी कमी पगारात नोकऱ्या करतात. ब) या वयोगटातील युवकांमध्ये रोजगारातील गरिबी दिसून येते. यावरून खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
4
नीति आयोगा ने देशातील कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी ५०० प्रयोगशाळा उभारण्याचे उद्यिष्ट ठेवले आहे. त्याद्वारे उभारण्यात येणाऱ्या प्रयोगशाळा ……या नावाने ओळखल्या जातील.
प्रश्न
5
सन २०१४ च्या आकडेवारीनुसार संरक्षणावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशांमध्ये भारताचा सातवा क्रमांक लागतो. याबाबतीत पुढीलपैकी ………हा देश भारतापेक्षा जास्त संरक्षण खर्च करणारा ठरला आहे.
प्रश्न
6
पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे ? अ) आंतरराष्ट्रीय श्रम संस्थेच्या ‘वर्ल्ड रिपोर्ट ऑन चाईल्ड लेबर, २०१५’ या अहवालानुसार, भारतामध्ये धोकादायक उद्योगांमध्ये काम करणाऱ्या बालकामगारांमध्ये मुलींची संख्या मुलांमध्ये कमी आहे. ब) देशात सर्वाधिक बालकामगारांची संख्या उत्तर प्रदेशात आढळली आहे.
प्रश्न
7
केंद्र सरकारने देशातील बालमजुरीच्या प्रश्नाचा अभ्यास करून त्यावर उपाय सुचविण्यासाठी १९७९ मध्ये ………..या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली होती.
प्रश्न
8
गुगल कंपनीचे नवीन कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांचे शिक्षण भारतातील ………..या आयआयटी संस्थेत झाले.
प्रश्न
9
योग्य जोड्या जुळवा . अ)जगातील स्थानिक लोकांसाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस          १)१२ ऑगस्ट ब) आंतरराष्ट्रीय युवा दिवस                         २)२९ ऑगस्ट क) गुलामांचा व्यापार आणि त्याच्या निर्मूलनाच्या स्मरणाचा दिवस                     ३)९ ऑगस्ट ड) राष्ट्रीय क्रीडा दिवस                           ४)२३ ऑगस्ट खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
10
देशातील कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेव्दारे येत्या ६ वर्षांमध्ये …………लोकांना चांगल्या प्रतीचे प्रशिक्षण देण्याचे उद्यिष्ट ठेवण्यात आलेले आहे.
प्रश्न
11
केंद्र सरकारने १९९० मध्ये सरकारिया आयोगाच्या शिफारशिनुसार ‘आंतरराज्य परिषद’ स्थापन केली होती.आयोगाने राज्यघटनेतील कोणत्या कलमातील तरतूदीना अनुसरून अशी परिषद स्थापन करण्याची शिफारस केली होती .
प्रश्न
12
केंद्र सरकारने सुरु केलेल्या ‘राष्ट्रीय कृषी बाजारासाठी’ मुख्य प्रवर्तक असलेल्या ‘लघु शेतकरी कृषीउद्योग संस्थेने’ देशातील बाजार समित्यांना एकत्र जोडण्यासाठी ……पोर्टलची सुरुवात केलेली आहे.
प्रश्न
13
‘ट्विटर’ ही एक ऑनलाईन सोशल नेटवर्किंग साईट असून तिची स्थापना ……यानी केली होती.
प्रश्न
14
पुढील विधानांवर विचार करा. अ) राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या अहवालानुसार सन २०११ च्या जनगणनेनुसार भारतातील ५ ते १४ वर्षे वयोगटातील बालकामगारांची संख्या वेगाने वाढली असून ती ३.५३ कोटी इतकी झाली होती. ब) त्याचवेळी केंद्रीय श्रम व रोजगार मंत्रालयाच्या अहवालानुसार, २०११ च्या जणगणनेमध्ये बालकामगारांची संख्या कमी होऊन ४३.५ लाख झाली आहे. यावरून खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
15
सप्टेंबर २०१५ मध्ये झालेल्या करारानुसार भारत ‘ए एच 64 डि हलिकॅाप्टर’ ……या देशाकडून खरेदी करणार आहे.
प्रश्न
16
देशातील कृषी पणन व्यवस्थेतील उणिवा दूर करण्यासाठी २००३ मध्ये मंजूर करण्यात आलेल्या ‘आदर्श एपीएमसी कायद्या’ मुळे शेतकऱ्याला ……….हा लाभ झाला आहे.
प्रश्न
17
भारतात विमान निर्मिती करणाऱ्या ‘हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड’ या कंपनीचे मुख्यालय ……येथे स्थित आहे.
प्रश्न
18
अरुणाचल प्रदेशातील बरखास्त केलेले सरकार पुन :स्थापित करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला होता. केंद्र सरकारने राज्य सरकार बरखास्तीचा निर्णय राज्यघटनेतील ……कलमाच्या आधारे घेतला होता.
प्रश्न
19
प्रशिक्षण आणि अनुभवाच्या मदतीने व्यक्तिने आपल्या कार्यपद्धतीमध्ये मिळविलेले प्राविण्य म्हणजे…….ज्यामुळे व्यक्तिला रोजगारक्षम बनविता येते आणि ती बाजारातील बदलत्या मागणीप्रमाणे आपल्यात सुधारणा करू शकते.
प्रश्न
20
पुढील विधाने विचारात घ्या. अ) भारतात उद्योगांच्या मागणीनुसार कामगारांमध्ये आवश्यक कौशल्यांचा अभाव दिसतो. ब) भारतातील शिक्षणपद्धती केवळ बौद्धिक विकासावर लक्ष्य केंद्रित करते. यावरून खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
21
माळढोक अभयारण्याचे क्षेत्रफळ १२२९ चौरस किमी वरून ४०० चौरस किमी केल्यामुळे खालीलपैकी …….या दोन जिल्ह्यांना लाभ होईल. अ) अहमदनगर      ब)लातूर      क)सोलापूर      ड)कोल्हापूर.
प्रश्न
22
भारताचे पहिले सौर मिशनचे नाव ………………हे आहे. हे प्रकल्प इस्त्रो ………..मध्ये हाती घेणार आहे.
प्रश्न
23
क्लिंटन्स ऑर वूमन ह्या पुस्तकाचे लेखक ………….
प्रश्न
24
१५ वर्षीय प्रणव धनावडेने ‘भंडारी चषक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत ‘ ३२७ चेंडूत नाबाद ……धावांची विक्रमी खेळी केली.
प्रश्न
25
स्त्री-पुरुष कामगारांचे आरोग्य व क्षमता आणि बालकांचे कोवळे वय यांचा दुरपयोग करून घेण्यात येऊ नये, तसेच त्यांच्या आर्थिक गरजेचा दुरुपयोग करण्यात येऊ नये, अशी तरतूद भारतीय राज्यघटनेच्या ……या भागात केलेली आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x