26 December 2024 6:40 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-90

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
सामान्य जनतेच्या अधिकारांसाठी अनेक वर्षे संघर्ष केल्यानंतर कोणी ‘पीपल्स रिसर्जन जस्टीज अलायन्स’ या राजकीय पक्षाची स्थापना करून =राजकारणात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे ?
प्रश्न
2
भारतातील सर्व जैवतंत्रज्ञानासंवंधीचे प्रयोग व चाचण्यांसाठी स्थापन करण्यात आलेली ‘जेनेटिक इंजिनीयरिंग अप्रायझल कमिटी’ कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असते ?
प्रश्न
3
वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्याच्या हेतूने ‘जी.एम. तंत्रज्ञानाव्दारे विकसित करण्यात आलेल्या कोणत्या पिकाच्या लागवडीला भारतामध्ये मान्यता देण्यात आलेली आहे ?
प्रश्न
4
पुढील विधाने विचारात घ्या. अ) देशातील मोठ्या घटकराज्यांमध्ये कनिष्ठ न्यायालयातील न्यायाधीश संबंधित उच्च न्यायलयाच्या न्यायाधीशांकडून होते. ब) देशातील एकूण 17 घटकराज्यांमधील कनिष्ठ न्यायालयातील न्यायाधीश संबंधित राज्य लोकसेवा आयोगाकडून निवडले जातात. यावरून खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
5
पुढील विधाने विचारात घ्या. अ) भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराज्य पाणीवाटप तंट्याच्या सोडवणूकीविषयी स्पष्ट तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. ब) पंजाब, हरयाणा, दिल्ली, राजस्थान, जम्मू व काश्मिर इत्यादी राज्यांमधील पाणीवाटप तंटे सोडवण्यासाठी सतलज-रावी पाणी तंटे लवाद कार्यरत आहे. यावरून खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
6
माहिती-तंत्रज्ञानाचा जगभरात वेगाने प्रसार होत असताना त्या विषयीच्या गुन्हेगारीला आळा घालण्याच्या हेतूने ‘सायबर पोलीस स्टेशन’ ची सुरुवात देशात कोणत्या राज्यात पहिल्यांदाच करण्यात आली आहे.
प्रश्न
7
केंद्र सरकारने अलिकडेच आंतरराज्य परिषदेचे पुनर्गठन केले आहे. या परिषदेच्या स्थापनेची शिफारस कोणत्या आयोगाने केली होती ?
प्रश्न
8
सध्या देशात अस्तित्वात असलेल्या विविध विभागीय परिषदांकडून पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे कार्य पार पडले जात नाही ?
प्रश्न
9
कृषी क्षेत्रामध्ये ‘जी.एम. ‘ तंत्रज्ञानाचा वापर कोणत्या कारणासाठी करण्यात येतो ? अ) उत्पादनात स्वयंपूर्णता ब) पिकांच्या पोषणमूल्यात वाढ क) शेतीतील समस्यांचे निरसन
प्रश्न
10
उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर गोव्यामध्ये अलीकडेच पार पडलेल्या ‘ब्रिक्स’ परिषदेचे घोषवाक्य काय होते ?
प्रश्न
11
पुढील विधाने विचारात घ्या. अ) भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युनोच्या माध्यमातून ‘सिंधू पाणीवाटप करार’ १९६० मध्ये करण्यात आला. ब) या करारनुसार भारताने सिंधू नदीचे ८० टक्के पाणी कोणत्याही कारणासाठी वापरण्याला बंदी घालण्यात आली आहे. यावरून खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
12
भारताने रशियाकडून कोणती हेलीकाप्टर खरेदी करण्याचा करार नुकताच केला आहे , जो ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमांतर्ग भारतात उभारला जाणारा पहिला प्रकल्प ठरला आहे ?
प्रश्न
13
रशियाने भारतातील ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पामध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला असून त्याच्या सहकार्याने भारतातील कोणत्या शहराचा पहिल्या टप्यात ‘स्मार्ट सिटी’ म्हणून विकसित केला जाणारा आहे ?
प्रश्न
14
‘हिंदू प्राईज २०१६’ साठी निवड झालेले ‘द आदिवासी विल नॉट डान्स’ या पुस्तकाचे लेखन खालीलपैकी कोणी केले आहे ?
प्रश्न
15
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘# Sandesh 2 Soldiers’ हे अभियान कोणत्या उद्देशासाठी सुरु केले होते ?
प्रश्न
16
योग्य जोड्या जुळवा. अ) राष्ट्रीय एकता दिवस           १)२८ ऑक्टोबर ब) राष्ट्रीय बालिका दिवस          २) २४ जानेवारी क)सुशासन दिवस            ३) २५ डिसेंबर ड)राष्ट्रीय आयुर्वेद दिन           ४)३१ ऑक्टोंबर खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
17
भूवैज्ञानिक, पुरातत्वज्ञ आणि जलवैज्ञानिकांच्या समावेश असलेली के.एस.वाल्दिया समिती केंद्र सरकारने कोणत्या बाबीच्या अभ्यासासाठी नियुक्त केली होती ?
प्रश्न
18
शेजारील राज्यांबरोबरील जोड कालवा पाणीवाटप करार रद्द करण्याच्या पंजाब सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरवले आहे. या कळव्याद्वारे कोणत्या दोन नद्या जोडल्या गेल्या आहेत ?
प्रश्न
19
कृष्णा नदीच्या पाणी वाटपासंबंधीच्या वादावर तोडगा काढण्याच्या हेतूने स्थापलेल्या लवादाने २०१३ मध्ये कोणत्या राज्याला या नदीला पाण्याच्या सर्वाधिक वाटा देण्याचा निकाल दिला आहे ?
प्रश्न
20
देशाच्या अंशात राज्यांमधील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरक्षा दलांना विशेषधिकार देणारा ‘अफ्स्पा’ कायदा अलीकडे कोणत्या राज्यात लागू करण्यात आला आहे.
प्रश्न
21
योग्य पर्याय निवडा. अ) देशभरात ‘पोलीस स्मरण दिवस’ (National Police Commemoration Day) २१ ऑक्टोंबर रोजी पाळला गेला.
प्रश्न
22
पुढीलपैकी सत्य विधान ओळखा. अ) कोमापूर कळव्याद्वारे कृष्णा नदीचे अतिरिक्त पाणी चेन्नईला पुरवणे शक्य झाले आहे. ब) कृष्णा जलवाटप तंटा लवादामध्ये महाराष्ट्र आणि तेलंगणा यांच्याबरोबरच तामिळनाडू राज्याचाही समावेश आहे.
प्रश्न
23
आंतरराज्यीय संपर्क वाढवण्याच्या हेतूने भारतात स्थापन करण्यात आलेल्या विभागीय परिषदांच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक केली जाते ?
प्रश्न
24
गांधीयन तत्वज्ञानाचा प्रसार करणारे ‘मेवा रामगोबिन’ यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या देशात कार्यरत होते ?
प्रश्न
25
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या ‘सिंधू पाणीवाटप करारनुसार’ कोणत्या नदीचे पाणी भारताला वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x