26 December 2024 6:33 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-98

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
यावर्षी कुआनतान, मलेशिया येथे झालेल्या आशियाई पुरुष चम्पियन करंडक हॉकी स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या देशाने पटकाविले आहे.
प्रश्न
2
केंद्र सरकारने नुकतीच देशात नव्या 62 ‘जवाहर नवोदय’ विद्यालये सुरु करण्यास मान्यता दिली यासंबंधी पुढील विधाने विचारात घ्या. अ) हे जवाहर नवोदय विद्यालय केंद्र व राज्य सरकारकडून संयुक्तरित्या चालविले जातात. ब) या विद्यालयांची स्थापना -सुरुवात १९८६ साली झाली.
प्रश्न
3
राधिका मेनन हे नाव नुकतेच चर्चेत होते, त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत ?
प्रश्न
4
भारताने खालीलपैकी कोणत्या देशासोबत महितिच्या आदान प्रदानसंबंधीच्या ए.ई.ओ.आय.या घोषणापत्रावर स्वाक्षरी केली आहे.
प्रश्न
5
कलाक्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा २०१६ चा ‘गदिमा पुरस्कार’ खालीलपैकी कोणास जाहीर झाला आहे.
प्रश्न
6
नौगाव का किला, राजाभोज कि हवेली, भाटेश्वर नाथ मंदिर, ही पर्यटन स्थळे कोणत्या राज्यात आहेत ?
प्रश्न
7
माहिती व दळणवळण तंत्रज्ञानासंबंधीच्या ‘जागतिक आय.सी.टी.डेव्हलपमेंट इंडेक्स’ नुकताच प्रकाशित झाला. या निर्देशांकानुसार सत्य विधाने निवडा. अ) एकूण १७५ देशांमध्ये भारताचे स्थान १३५ वे आहे. ब) दक्षिण कोरिया हा देश प्रथम स्थानावर आहे. क) आफ्रिका खंडातील नायजर हा देश शेवटच्या स्थानावर आहे.
प्रश्न
8
व्ही. आर. रघुनाथ हा भारतीय खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळ प्रकाराशी संबंधित आहे.
प्रश्न
9
योग्य विधाने निवडा. अ) पहिला भारतीय प्रवासी दिवस २००३ साली आयोजित केला गेला होता. ब) भारत सरकारव्दारा दरवर्षी भारतीय प्रवासी दिवस ९ जानेवारी रोजी आयोजित केला जातो. क) २०१६ चा प्रवासी भारतीय दिवस गांधीनगर गुजरात येथे आयोजित केला गेला होता.
प्रश्न
10
प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाविषयी योग्य विधाने निवडा. अ) केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री जे.पी.नड्डा यान यांच्या हस्ते या अभियानाचे उदघाटन करण्यात आले. ब) गरोदर महिलांना आरोग्य केंद्रे आणि हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य तपासणी सुविधा पुरविणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. क) या योजनेचा लाभ ३ ते ६ महिन्याच्या गरोदर महिलांना होणार आहे.
प्रश्न
11
जगातील आर्थिकदृष्ट्या सक्षम शहरांसंबंधीच्या ‘ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्सने’ जाहीर केलेल्या यादीनुसार……….. अ) भारतातील दिल्ली हे शहर ३० व्या स्थानावर आहे. ब) मुंबई हे शहर ३१ व्या स्थानावर आहे.
प्रश्न
12
भारतीय वाणिज्य व उद्योग महासंघाविषयी (फिक्की) पुढील विधाने विचारात घ्या. अ)हा महासंघाची स्थापना केंद्रीय उद्योग मंत्रालयाने केली आहे. ब) या महासंघाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.
प्रश्न
13
महात्मा गांधी चरख्यावर सुतकताई करत असल्याचे चित्र हे ……………च्या कायम प्रभावीशाली ठरणाऱ्या जगातील १०० छायाचित्रांमध्ये समाविष्ट केले गेले.
प्रश्न
14
२०१६ ची राष्ट्रीय महिला प्रीमिअर बुद्धिबळ जेतेपद स्पर्धा खालीलपैकी कोणत्या खेळाडूने जिंकली आहे.
प्रश्न
15
योग्य पर्याय निवडा . अ) जवाहर नवोदय विद्यालय हा उपक्रम केंद्र सरकारकडून चालविला जातो. ब) ही विद्यालये नि : शुल्क रहिवासी विद्यालये असतात. क) या विद्यालयामध्ये ७५ टक्के ग्रामीण व २५ टक्के शहरी विद्यार्थ्याना प्रवेश दिला जातो.
प्रश्न
16
जागतिक आय.सी. टी. डेव्हलपमेंट इंडेक्सविषयी पुढील विधाने विचारात घ्या. अ) हा निर्देशांक ‘इंटरनशनल टेलीकम्युनिकेशन युनियन (ITU) कडून मोजला जातो. ब) आय.टी.यु.ही संयुक्त राष्ट्र संघाची संस्था आहे.
प्रश्न
17
पुढील विधाने विचारात घ्या. अ) भारतीय वाणिज्य व उद्योग महासंघाची स्थापना १९२७ साली जी.डी.बिर्ला आणि पुरूषोत्तमदास टंडन यांनी केली आहे. ब) हा महासंघ भारतातील गैर-सरकारी-लाभकारी व्यापार संघटना आहे.
प्रश्न
18
‘सेबी’ ने ‘अंजेल इन्व्हेस्टर’ प्रकारच्या गुंतवणूकदाराना गुंतवणूकीसाठीच्या अटी शिथिल केल्या आहेत. हे गुंतवणूकदार खालीलपैकी कशात गुंतवणूक करतात.
प्रश्न
19
‘निक्की हले’ यांच्याविषयीची विधाने विचारात घ्या. अ) त्या अमेरिकेतील रिपब्लीकेन पक्षाच्या राजकारणी आहेत. ब) त्या दक्षिण करोलिना प्रांताच्या विद्यमान गव्हर्नर आहेत . क) त्यांची संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूत म्हणून निवड झाली आहे.
प्रश्न
20
फार्क (FARC) हा देशांतर्गत सरकारविरोधी गट खालीलपैकी कोणत्या देशात सक्रीय आहे.
प्रश्न
21
खालीलपैकी कोणत्या भारतीय उत्पादनात पहिले भौगोलिक मानांकन (Geographical Indication) मिळाले होते.
प्रश्न
22
पुढील विधाने विचारात घ्या. अ) २०१७ च्या प्रवासी भारतीय दिनाचे मुख्य अतिथी म्हणून पोर्तुगालचे पंतप्रधान डॉ.एंटोनियो कोस्टा यांची निवड झाली आहे. ब) २०१७ चा प्रवासी भारतीय दिवस बंगळूरू येथे आयोजित केला जाणार आहे.
प्रश्न
23
योग्य पर्याय निवडा. अ) ‘सिस्टीसेर्कोसीस’ हा रोग मानवाला डुकरांमधील ‘टेनीया सोलीयम’ या पट्टकृमीमुळे होतो. ब) भारतात उत्तर प्रदेशातील उत्तर भाग आणि ईशान्यकडील राज्ये येथे या रोगाचे रुग्ण आढळतात.
प्रश्न
24
योग्य पर्याय निवडा. अ) पेमेंट बँक सेवा देणारी ‘एअरटेल पेमेंट बँक’ ही देशातील पहिली पेमेंट बँक ठरली आहे. ब) एअरटेल पेमेंट बँकेने राजस्थान या राज्यातून आपल्या सेवेला सुरुवात केली आहे.
प्रश्न
25
भारतीय वाणिज्य व उद्योग महासंघ (FICCI) च्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची निवड झाली आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x