26 December 2024 6:18 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-99

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
२०१६-१७ या आर्थिक वर्षात खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्रीयन उत्पादनात भौगोलिक ओळख चिन्ह (Geographical Indication) मिळाले आहे. अ) सांगली मनुके           ब) बीडचे सीताफळ क) जालना संत्री           ड) औरंगाबादचे बोर
प्रश्न
2
५०० आणि २००० रुपयांच्या नवीन नोटासंबंधी विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. अ) दोन हजार रुपयांच्या नोटामागील भागावर मंगळयानाचे चित्र आहे. ब) ५०० रुपयांच्या नोटेमागील भागावर लाल किल्ल्याचे चित्र आहे.
प्रश्न
3
योग्य पर्याय निवडा. अ) आशियाई विकास बँकेचे स्थापना १९ डिसेंबर १९६६ रोजी झाली होती. ब) या बँकेच्या समभागांमध्ये सर्वाधिक हिस्सा जपान या देशाचा आहे.
प्रश्न
4
खालीलपैकी योग्य विधाने कोणती. अ) अँडी मरे हा ब्रिटनच्या टेनिसपटू आहे. ब) अँडी मरेने २०१६ च्या परीस मास्टर्स टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले आहे. क) सलग दोन ऑलिंपिक सुवर्णपदक पटकाविणारे मरे हा पहिला टेनिसपटू आहे.
प्रश्न
5
जागतिक बँकेने प्रसिद्ध केलेल्या ‘Doing Business 2017 : Equal Opportunity for all’ या अहवालानुसार योग्य विधाने निवडा. अ) न्यूझीलंड आणि सिंगापूर हे देश प्रथम आणि द्वितीय स्थानावर आहेत. ब) ब्रिक्स देशांमध्ये भारत शेवटच्या स्थानावर आहे.
प्रश्न
6
केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने सुरु केलेल्या ‘कटल जिनॉमिक्स’ या योजनेविषयी पुढील विधाने वाचून योग्य विधानाचा पर्याय निवडा.
प्रश्न
7
‘मित्र शक्ती २०१६’ हा संयुक्त लष्करी सराव खालीलपैकी कोणत्या दोन देशांदरम्यान पार पडला ?
प्रश्न
8
पुढीलपैकी सत्य विधान/ने कोणती ते ओळखा. अ) ‘मन बुकर प्राईज’ हे पारितोषिक इंग्रजीतील साहित्य लेखनास ‘मन ग्रुप’ या ब्रिटनमधील समुहाकडून दिले जाते. ब) पन्नास हजार पाउंड रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. क) या पुरस्काराची स्थापना १९६९ साली झाली आहे.
प्रश्न
9
भारतातील खालीलपैकी कोणती तीन राज्ये उघड्यावरील शौचमुक्त (OPEN Defection Free) राज्ये म्हणून मान्यता मिळालेली राज्ये आहेत. अ) गुजरात                ब) केरळ क)महाराष्ट्र                ड)हिमाचल प्रदेश इ) सिक्कीम
प्रश्न
10
योग्य पर्याय निवडा. अ) केंद्रीय, मंत्रीमंडळाने ओडीशातील बेहरामपूर येथे नव्या ‘ भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (IISER) स्थापनेस मंजुरी दिली आहे. ब) भारतात एकूण तीनच ठिकाणी IISER या संस्था आहेत.
प्रश्न
11
जागतिक बँकेच्या ‘ईज ऑफ डूईग बिझनेस’ अहवालानुसार खालीलपैकी कोणते भारताशेजारील देश भारतापेक्षा वरच्या स्थानावर आहेत अ) चीन           ब)भूतान           क)नेपाळ          ड)बांग्लादेश           इ)श्रीलंका
प्रश्न
12
इस्त्राईल या देशाचे राष्ट्रपती रेइउवेन यांनी नुकतीच भारतास भेट दिली या भेटीवेळी त्यांनी भारतासोबत कोणत्या क्षेत्रासंबंधी करार केले ? अ) जलसंसाधन व्यवस्थापक           ब) कृषी
प्रश्न
13
योग्य विधाने ओळखा. अ) २०१६ चा मॅन बुकर पुरस्कार अमेरिकेच्या पॉल बिट्टी यांना जाहीर झाला आहे. ब) हा पुरस्कार मिळविणारे पॉल बिट्टी हे पहिले अमेरिकन लेखक ठरले आहेत.
प्रश्न
14
बापू घावरे यांच्याविषयी विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. अ) घावरे यांचे नुकतेच निधन झाले ते प्रसिद्ध व्यंगचित्रकार होते. ब) लाफींग क्लब आणि हास्य वाटिका या दोन व्यंकचित्र -पुस्तकांचे त्यांनी लेखन केले आहे.
प्रश्न
15
भारतातील शेतकरी, वैज्ञानिक आणि विज्ञान संस्थांना जोडण्यासाठी खालीलपैकी कोणती योजना केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने सुरु केली आहे.
प्रश्न
16
जागतिक युवा विकास निर्देशांकानुसार भारत एकूण १८३ देशांमध्ये …………..व्या स्थानावर आहे.
प्रश्न
17
राजा कृष्णमुर्ती यांच्याविषयी विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. अ) ते भारतीय वंशाचे अमेरिकेतील उद्योगपती आहेत . ब) त्यांची अमेरिकन प्रतिनिधी गृहावर निवड झाली आहे. क) ते डेमोक्रेटीक पक्षाचे सदस्य आहेत .
प्रश्न
18
योग्य पर्याय निवडा. अ) १९४६ साली १० हजार रुपयाची नोट चलनातून बाद केली गेली होती. ब) १९५४ साली १० हजार रुपयाची नोट पुन्हा चलनात आणली गेली होती.
प्रश्न
19
केंद्रीय कृषी मंत्रालयाने ‘मुनियालाप्पा उच्चस्तरीय समिती’ कशासाठी स्थापन केली आहे.
प्रश्न
20
खालीलपैकी कोणत्या खासगी वृत्त -वाहिनीवर केंद्र सरकारने नोव्हेंबर २०१६ मध्ये एक दिवसाची प्रसारण बंदी घालण्याचे ठरविले होते.
प्रश्न
21
नुकतीच ब्रिटनच्या पंतप्रधान ‘थेरेसा मे’ यांनी भारतास भेट दिली त्यांनी भारतभेटीस खालीलपैकी कोणत्या मंदिरास भेट दिली.
प्रश्न
22
१६ जानेवारी १९७८ रोजी जनता सरकार सत्तेवर असताना झालेल्या विमुद्रीकरणावेळी खालीलपैकी कोणत्या नोटा चलनातून रद्द केल्या गेल्या होत्या. अ) एक हजार       ब)पाच हजार       क) दहा हजार
प्रश्न
23
कनूभाई रामदास गांधी यांच्याविषयी विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. अ) कनूभाई हे महात्मा गांधीचे नातू होते. ब) कनूभाई यांचे सुरत येथे ७ नोव्हेंबर रोजी निधन झाले. क) कनूभाई यांचा दांडी मीठ सत्याग्रहात सहभाग होता.
प्रश्न
24
खालीलपैकी कोणत्या दिवशी भारतात पहिला आयुर्वेद दिन साजरा केला गेला.
प्रश्न
25
पुढील विधाने वाचून योग्य विधानाचा पर्याय निवडा. अ) १२ जानेवारी १९४६ रोजी भारतात स्वातंत्र्यानंतर प्रथमच विमुद्रीकरण घडवून आणले गेले होते. ब) १९४६ सालच्या विमुद्रिकरणावेळी एक हजार आणि दहा हजाराच्या नोटा चलनातून बड गेल्या होत्या.

राहुन गेलेल्या बातम्या

x