25 December 2024 6:47 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-20

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
राष्ट्रीय युवा धोरण २०१४ ची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये म्हणून आपणास सांगता येतील? अ) युवक ही एकजिनसी वर्गवारी नसल्याचे मान्य करण्यात आले. ब) यामध्ये १५ ते २९ या वयोगटातील युवकांना ‘लक्ष्य वयोगट’ मानण्यात आले आहे. क) धोरणामध्ये पहिल्यांदाच ‘युवा विकास निर्देशांक’ समाविष्ट करण्यात आला आहे
प्रश्न
2
जब्बार पटेल यांच्या ‘आक्रीत’ या अमोल पालेकर अभिनित चित्रपटाला खालीलपैकी कोणत्या देशाचे पारितोषिक मिळाले होते?
प्रश्न
3
‘फड सांभाळ तुऱ्याला ग आला’, ‘आई मला नेसव शालू नवा’ व ‘मला म्हंत्यात लवंगी मिरची’ या सारख्या ठसकेबाज लावण्या खालीलपैकी कोणत्या लावणीसाम्राज्ञीने मराठी चित्रपटात गायल्या होत्या?
प्रश्न
4
रोहिणी भाते यांनी अमेरिकन नर्तकी ……………… यांच्या ‘माय लाईफ’ या आत्मचरित्राचा मराठी अनुवाद केला.
प्रश्न
5
पंचायत समितीमध्ये किमान ………….. व कमल ………………. सदस्य असतात.
प्रश्न
6
लता मंगेशकर यांनी अभिनय न केलेले खालीलपैकी चित्रपट कोण – कोणते आहे ते ओळखा. अ) पहिली मंगळागौरब) जीवनयात्राक) सुभद्राड) छायाइ) माणूसई) सूनबाईउ) माझं छकुलंऊ) माझा संसार
प्रश्न
7
भारतामध्ये क्रायोजनिक इंजिन खाली दिलेल्या पर्यायांपैकी कोणत्या ठिकाणी निर्माण केले जाते? अ) महेंद्रगिरीब) बेंगलुरूक) वालियामालाड) तिरुअनंतपूरम
प्रश्न
8
संयुक्त राष्ट्रांनी ………. हे दशक महिला दशक म्हणून घोषित केले होते.
प्रश्न
9
युवकांच्या विकासासाठी कार्य करणाऱ्या वर्ल्ड युथ फाउंडेशन या बिगर शासकीय संघटनेविषयी माहिती विचारात घ्या.अ) या संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेचा विशेष सल्लागार प्राप्त झाला आहे.ब) जगातील युवकांना लाभदायक ठरेल याकरिता युवकांच्या कार्यक्रमाचे संशोधन, विकास आणि दस्ताऐवजीकरण करण्यास चालना देणे या संघटनेचे उद्दिष्ट आहे.यांपैकी कोणते विधान बरोबर आहे?
प्रश्न
10
अ) महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार म्हणून संत ज्ञानेश्वर यांना मानले जाते. ब) कीर्तन व्यासपीठाला व्यासाची गाडी म्हणतात.
प्रश्न
11
बहुवर्णपटलीय संवदेन प्रणाली (multi spectral Scanning System) खालील कोणते प्रकार पडतात?
प्रश्न
12
नगरपरिषदेने घेतलेल्या कर्जफेडीचा कालावधी खालीलपैकी किती असतो?
प्रश्न
13
राष्ट्रीय पंचायतराज दिवस भारतामध्ये …………. या दिवशी साजरा केला जातो.
प्रश्न
14
स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी भारतात खालीलपैकी कोण – कोणत्या ठिकाणी महानगरपालिका अस्तित्वात होत्या?अ) मद्रासब) कलकत्ताक) मुंबईड) त्रिवेंद्रम
प्रश्न
15
….. च्या ‘इंडिका’ या ग्रंथातून प्राचीन नगर प्रशासनासंबंधी वर्णन केलेले आढळून येते.
प्रश्न
16
हवामानावर देखरेख ठेवणारे व दूरसंचारनाचे उपग्रह हे ……….. कक्षेमध्ये असतात.
प्रश्न
17
‘क्रांतीज्योती’ हा उपक्रम महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाद्वारे सुरु करण्यात आला. ह्या उपक्रमाची मूळ संकल्पना …………. यांची होती.
प्रश्न
18
राजीव गांधी राष्ट्रीय युवक विकास संस्था याविषयी खाली दिलेली विधाने लक्षात घ्या.अ) सन १९९३ मध्ये तामिळनाडू श्रीपेरुम्बुदूर येथे ही संस्था स्थापन करण्यात आली.ब) ही संस्था एक स्वायत्त मंडळ म्हणून देशातील युवकांशी संबंधित प्रशिक्षण, उच्च प्रशिक्षण अनो संशोधन कार्यरत समन्वय आणि पर्यवेक्षणाचे कार्य करणे.यापैकी कोणते विधान बरोबर आहे?
प्रश्न
19
पृथ्वीच्या पृष्ठभागावर आलेली उर्जा भूपृष्ठभागावर आणि त्यावरील पदार्थाशी आंतरक्रिया करते त्यावेळी पदार्थाकडून उर्जेचा वापर हा …………. पद्धतीने होतो.अ) परिवहनब) परावर्तनक) अभिशोषण
प्रश्न
20
बालकामगार (प्रतिबंध आणि नियमन) दुरुस्ती विधेयक २०१६ संबंधी खालील विधानांचा विचार करून अचूक विधान/ ने निवडा. अ) या दुरुस्ती विधेयकाद्वारे बालकामगार (प्रतिबंध व नियमन) कायदा १९८६ मध्ये दुरुस्ती करण्यात आली. ब) या विधेयकाद्वारे कायद्यामध्ये किशोरवयीन (पौंगडावस्था) मुले ही नवीन वर्गवारी समाविष्ट केली.
प्रश्न
21
अ) सामना या चित्रपटाची पटकथा अरुण साधू यांनी लिहिली. ब) सिंहासन या चित्रपटाची पटकथा जब्बार पटेल यांनी लिहिली.
प्रश्न
22
सुदूर संवेदनामध्ये (Remote Sensing) खालीलपैकी ……….. या गोष्टींचा वापर होतो.अ) जंबुपार किरणेब) सूक्ष्म लहरीक) अवरक्त किरणेड) चुंबकीय लहरी
प्रश्न
23
खालील विधानांचा विचार करा व चुकीचे विधान कोणते आहे ते ओळखा. अ) मुक्त नकाशे हे संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येतात. ब) या नकाशांना संरक्षण मंत्रालयाची संमती मिळाली की मुक्त नकाशे कोणीही वापरू शकते. क) हे नकाशे सर्वांसाठी उपलब्ध असतात.
प्रश्न
24
‘सामुहिक प्रोत्साहन योजने’ (Package Scheme of Incentives – 2013) चे उद्दिष्ट काय नव्हते?
प्रश्न
25
भारत सरकारने सन २००२ मध्ये कोणत्या विषयांची हाताळणी करण्यासाठी बालवीर पुंज यांच्या अध्यक्षतेखाली युवकांसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना केली होती?अ) युवकांच्या बेरोजगारीची विशेषतः उत्तर – पूर्वेकडील समस्येवर भर देणे.ब केंद्र सरकारच्या युवकांशी संबंधित राबवल्या जाणाऱ्या योजना – कार्यक्रम हे रोजगार निर्मितीमध्ये किती सक्षम आहेत याचे पुनरावलोकन करणे.क) नवीन राष्ट्रीय धोरणाच्या कृती योजनेच्या अंमलबजावणीबाबत उपाययोजना सुचविणे.यापैकी कोणते विधान बरोबर आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x