27 January 2025 2:56 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-25

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
आर्मड फोर्सेस स्पेशल पॉवर अॅक्ट म्हणजेच अफस्फा हा कायदा भारत सरकारने कधी मंजूर केला?
प्रश्न
2
काश्मिरीयत, जुमिरीयत आणि इंसारीयत हि घोषणा ……. या भारताच्या माजी पंतप्रधानाने केली होती.
प्रश्न
3
भारत सरकारचा सन २०१९ च्या व्यासनधीनता अहवालानुसार सर्वाधिक दारूचे व्यसन किंवा सेवन करणारी अनुक्रमे राज्य कोणती आहे?
प्रश्न
4
सन २०१८ साली मॅनबुकर पुरस्कार मिळालेल्या भारतीय व्यक्ती अरविंद अडीगा हे आहेत त्यांच्या …… या कादंबरीला मॅन बुकर पुरस्कार मिळाला.
प्रश्न
5
संयुक्त राष्ट्रसंघाची आम सभा दरवर्षी सप्टेंबर महिन्यात ……. या शहरात आयोजित केली जाते.
प्रश्न
6
मुला-मुलींच्या जन्मदराची नोंद ठेवण्यासाठी डिजिटल गुड्डा-गुड्डी बोर्ड हा उपक्रम ……… या जिल्ह्याने राबविला हा उपक्रम देश पातळीवर राबविला गेला.
प्रश्न
7
२६ जानेवरी २०१८ रोजीच्या दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील चित्ररथ स्पर्धेत प्रथम क्रमांक महाराष्ट्राच्या ……… या चित्ररथाला मिळाला होता.
प्रश्न
8
सध्या देशात निवडणुका लढविणारा सर्वात जुना राजकीय पक्ष कोणता?
प्रश्न
9
भारतातील उद्योजकांची कोणती शिखर संस्था आहे?
प्रश्न
10
खालील विधानाचा विचार करा आणि अयोग्य पर्याय निवडा.अ) सन २०१९ चे प्रवासी भारतीय संमेलन हे बनारस येथे आयोजित करण्यात आले होते.ब) सन २०१९ च्या १५ व्या प्रवाशी भारतीय दिनाला नाॅर्वे देशातील भारतीय वंशीय खासदार हिमांशू गुलाटी यांची विशेष उपस्थिती होती.क) सन २००३ साली पहिले प्रवासी भारतीय संमेलन नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले होते.ड) आज पर्यंत महाराष्ट्रात सन २००५ चे ३ रे प्रवाशी भारतीय संमेलन मुंबई येथे आयोजित करण्यात आले होते.
प्रश्न
11
अमेरीकेच्या नासा संस्थेने अवकाशाचा सखोल अभ्यास करण्यासाठी २५ ऑगस्ट २००३ रोजी सोडलेली दुर्बिण ……… आहे.
प्रश्न
12
नॅशनल एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरींग रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे नीरी हि संस्था ……… या शहरात आहे.
प्रश्न
13
खालीलपैकी अचूक विधान कोणते?अ) महाराष्ट्रातील हापूस आंब्याला भौगोलिक मानांकन मिळाले आहे.ब) देशातील ३२५ उत्पादनांना भौगोलिक मानांकन मिळाले आहे.क) महाराष्ट्रातील एकूण ३१ उत्पादनांना भौगोलिक मानांकन मिळाले आहे.
प्रश्न
14
खालील विधाने वाचा.अ) ३१ मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो.ब) ३१ मे २०१८ रोजीच्या जागतिक तंबाखू विरोधी दिनाची मुख्य संकल्पना होती तंबाखू आणि हृदयविकार
प्रश्न
15
अग्नी-५ या भारतीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची माराक क्षमता ……….. आहे.
प्रश्न
16
सन २०२२ हे वर्ष कोणत्या ऐतिहासिक घटनेचे अमृतमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे?
प्रश्न
17
खालील विधाने वाचा आणि अचूक विधान ओळखा.अ) महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे सुरु करण्यात आले होते.ब) आशिया खंडातील सर्वात मोठी औद्यागिक वसाहत पालघर जिल्ह्यातील तारापूर येथे आहे.क) रायगड जिल्ह्यातील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, न्हावाशेवा हे भारतातील सर्वात मोठे कंटेनर वाहतूक करणारे बंदर आहे.
प्रश्न
18
फिनटेक म्हणजे फायनान्शियल टेक्नॉलॉजी धोरण फेब्रुवारी २०१८ मध्ये जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
प्रश्न
19
युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या बहारीन देशातील मनामा येथे ३० जून २०१८ रोजी भरलेल्या ४२ व्या परिषदेत दक्षिण मुंबईतील ……. या स्थळाचा यादीत समावेश करण्यात आला.
प्रश्न
20
खालील विधानाचा विचार करा आणि योग्य विधान निवडा.अ) केंद्र सरकारच्या सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टीमच्या सन २०१६ च्या अहवालानुसार देशात सर्वात कमी बालमृत्यूदर केरळचा आहे.ब) देशात बालमृत्यूदरात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक आहे.क) महाराष्ट्रात बालमृत्यूदर २१ एवढा आहे.ड) भारताचा बालमृत्यूदर ३९ एवढा आहे.
प्रश्न
21
खालील विधाने वाचा आणि चूक विधान / ने कोणते?अ) भारतातील पहिले आधारकार्ड महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात देण्यात आले.ब) अधारकार्डचे जनक नंदन निलकेणी यांना म्हणतात.क) पहिले आधारकार्ड प्राप्त महिलेचे नाव रंजना सोनवणे हे आहे.ड) आधारकार्डवरील नंबर १२ अंकी असतो.
प्रश्न
22
खालील विधाने वाचा आणि चूक विधान ओळखा.अ) पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आहेत.ब) इम्रानखान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ हा आहे.क) पाकिस्तानचे राष्ट्रपती इब्राहिम महंमद सोलीह हे आहेत.ड) पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे प्रसिद्ध क्रिकेट खेळाडू आहेत.
प्रश्न
23
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सध्या ……. हे आहेत.
प्रश्न
24
योग्य पर्याय निवडा.अ) थेट विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर आहे.ब) देशात सर्वाधिक संघटीत क्षेत्रातील रोजगार निर्मितीत प्रथम क्रमांकाचे राज्य महाराष्ट्र आहे.क) देशात सर्वात जास्त आंतरजातीय विवाह महाराष्ट्रात होतात.
प्रश्न
25
भारतातील तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात तसेच आर्थिक विषमता दुर व्हावी तसेच सूक्ष्म, लघु मध्यम उद्योजकांना प्रोत्साहन देता यावे म्हणून भारत सरकारने सन २०१५ साली ……. हि योजना सुरु केली.

राहुन गेलेल्या बातम्या

x