25 December 2024 7:13 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-83

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
३ ते १४ डिसेंबर २०१९ या कालावधीत पार पडलेल्या ‘कोप इंडिया – २०१९’ या हवाई युध्द अभ्यासात भारतासहित कोणता देश सहभागी होता?
प्रश्न
2
‘लिथियम आयन सेल टेक्नॉलॉजी’ कोणाकडून विकसित करण्यात आली आहे?
प्रश्न
3
आवर्तसारणीतील ‘अंतर संक्रामक धातूं’मध्ये (Inner transition metals) खालीलपैकी कशाचा समावेश होतो?अ) लॅथेनाईड्सब) अॅक्टीनाईड्स
प्रश्न
4
खाली दिलेल्या गट अ मधील (व्यक्ती) पर्यायांच्या गट ब मधील (पुरस्कार) पर्यायांशी योग्य जोड्या जुळवा.खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.Question title
प्रश्न
5
‘गगनयान’ विषयी योग्य विधाने ओळखा.अ) हे भारताचे मानवी अवकाश अभियान असणार आहे.ब) आय. हट्टन हे या अभियानाचे प्रमुख आहेत.क) याद्वारे भारतीय अवकाशवीर ३५० ते 400 कि.मी. उंचीवर कमीतकमी एक आठवडा वास्तव्य करणार आहेत.
प्रश्न
6
प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी दिल्लीत आलेली तिन्ही सेनादलांची सैन्य पथके परत आपल्या मुख्यालयाकडे जातात याला ‘बिटिंग रिट्रीट सेरेमनी’ म्हटले जाते, हा दिवस दरवर्षी ……….. रोजी पार पडतो.
प्रश्न
7
विविध उपकरणे डिजिटल नेटवर्कद्वारे जोडली जाऊन मानवी हस्तक्षेपाशिवाय ती उपकरणे परस्परांमध्ये माहितीचे आदानप्रदान करू शकतात, या पद्धतीला काय संबोधले जाते?
प्रश्न
8
‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ क्षेत्रामध्ये प्रवेश करण्याच्या उद्देशाने ‘मॅरेथाॅन’ नामक उपग्रह प्रणाली कोणत्या अवकाश संशोधन संस्थेकडून प्रक्षेपित केली जाणार आहे?
प्रश्न
9
स्पेस एक्स या अंतराळ क्षेत्रातील खासगी कंपनीच्या सहाय्याने अलीकडेच कोणता भारतीय उपग्रह प्रक्षेपित केला गेला होता?
प्रश्न
10
योग्य पर्याय निवडा.अ) भारताचा पहिला ‘हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग उपग्रह’ इस्त्रोकडून २९ नोव्हेंबर रोजी प्रक्षेपित केला गेला.ब) हा उपग्रह ‘पी. एस. एल. व्ही-सी ४३’ प्रक्षेपकाच्या साहाय्याने प्रक्षेपित केला गेला.क) अब्दुल कलाम बेटावरून हा उपग्रह प्रक्षेपित केला गेला.
प्रश्न
11
भारत आणि जपान यांच्यात अलीकडेच झालेले हवाई युध्दसराव कोणत्या नावाने ओळखले गेले होते?
प्रश्न
12
अग्नी – ५ या क्षेपणास्त्रासंदर्भात चुकीचे विधान निवडा.
प्रश्न
13
खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.अ) ‘जी सॅट – ११’ हा उपग्रह १५ वर्षे कालावधीसाठी कार्य करणार आहे.ब) या उपग्रहामुळे भारतातील इंटरनेटचा वेग प्रचंड वाढणार आहे.
प्रश्न
14
‘कोकण – १८’ नौदल सरावाविषयी योग्य पर्याय निवडा.अ) या संयुक्त नौदल सरावात भारत आणि इंग्लंड हे देश सहभागी होतात.ब) हा सराव २८ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत गोवा किनारपट्टी भागात पार पडला.
प्रश्न
15
‘एक्सिड सॅट-१’ संदर्भात योग्य पर्याय ओळखा.अ) स्पेस एक्स या अंतरीक्ष क्षेत्रातील कंपनीच्या ‘फाल्कन ९’ या प्रक्षेपकाद्वारे डिसेंबर २०१८ मध्ये पाठविलेल्या उपग्रहांमध्ये समावेश होता.ब) एक्सिड स्पेस या भारतीय खासगी कंपनीचा हा उपग्रह आहे.
प्रश्न
16
‘अॅडमिरल कप सेलिंग रेगाटा – २०१८’ संदर्भात योग्य विधाने निवडा.अ) जगातील सर्वात भव्य अशा या लष्करी नौकायन स्पर्धेचे आयोजन डिसेंबर २०१८ मध्ये एझीमाला (केरळ) येथील नौसेना अकादमीत केले गेले.ब) या स्पर्धेत ३१ देशातील ३२ संघांनी सहभाग घेतला होता.क) २०१० पासून भारतीय नौसेनेकडून या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे.
प्रश्न
17
योग्य पर्याय ओळखा.अ) भारताचा पहिला हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग उपग्रह (HysIS) नोव्हेंबर २०१८ मध्ये श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपित केला गेला.ब) हा उपग्रह 400 ते २५०० नॅनोमीटर तरंगलांबीच्या बॅडविड्थमध्ये कार्य करणार आहे.क) हा प्रगत-भू निरीक्षण उपग्रह आहे.
प्रश्न
18
इस्त्रोने भविष्यातील मानवी अवकाश अभियानासाठीच्या तयारीकरिता ‘ह्युमन स्पेस फ्लाईट सेंटर’ कोणत्या ठिकाणी सुरु केले आहे?
प्रश्न
19
जी सॅट – ११ संदर्भात योग्य पर्याय निवडा.अ) हा भारताचा सर्वाधिक अवजड दळणवळण उपग्रह आहे.ब) ५ डिसेंबर २०१८ रोजी याचे प्रक्षेपण गयाना येथील कौरोऊ तळावरून केले गेले.क) ‘एरियन ५ व्ही-२४६’ चा प्रक्षेपकाच्या साहाय्याने याचे प्रक्षेपण केले गेले.ड) ५ हजर ८५४ किलो वजनाचा हा उपग्रह आहे.
प्रश्न
20
४९ व्या इफ्फी चित्रपट महोत्सवामध्ये आयसीएफटी युनेस्को गांधी पदक प्रवीण मोरछले यांच्या कोणत्या चित्रपटाला मिळाले?
प्रश्न
21
‘हनी मिशन’ अंतर्गत मधमाशी पालनाला प्रोत्साहन दिले जात आहे, याचा भाग म्हणून देशभरात सहा ठिकाणी ‘मधमाशांची नर्सरी’ उभारल्या जाणार त्यापैकी महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी या नर्सरी असतील?अ) डहाणूअ) महाबळेश्वरक) मेळघाट
प्रश्न
22
भारतीय बनावटीच्या लाईट युटीलिटी हेलिकॉप्टर अतिउंचीवरील चाचणी अलीकडेच यशस्वी ठरली आहे. सध्या भारतीय भूदल या श्रेणीतील कोणते हेलिकॉप्टर वापरत आहेत?
प्रश्न
23
योग्य पर्याय ओळखा.अ) २६ व्या राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेचे आयोजन ओदिशात भुवनेश्वर येथे केले गेले.ब) ‘स्वच्छ, हरित आणि आरोग्यसंपन्न देशासाठी विज्ञान आणि नवकल्पना’ हा या परिषदेचा विषय होता.
प्रश्न
24
‘एक्सिड स्पेस’ संदर्भात योग्य पर्याय निवडा.अ) ही कंपनी यशस्वीपणे अंतरिक्षात उपग्रह पाठविणारी पहिली भारतीय खासगीरीत्या निधी प्राप्त स्टार्टअप आहे.ब) या कंपनीने पाठविलेला ‘एक्सिड सॅट-१’ हा भारताचा पहिला प्रक्षेपित संपूर्ण खासगी उपग्रह आहे.
प्रश्न
25
इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अॅप्लाईड केमिस्ट्री (IUPAC) चे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x