25 December 2024 6:48 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-95

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
आमदारांच्या उत्पन्नासंबंधीच्या ‘नॅशनल इलेक्शन वॉच’ च्या अहवालानुसार भारतात सर्वात कमी सरासरी वार्षिक उत्पन्न कोणत्या राज्यातील आमदारांचे आहे?
प्रश्न
2
तेलंगणातील शेतकऱ्यांसाठीच्या ‘रयतूबंधू’ योजनेच्या धर्तीवर कोणत्या राज्याने ‘कृषकबंधू’ योजना सुरु केली?
प्रश्न
3
खालीलपैकी कोणाचा मृत्यू दिवस पंजाबमध्ये हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो?अ) भगतसिंगब) शिवराम राजगुरूक) सुखदेव थापर
प्रश्न
4
१२ जानेवारी १९३१ रोजी खालीलपैकी कोणास फाशी दिली गेली होती?अ) अब्दुल कुर्बान हुसेनब) मल्लाप्पा धनशेट्टीक) श्री किसन सारडाड) जगन्नाथ शिंदे
प्रश्न
5
रफाल लढाऊ विमानांच्या व्यवहारात सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. भारत फ्रान्सकडून खरेदी करत असलेली ही विमाने कोणत्या श्रेणीत येतात?
प्रश्न
6
अभिनेते रमेश भाटकर यांनी खालीलपैकी कोणत्या नाटकात भूमिका साकारल्या होत्या?अ) मला काही सांगायचंयब) केव्हातरी पहाटेक) अखेर तू येशीलचड) राहू, केतूइ) मुक्ता
प्रश्न
7
अभिनेते रमेश भाटकर यांच्या संदर्भात अयोग्य विधान ओळखा.अ) प्रसिध्द गायक – संगीतकार स्नेहल भाटकर यांचे ते पुत्र होते.ब) न्यायमूर्ती मृदुला भाटकर या त्यांच्या पत्नी आहेत.क) द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.
प्रश्न
8
पाहिल्या भारत – रशिया सामरिक आर्थिक संवादाचे आयोजन …… या ठिकाणी करण्यात आले होते, ज्यामध्ये द्विपक्षीय आर्थिक सहकार्य वाढवण्यावर चर्चा केली गेली.
प्रश्न
9
खालीलपैकी कोणत्या कवितासंग्रहाचे लेखन वसंत डहाके यांनी केले आहे?अ) योगभ्रष्टब) शुभवर्तमानक) शुनःशेपड) वाचाभंग
प्रश्न
10
संवेदनशील आदिवासी गटांच्या कल्याणासाठी कोणत्या राज्याने ‘जिबन संकल्प प्रोजेक्ट’ ही योजना सुरु केली आहे?
प्रश्न
11
खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो?
प्रश्न
12
योग्य विधाने निवडा.अ) महात्मा गांधींचा जन्मदिन हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो.ब) महात्मा गांधी यांचे १९४८ साली निधन झाले.
प्रश्न
13
नील अर्थव्यवस्था आणि शाश्वत विकासासाठीचा २०३० अजेंडा या संकल्पनेवर आधारित पहिली शाश्वत नील अर्थव्यवस्था परिषद …….. येथे आयोजित केली गेली होती.
प्रश्न
14
नागरिकांना लागू होणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती व्यक्ती अनुरूप स्वरुपात पोहोचविण्यासाठी कोणत्या वेबपोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे?
प्रश्न
15
रमेश भाटकर यांचे नुकतेच निधन झाले त्यांच्या संदर्भात योग्य विधान ओळखा.अ) ‘हेलो इन्स्पेक्टर’ आणि ‘कमांडर’ या टी. व्ही. मालिकांतील त्यांचा अभिनव विशेष गाजला होता.ब) काशिनाथ घाणेकर त्यांच्यानंतर ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकात त्यांनीच ‘लाल्या’ ही भूमिका साकारली होती.क) त्यांना २०१४ साली पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले.
प्रश्न
16
खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा.अ) भारताची खनिज तेलाची २५ टक्के गरज देशांतर्गत उत्पादनातून भागते.ब) असे असले तरी तेलाच्या शुद्धीकरणाच्या बाबतीत भारत जगातील आघाडीचा देश आहे.
प्रश्न
17
समाजातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत वर्गातील बेरोजगार युवकांसाठी कोणत्या राज्य सरकारने ‘युवा स्वाभिमान योजना’ सुरु केली आहे. ज्याद्वारे रोजगार उपलब्ध केला जाणार.
प्रश्न
18
खालीलपैकी कोणते आव्हान भारताच्या ऊर्जा सुरक्षेला जाणवत आहे?
प्रश्न
19
‘विशेष संवेदनशील आदिवासी समूह’ (PVTG’S) या अतिमागास आदिवासी प्रकार गटाची व्याख्या कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार करण्यात आली होती?
प्रश्न
20
केंद्र सरकारने १ फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या २०१९-२० च्या हंगामी अर्थसंकल्पात देशाच्या संरक्षण क्षेत्रासाठी ……… रुपयांची तरतूद केली आहे.
प्रश्न
21
शिरूर तालुक्यातील दहिवंडी गावचे ‘सय्यद शब्बीर सय्यद बुडन’ अर्थात शब्बीरभाई यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले गेले ते ……… म्हणून प्रसिध्द आहेत.
प्रश्न
22
गुरु पद्मसंभव यांच्यासंदर्भात योग्य विधाने ओळखा.अ) त्यांनी ८ व्या शतकात हिमालयातील परिसरात बौद्धधर्माचा प्रसार – प्रचार केला होता.ब) त्यांना भूतानमध्ये गुरु रिनपोचे म्हणून ओळखले जाते.क) भारतात जन्मलेले पद्मसंभव हे ‘दुसरे बुद्ध’ म्हणून ओळखले जाते.
प्रश्न
23
२०१९-२० साठीच्या हंगामी अर्थसंकल्पानुसार वित्तीय तुटीचे लक्ष ३.५ टक्क्यांवरून ………. करण्यात आले आहे.
प्रश्न
24
पंचायत प्रशासन आणि विकास कार्यात उत्कृष्ट काम केल्याबद्दल यशवंत पंचायत राज अभिनयात कोणती जिल्हा परिषद सर्वोत्कृष्ट ठरली आहे?
प्रश्न
25
ब्रॉडकास्टिंग ऑडियन्स रिसर्च कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x