21 December 2024 10:28 PM
अँप डाउनलोड

जळगाव जिल्हा पोलीस भरती २०१७

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
आर्थीक आणीबाणी राज्य घटनेच्या कोणत्या कलमाद्वारे लावता येते?
प्रश्न
2
एका नळाने एक टाकी ४ तासात भरते पण त्या टाकीस छिद्र असल्याने पूर्ण पाण्याने भरलेली टाकी ६ तासात रिकामी होते. जर नळ चालू केल्यास ती टाकी किती तासात भरेल?
प्रश्न
3
महापौर आपला राजीनामा ……… यांना सादर करतात.
प्रश्न
4
अणुकेंद्रकात कोणाचा समावेश असतो?१) प्रोटाॅन २) इलेक्ट्रॉन ३) न्युट्रॉन
प्रश्न
5
एका सांकेतिक भाषेत CAT हा शब्द DBU असा लिहला तर त्याच सांकेतिक भाषेत SPM कसा लिहणार.
प्रश्न
6
आंतरराष्ट्रीय वार रेषेशी ……..हे रेखावृत्त संबंधित आहे.
प्रश्न
7
सचिन तेंदुलकर यांच्या आत्मचरित्राचे नाव काय?
प्रश्न
8
बेरीज करा. 12345 + 1234 + 123 + 12 + 1 =?
प्रश्न
9
जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो?
प्रश्न
10
…….. ला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणतात.
प्रश्न
11
नोटाबंदीची घोषणा कधी करण्यात आली?
प्रश्न
12
महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव कोणते?
प्रश्न
13
देशाचे सरसेनापती कोण असतात?
प्रश्न
14
मराठी व्याकरणात शब्दाच्या एकूण ……… जाती आहेत.
प्रश्न
15
खालील आकृतीत एकूण किती चौकोन आहेतQuestion title
प्रश्न
16
एका दुकानदाराने एक वस्तू १४० रु. ला विकल्यामुळे त्यास शे. ३० रु. तोटा झाला. तर पुस्तकाची मूळ किंमत किती?
प्रश्न
17
गुडघ्याचा सांधा हा ……. होय.
प्रश्न
18
महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभयनिदर्शक म्हणून …… हे चित्र आहे.
प्रश्न
19
आंतरराष्ट्रीय योग दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो?
प्रश्न
20
भारतात प्रकाशित झालेले पहिले वर्तमानपत्र कोणते?
प्रश्न
21
श्री. शरद पवार यांना २०१७ मध्ये कोणता पुरस्कार मिळाला.
प्रश्न
22
४ वर्षानंतर रामचे वय श्यामच्या वयाच्या दुप्पट होईल. त्यांच्या आजच्या वयांची बेरीज ४६ आहे तर श्यामचे आजचे वय किती?
प्रश्न
23
मंगळ हा …….. आहे.
प्रश्न
24
शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंताचे ………हे काम होते.
प्रश्न
25
Question title
प्रश्न
26
अर्णवची आई ही सरलाची मामी लागते, तर सरलाची आई ही अर्णवच्या आईची कोण?
प्रश्न
27
जेव्हा कुटुंबाचे उत्पन्न खर्चापेक्षा जास्त असते तेव्हा त्यास …….. अंदाजपत्रक म्हणतात.
प्रश्न
28
पोलीस खात्यातील …….. हे पद केवळ पदोन्नतीनच भरले जाते.
प्रश्न
29
लयबद्धता ओळखा. def_ef__fdefde_
प्रश्न
30
…….. ह्या शहरामध्ये पोलीस आयुक्तालय नाही.
प्रश्न
31
वारंवार हे कोणत्या प्रकारचे क्रिया विशेषण अव्यय आहे.
प्रश्न
32
एक भांडे ३/७ पट भरण्यास १ मिनीट लागतो तर ते भांडे पूर्ण भरण्यास किती मिनीटे लागतील?
प्रश्न
33
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल …….. हे आहेत.
प्रश्न
34
शिर्षासन केलेल्या अवस्थेत महेशचा डावा हात जर उत्तर दिशा दाखवत असेल तर त्याचा चेहरा कोणत्या दिशेस आहे?
प्रश्न
35
एका विद्यार्थ्याचे बरोबर प्रश्नांच्या दुप्पट प्रश्नांचे उत्तर चूक येते, तर ५१ प्रश्नांपैकी त्याचे किती प्रश्न बरोबर आहे?
प्रश्न
36
सात क्रमवार विषम संख्यांची सरसरी २९ आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
प्रश्न
37
नीती (नॅशनल इन्स्टीट्युट ऑफ ट्रान्सफार्मिग इंडिया) आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली?
प्रश्न
38
जळगाव जिल्ह्यातील चांगदेव या ठिकाणी …… या नद्यांचा संगम होतो.
प्रश्न
39
१० मजूर रोज १२ तास काम करून एक काम २५ दिवसात पूर्ण करतात तर १५ मजूर रोज ८ तास काम करून ते काम किती दिवसात संपवतील?
प्रश्न
40
विजेच्या बल्बमध्ये …… या धातुची तार वापरतात.
प्रश्न
41
जर ७ सुतार ७ टेबल ७ दिवसात बनवितात तर १ सुतार १ टेबल किती दिवसात बनवेल?
प्रश्न
42
१०:१० वाजता घड्याळाचा तासकाटा  व मिनिटकाटा यात किती अंशाचा कोन असेल?
प्रश्न
43
…… हे कर्मधारय समासाचे उदाहरण नाही.
प्रश्न
44
३० खेळाडू मागे १ प्रशिक्षकांची नेमणूक झाली तर अशा १५ प्रशिक्षकांची नेमणूक झाल्यास एकूण किती खेळाडू होतील?
प्रश्न
45
राम आंबा खातो या वाक्यातील प्रयोग ओळखा.
प्रश्न
46
तापी-पूर्णा खोरे हा …. आहे.
प्रश्न
47
अप्रत्यक्ष कराचा अंतिम करभार कोणावर पडतो.
प्रश्न
48
पानिपतच्या तिसऱ्या युद्धात कोणी मराठ्यांना मदत केली?
प्रश्न
49
8118 चे 2/9 =?
प्रश्न
50
द.सा.द.शे. काही दराने २५०० रु. चे २ वर्षाने ४०० रु. सरळ व्याज मिळते तर व्याजचा दर किती?
प्रश्न
51
गणेशचे आजचे वय दीपकच्या वयाच्या दुप्पट आहे. दोघांच्या आजच्या वयाची बेरीज ४५ वर्ष असल्यास गणेशचे ५ वर्षानंतरचे वय किती?
प्रश्न
52
उद्या पूजा आहे. पुढील आठवड्यात त्याच वारी दिवाळी येते. आज सोमवार आहे. तर दिवाळीनंतरच्या दिवशी कोणता वार असेल?
प्रश्न
53
जळगाव जिल्ह्यातील फेकरी येथे काय आहे?
प्रश्न
54
गंधका सोबत रबर तापवून ते कठीण बनविण्याच्या क्रियेस काय म्हणतात?
प्रश्न
55
संगणकीय भाषेत WWW चा अर्थ काय?
प्रश्न
56
स्थायुरूप पदार्थाचे द्रव न होता थेट वायू अवस्थेत रुपांतर होणे या अवस्थांतराला ……. म्हणतात.
प्रश्न
57
लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. ( अलंकार ओळखा. )
प्रश्न
58
दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना ……. रंगाची शिधापत्रिका असते.
प्रश्न
59
…… हे कार्बनचे अपरूप नाही.
प्रश्न
60
छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये …….. हा राजनीतीवर ग्रंथ रचला.
प्रश्न
61
‘ज्ञ’ संयुक्त व्यंजन …….. असे लिहिता येईल.
प्रश्न
62
नितीन करणपेक्षा उंच आहे करण जयेश पक्ष उंच आहे. जयेशपेक्षा तनय उंच आहे. परंतु तनय हा करण पेक्षा लहान आहे तर सर्वात लहान कोण?
प्रश्न
63
पाण्याची महत्तम घनता ….. या तापमानास असते.
प्रश्न
64
खालील आकृतीत त्रिकोनांची संख्या किती?Question title
प्रश्न
65
अरेच्या! मामा पण आलेत इकडे. ( अधोरोखीत शब्दाची जात ओळखा. )
प्रश्न
66
‘उंबराचे फुल’ या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
प्रश्न
67
२०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता …… प्रति चौरस कि.मी. आहे.
प्रश्न
68
…….. स्वयंपोशी वनस्पती नाही.
प्रश्न
69
भारताचा पहिला अंतराळवीर कोण?
प्रश्न
70
योग्य जोड्या लावा.स्तंभ ‘अ’                             स्तंभ ‘ब’१. कार्बन डाय आॅक्साईड            (अ) मृदेची निर्मिती२. ऑक्सीजन                         (ब) पाऊस३. बाष्प                              (क) वनस्पती व अन्न निर्मिती४. सुक्ष्मजीव                          (ड) ज्वलन
प्रश्न
71
पूर्वी आम्ही विहिरीचे पाणी प्यायचो. ( अधोरेखित क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. )
प्रश्न
72
आईने पोळ्या वाढल्या आणखी वर तुपाची धार सोडली. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
प्रश्न
73
राज्य शासनाच्या कायदे मंडळामध्ये कोणाचा समावेश होत नाही?
प्रश्न
74
समानार्थी शब्द निवडा. सिंह
प्रश्न
75
भारताच्या मध्यातून काय गेले आहे?
प्रश्न
76
JEEP = 36 तर POOR म्हणजे किती?
प्रश्न
77
सुरेश पूर्वेकडे ४ कि.मी चालत गेला नंतर डावी कडे वळून ३ कि.मी. चालत गेला तर मूळ स्थानापासून तो आता किती अंतरावर आहे?
प्रश्न
78
योग्य क्रम लावा. १) क्रिप्स योजना २) राजाजी योजना ३) वेव्हेल योजना ४) त्रीमंत्री योजना
प्रश्न
79
पॅरा ऑलम्पीक स्पर्धा २०१६ मध्ये रौप्यपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली?
प्रश्न
80
१९३६ सालच्या फैजपूर येथील राष्ट्र्सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष …….. हे होते.
प्रश्न
81
सध्या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण?
प्रश्न
82
‘जमदग्नी’ या शब्दाचा अर्थ सांगा.
प्रश्न
83
कोणत्या राज्यात पारंपारीक क्रीडा प्रकार जलीकट्टू संदर्भात जानेवारी २०१७ मध्ये आंदोलन झाले?
प्रश्न
84
पोलीस स्मृतिदिन केव्हा असतो?
प्रश्न
85
‘अटकेपार झेंडा लावणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ काय.
प्रश्न
86
बिहु हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे?
प्रश्न
87
…….. नुसार पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते.
प्रश्न
88
एका संख्येचे ४०% म्हणजे १२.८ होतात तर ती संख्या कोणती?
प्रश्न
89
…….. हा रस्त्याचा प्रकार नाही.
प्रश्न
90
राष्ट्रीय पोलीस अकादमी कोठे आहे?
प्रश्न
91
दुरात्मा या शब्दाचे संधी विग्रह ओळखा.
प्रश्न
92
दिपकचा पगार सुरुवातीस १५% ने वाढवला पण नंतर २०% नी कमी केला तर पगारात एकूण शेकडा वाढ किंवा घट किती झाली?
प्रश्न
93
Question title
प्रश्न
94
विरुद्धार्थी शब्द सांगा. कृपण
प्रश्न
95
जानेवारी २०१७ मध्ये भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आलेल्या स्काॅर्पियन पाणबुडीचे नाव काय?
प्रश्न
96
१९४२ च्या आंदोलनाच्या काळात नंदुरबार येथे ……… या शाळकरी विद्यार्थ्याने हौतात्म्य स्वीकारले.
प्रश्न
97
८ हि संख्या ०.२ च्या किती पट आहे.
प्रश्न
98
अर्थशास्त्र हे …….. शास्त्र आहे.
प्रश्न
99
मोकळ्या जागी ती संख्या लिहा.Question title
प्रश्न
100
क जीवनसत्वाच्या आभावाने ……. हा विकार होतो.

राहुन गेलेल्या बातम्या

x