28 January 2025 9:42 AM
अँप डाउनलोड

MPSC ASST पूर्व परीक्षा (१५ जून २०१४)

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 98 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालील आदिवासी जमातींच्या त्यांच्या राहण्याच्या प्रदेशानुसार जोड्या जुळवा व  खालील पर्यायांमधून योग्य उत्तर निवडा:प्रमुख आदिवासी           राहात असलेल्याजमाती                       प्रदेश(अ) गोंड                    १) अमरावती जिल्हा(ब) भिल्ल                   २) ठाणे जिल्हा(क)कोरकू                   ३) धुळे व नंदूरबार जिल्हे(ड) वारली                   ४) चंद्रपूर व गडचिरोली जिल्हे
प्रश्न
2
आधुनिक मानवापेक्षा कोणत्या मानवाच्या पूर्वजामध्ये कर्पारगुहिकेची क्षमता अधिक होती?
प्रश्न
3
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते?
प्रश्न
4
२००८-२००९ वर्षाशी तुलना केली असता २०१२ -१३ साली भारतातील २००४-०५ च्या किमतीवर आधारित वास्तव स्थूल देशांतर्गत उत्पादनातील विविध क्षेत्रांच्या वाट्यातील प्रवृत्ती (कल) खालीलप्रमाणे दिसून येतो: (अ) कृषी क्षेत्राच्या वाट्यात (हिस्सा) घट झाली. (ब) उद्योगक्षेत्राच्या वाट्यात वाढ झाली. (क) सेवा क्षेत्राच्या वाट्यात वाढ झाली. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
प्रश्न
5
विषुववृत्तीय सदाहरित जंगलासंबंधी खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य बरोबर आहे? (अ) अत्यंत दाट आहेत. (ब) वार्षिक पानगळ होते. (क) लाकूड टणक आणि टिकाऊ आहे. (ड) एकाच प्रकारच्या वृक्षांची नसतात.
प्रश्न
6
ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापारविषयक मक्तेदारी कोणत्या कायद्यान्वयी संपुष्टात आली?
प्रश्न
7
‘न्यु मूर’ या बेटावरून सध्या कोणत्या दोन देशांमध्ये वाद सुरु आहे ?
प्रश्न
8
पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्रशाळा सुरु केली?
प्रश्न
9
कमाल जमीन धारणा कायदा दोन टप्प्यांमध्ये लागू करण्यात आला.
प्रश्न
10
कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगात आहेत?
प्रश्न
11
अमितने आपल्या ३/५ पगाराचा हिस्सा घरी दिला. उरलेल्या हिस्स्यांपैकी निम्मा शेतीसाठी खर्च केला. उरलेल्या पैकी निम्मा मुलाला दिला व बाकीची रक्कम पोस्टात जमा केली. जर त्याने पोस्टात रु600 जमा केले, तर त्याचा पगार किती?
प्रश्न
12
१८९० मध्ये स्थापन केलेल्या राष्ट्रीय सभेच्या ब्रिटीश समितीमध्ये पुढीलपैकी कोणत्या व्यक्ती सहभागी झाल्या होत्या?
प्रश्न
13
शर्वरीचा जन्म बुधवार दिनांक ५ सप्टेंबर २००१ ल झाला. तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या दिवशी येईल?
प्रश्न
14
खालील विधाने विचारात घ्या: अ) उत्तर अमेरिका मुक्त व्यापार करार(NAFTA) १९९४ साली अस्तित्वात आला. ब) फ्रान्स हा NAFTA च्या संस्थापक सदस्यांपैकी एक होता. वरीलपैकी कोणते विधान/ विधाने चूक आहे / आहेत?
प्रश्न
15
झुम्पा लहरी यांच्याविषयी खालीलपैकी कोणते विधान सत्य ठरेल?
प्रश्न
16
खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो?
प्रश्न
17
१.१.२०१४ रोजी महाराष्ट्रातील नोंदणीकृत मतदारांची संख्या होती.
प्रश्न
18
जर EXCEL=93596 असेल, PAINT=74128 असेल, तर ACCEPT=?
प्रश्न
19
‘प्लँनिंग अॅण्ड दि पुअर’ या ग्रंथाचे लेखन कोणी केले?
प्रश्न
20
शाळेतील २८८ मुलांना रांगेत उभे राहण्यास सांगितले. प्रत्येक रांगेत जेवढी मुले आहेत त्याच्या निमपट रांगांची संख्या आहे. तर प्रत्येक रांगेत किती मुले आहेत?
प्रश्न
21
ब्रास ह मिश्रधातू खालीलपैकी कोणत्या घटकांनी बनलेला असतो?
प्रश्न
22
पानांवरील केवडा रोग कोणत्या खनिज द्रव्याच्या अभावामुळे होतो?
प्रश्न
23
जोड्या लावून उत्तराचा योग्य पर्याय निवडा. (अ) एम. जी. रानडे १) जमखिंडी (ब) जी. जी. आगरकर २) टेंभू (क) वी. आर. शिंदे ३) पुणे (ड) जी. एच. देशमुख ४) निफाड
प्रश्न
24
जोड्या लावा: गट अ गट ब (अ)गॅट १) १९८६ (ब)उरुग्वे २) १९९३ (क)डंकेल प्रस्ताव ३) १९४८ (ड) विश्व व्यापार संघटना ४) १९९५
प्रश्न
25
देशातील घन कचऱ्यापासून ऊर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरु केला आहे?
प्रश्न
26
A शहरात 52000 लोकांपैकी ०.३०% व्यक्तींकडे मोटार कार आहे. B शहरात 48000 लोकांपैकी ०.25% व्यक्तींकडे मोटार कार आहे. C शहरात 50000 लोकांपैकी 300 व्यक्तींकडे मोटार कार आहेत.तर खालील कोणत्या सांकेतिक चिन्हाने यांचे संबंध दर्शविता येईल?
प्रश्न
27
२०१३-२०१४ च्या भारताच्या अर्थसंकल्पीय अंदाजा प्रमाणे एकूण राजकोषीय तूट स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या ४.८ प्रतिशत पर्यंत योजनापूर्वक कमी करण्याचे पुढील प्रयत्नाद्वारे साध्य करणे अपेक्षित होते: (अ) निर्गुंतवणूकीच्या प्राप्ती अधिक चालना देणे. (ब) कर महसूल आणि दूरसंचरण क्षेत्रातील प्राप्ती अधिक चालना देणे. (क) अर्थसहाय्यावरील खर्चात कपात करणे. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?
प्रश्न
28
पुढीलपैकी कोणती व्यक्ती/ कोणत्या व्यक्ती १८५७च्या उठावाशी संबंधित नाही/नाहीत? (अ) पेठचा राजा भगवंतराव (ब) अजीजन नर्तिका (क) गुलमर दुबे (ड) काश्मीरचा राजा गुलाबसिंह
प्रश्न
29
खालीलपैकी कोणता घटक भारताच्या वायव्य भागात हिवाळ्यात पाऊस पडण्यास कारणीभूत ठरतो?
प्रश्न
30
भूमि अधिग्रहण, पुनर्वसन पारदर्शकता आणि योग्य मोबदला कायदा-२०१३ मधील खालील तरतुदींचा विचार करा: (अ) भूमि अधिग्रहणासाठी संबंधित सर्व शेतकऱ्यांची संमती आवश्यक आहे (ब) अधिगृहीत केलेली जमीन पाच वर्षांपर्यंत वापरात आणली नाही तर मूळ मालकाला परत केली जाईल. (क)पुनर्वसनानंतरच भूमि अधिग्रहण करता येईल. (ड) ग्रामीण क्षेत्रात भूमि मालकाला बाजारभावाच्या चार पटीने, तर शहरी भागात दुपटीने मोबदला दिला जाईल. वरील विधानांपैकी कोणते/कोणती विधाने बरोबर आहेत?
प्रश्न
31
ग्रामसभेसंबंधीच्या खालील विधानांचा विचार करा: (अ) तो पंचायती राज्यातील सर्वात कनिष्ठ स्तर आहे. (ब) ७३ व्या राज्यघटना दुरुस्तीने तिला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला आहे (क) ग्रासभेत, ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या सर्व पात्र मतदारांचा समावेश होतो. (ड) वित्तीय वर्षामध्ये ग्रामसभेच्या चार बैठका घ्याव्या लागतात. वरीलपैकी कोणते/ कोणते विधाने बरोबर आहेत?
प्रश्न
32
मुस्लिम लीगने ‘मुक्ति दिन’ केव्हा साजरा केला?
प्रश्न
33
कॅबिनेट मिशन योजने’ संदर्भात जुळणी करा. (अ) निवडावयाची एकूण सदस्यसंख्या १)२९२ (ब) संस्थानिक-राज्यांचे प्रतिनिधी २)४ (क) उच्च आयुक्तांचे प्रांत प्रतिनिधी ३)९३ (ड) प्रांतांचे प्रतिनिधी ४)३८९
प्रश्न
34
उद्देशपत्रिकेची खालील वर्णने आणि विद्वान यांची जुळणी करा . (अ) राजकीय कुंडली १)पंडित ठाकूरदास भार्गव (ब) कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्त्वे २)एम.व्ही. पायली (क) उत्क्रुष्ट गद्य-काव्य ३)क.एम. मुन्शी (ड) अशा प्रकारचा केलेला एक सर्वोत्तम मसुदा ४)आचार्य जे.बी. कृपलानी
प्रश्न
35
महाराष्ट्रात लॉ युनिव्हर्सिटीची स्थापना कुठे करण्यात येणार नाही?
प्रश्न
36
साहित्य अकादमी पुरस्कार, २०१३ मराठीसाठी निवड समितीचे सदस्य कोण होते? (अ) डॉ. सदानन्द मोरे (ब) डॉ. नागनाथ कोत्तापल्ले (क) वसंत आबाजी डहाके (ड) प्रो. विलास खोले
प्रश्न
37
वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक गुणांवर आधारित सर्वात चांगली आणि लोकप्रिय पद्धती खालीलपैकी कोणी शोधून काढली?
प्रश्न
38
‘पंडिता रमाबाईशी’ निगडित चुकीचे विधान ओळखा.
प्रश्न
39
विरंजक चूर्ण वापरून पाण्याला निर्जन्तुक करताना, निर्जन्तुक प्रक्रिया कशामुळे होते? अ) क्लोरीन वायू ब) हायपोक्लोरस आम्ल क) नवजात आॅक्सीजन ड) कार्बन डायऑक्साईड
प्रश्न
40
पुढील कोणते विधान योग्य आहे? अ) हरितक्रांती पूर्व काळात भारताने अन्नधान्याची आयात PL-480 या कायद्यानुसार केली होती. ब) PL-480 कायद्यानुसार केलेल्या आयातीत मुख्य हिस्सा गहू या अन्नधान्याचा होता.
प्रश्न
41
पुढील घटनांची कालानुक्रमे मांडणी करा: (अ) नेहरू रिपोर्ट (ब) सायमन कमिशन (क) मुडीमन कमिशन (ड) प्रांतीय द्विदलशासन पद्धती
प्रश्न
42
अ) अतिनील किरणांचा भाग हा गर्द जांभळ्या रंगाच्या ‘तरंग लांबी’ पेक्षा लहान ‘तरंग लांबी’चा वर्णपट भाग आहे. ब) ‘इन्फ्रारेड’ भाग हा लाल रंगापेक्षा कमी ‘तरंग लांबी’ वर्णपटाचा भाग आहे. क) एका त्रिकोणाकृती घनाच्या द्रव्यासाठी, वक्रीभवन – निर्देशांक, वेगवेगळ्या रंगांसाठी वेगवेगळा असतो. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
प्रश्न
43
जोड्या लावा. गट अ अ) एम.आर.टी.पी. कायदा ब) स्पर्धा कायदा गट ब (१) २००२ (२) १९६९ (३) पक्षपाती व्यापार पथांना बंदी (४) स्पर्धाविषयक गुन्हे यांची व्याख्या दिली.
प्रश्न
44
ग्रामपंचायतीच्या सरपंचाबाबतच्या खालील विधानांचा विचार करा: (अ) तो ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख असतो. (ब) ग्रामपंचायतीच्या बैठकी बोलावतो व अध्यक्षस्थान भूषवितो. (क) ग्रामपंचायतीच्या ठरावांची व निर्णयांची अंमलबजावणी करतो (ड) अकार्यक्षमता, अयोग्यवर्तन व भ्रष्टाचार या कारणावरून जिल्हा परिषदेची स्थायी समिती त्याला पदभ्रष्ट करू शकते. वरीलपैकी कोणते / कोणती विधाने बरोबर आहेत ?
प्रश्न
45
अ. नैसर्गिक वायू हा हायड्रोजन व कार्बन यांचे संयुग असतो. ब. मिथेन हे, हायड्रोजन व कार्बनचे संयुग नसते. क. नैसर्गिक वायू हे ‘वनस्पती व प्राणी’ जन्य इंधन आहे. वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत?
प्रश्न
46
भारतीय घटनेतील १२० वी दुरुस्ती विधेयक कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
प्रश्न
47
राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ व ७ खालीलपैकी कोणत्या शहरात एकमेकांना छेदतात ?
प्रश्न
48
खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा:
प्रश्न
49
‘द ग्रेट रिबेलीयन’ या पुस्तकाचे लेखक कोण?
प्रश्न
50
मानवी विकास निर्देशांक हा यातील सरासरी यशाचे मापन करतो. (अ) दीर्घ आणि निरोगी आयुष्य. (ब) प्रौढ साक्षरतेच्या संदर्भातील ज्ञान. (क)दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येची टक्केवारी.
प्रश्न
51
१९ व्या शतकामध्ये भारतीय इतिहासाची पहिल्यांदा आर्थिक दृष्टीकोनातून कोणी मांडणी केली आहे? (अ) दादाभाई नौरोजी (ब) न्या एम.जी.रानडे (क) रोमेशचंद्र दत्त (ड) आर.सी. मजुमदार
प्रश्न
52
तुटीच्या अर्थभरणा करण्याचे खालीलपैकी कोणते आधुनिक उद्दिष्ट नाही?
प्रश्न
53
प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी कोणता आकडा येईल ?Question title
प्रश्न
54
चौरस पूर्ण करण्यासाठी प्रश्नचिन्हांच्या (?)ठिकाणी नसलेल्या वर्णाक्षरांचा संच निवडा.Question title
प्रश्न
55
धबधबे आणि त्यांची ठिकाणे यांच्या योग्य जोड्या लावा.धबधबे                   ठिकाण(अ) मार्लेश्वर          १) सातारा(ब) ठोसेघर           २) रत्नागिरी(क) सौताडा          ३) अहमदनगर(ड) रंधा               ४) बीड
प्रश्न
56
(अ) प्रधानमंत्री रोजगार निर्माण कार्यक्रम(PMEGP)ऑगस्ट २००८ मध्ये सुरु करण्यात आला. (ब) PMEGP अंतर्गत ग्रामीण/शहरी भागात सूक्ष्म उद्योग स्थापन करण्याचा हेतू होता. (क) प्रधानमंत्री रोजगार योजना (PMRY) हि PMEGP मध्ये विलीन केली गेली.
प्रश्न
57
देशातील राष्ट्रीय कृषी प्रदर्शनी “कृषी वसंत २०१४” कुठे भरली होती?
प्रश्न
58
खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय चार कप्प्यांचे असते?
प्रश्न
59
खालील यादीतील योग्य जोड्या जुळवा व खाली दिलेल्या यादीतील पर्यायांमधून योग्य पर्याय निवडा.म्हैस प्रकार                         राज्य(अ) मुऱ्हा                        १) उत्तर प्रदेश(ब) भादवरी                     २) पंजाब(क) महेसाना                    ३) हरियाणा(ड) निलीरवी                    ४) गुजरात
प्रश्न
60
पुढीलपैकी कोणत्या गोष्टी वि.दा. सावरकरांनी समाज सुधारण्यासाठी केल्या? (अ) विविध जातीतील स्त्रियांचे हळदी- कुंकू कार्यक्रम योजले. (ब) स्पृश्य – अस्पृश्य यांचे एकत्र भिजनाचे कार्यक्रम योजले. (क) आंतर – जातीय विवाहांना प्रोत्साहन दिले. (ड) धर्मांतर केलेल्या हिंदूना परत हिंदू धर्मात घेण्यासाठी शुद्धीकरण चळवळ राबवली.
प्रश्न
61
जागतिक वारसा स्थळ यादीत महाराष्ट्रातील  खालीलपैकी  कोणत्या स्थळांचा समावेश होतो?(अ) शनिवारवाडा आणि शिंद्यांची छत्री.(ब) अजिंठा आणि वेरूळ.(क) कासचे पठार आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस.(ड) नांदेड  येथील गुरुद्वारा आणि ज्ञानेश्वर समाधी.
प्रश्न
62
खालील विधाने तपासून पाहा: अ) एक तर रमेश व किरण एकाच वयाचे आहेत किंवा रमेश किरणपेक्षा वयाने मोठा आहे. ब) एक तर सौरभ व संग्राम एकाच वयाचे आहेत किंवा संग्राम सौरभपेक्षा वयाने मोठा आहे. क) सौरभपेक्षा किरण वयाने मोठा आहे . वरील विधानांतून खालीलपैकी कोणता निष्कर्ष काढता येतो?
प्रश्न
63
जोड्या लावून उत्तराचा योग्य पर्याय निवडा. (अ) अखिल भारतीय ट्रेड युनियन कॉंग्रस (ब) अखिल भारतीय किसान कॉंग्रस (क) गिरणी कामगार संघ (ड) अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन (१) १९३६ (२) १९२० (३) १९१८ (४) १९२८
प्रश्न
64
A, B, C, D, E, F हे सहा मित्र समोरासमोर बसून एका वर्तूलाकृती मैदानात खेळत आहेत. E ह D च्या डाव्या बाजूस आहे. C हा A आणि B च्या मध्ये आहे. F हा E आणि A च्या मध्ये आहे. तर B च्या डाव्या बाजूला कोण आहे?
प्रश्न
65
प्रश्नाचिन्हाच्या जागी योग्य अंक लिहा.Question title
प्रश्न
66
जोड्या लावा. जिल्हे साक्षरता (%) (अ) धुळे १) ७२.८ (ब) नागपूर २) ८८.४ (क) नंदुरबार ३) ६४.४ (ड) अमरावती ४) ८७.4
प्रश्न
67
डॉ. नरेंद्र दाभोळकरांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही?
प्रश्न
68
राम घरापासून १५ कि.मी. दक्षिणेकडे गेला व पूर्वेकडे वळून १० किमी गेला नंतर उत्तरेकडे वळून ५ किमी अंतर चालत गेला व पुन्हा पश्चिमेला १० किमी चालत जावून थांबला. तर राम घरापासून कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे?
प्रश्न
69
अंड्यातील कोणत्या भागात प्रमुखत: प्रथिने असतात, ज्यामुळे त्याला पुर्णांन्न म्हणतात?
प्रश्न
70
पुढील घटना त्यांच्या कालक्रमानुसार लिहा: (अ) समाजवादी पक्षाची स्थापना (ब) कॉंग्रेसचे पाटणा अधिवेशन (क) श्वेतपत्रिका (ड) तिसरी गोलमेज परिषद
प्रश्न
71
जर 3×2=-26, 6×4=-40 आणि 5×7=-22 असेल तर 4×2=?
प्रश्न
72
वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता?
प्रश्न
73
‘बिग-बँग थेअरी’ हा प्रत्यक्षात इतिहासपूर्वकालीन अणूचा सिद्धांत प्रथम, …..नी प्रस्तावित केला.
प्रश्न
74
खालील विधानांचा विचार करा: (अ)थेट कर संहिता आणि वस्तू व सेवा करांची सुरुवात. (ब)कर चुकवेगिरी विरोधातील साधारण नियमांबाबत स्पष्ट धोरण. (क)द्वितीय सर्वसमावेशकतेबाबतची समिती.
प्रश्न
75
श्रामिकाची ‘शून्य सीमांत उत्पादकता’ म्हणजे
प्रश्न
76
महाराष्ट्रातील एकाच नावाचे तालुके व जिल्हे यांच्या जोड्या लावा.तालुके                                जिल्हे(अ)खेड                     १) रायगड, अहमदनगर(ब)कर्जत                    २)रत्नागिरी, पुणे(क)कळंब                   ३) नाशिक, अमरावती(ड)नंदगाव                  ४) उस्मानाबाद, यवतमाळ
प्रश्न
77
खालील विधानांचा विचार करा:(अ) सुवर्ण चातुर्भुज मार्ग दिल्ली, मुंबई, बंगळूरु व कोलकाता या प्रमुख शहरांना जोडतो.(ब) उत्तर – दक्षिण कॉरिडॉर (मार्ग) हैदराबाद मधून जातो.वरीलपैकी कोणते विधान/ विधाने बरोबर आहे /आहेत ?
प्रश्न
78
राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या पदाचा कार्यकाल समाप्तीनंतर खालीलपैकी कोणते विधान बरोबर नही ?
प्रश्न
79
खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? अ.सन २०११-२०१२ मध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादनातील सेवा क्षेत्राचा हिस्सा ५९% एवढा होता. ब).दळणवळण, व्यवसायिक सेवा आणि वित्त यात उच्च वृद्धीदर आढळून आला आहे.
प्रश्न
80
पुढील विधानांचा विचार करा: (अ) नवे औद्योगिक धोरण २४ जुलै, १९९१ रोजी जाहीर केले गेले. (ब) सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांसाठी निर्गुंतवणूकीचे धोरण स्वीकारण्यात आले.
प्रश्न
81
राज्यपालाचे अधिकार व अधिकार प्रदान करणारी कलमे यांची जुळणी करा: (अ) विधान सभेत अँग्लो – इंडियन जमातीच्या एका प्रतीनीधीची नियुक्ती करू शकतात. (ब) राज्य सरकारचे वार्षिक अंदाजपत्रक विधान सभेपुढे सादर करण्यास सांगणे. (क) विधानसभेत अर्थविधेयके मांडण्याची शिफारस करणे. (ड) त्याला ‘दया दाखविण्याचा विशेषाधिकार’ आहे. (१)१६१ (२)२०७ (३)२०२ (४)३३३
प्रश्न
82
खालील विधानांचा विचार करा: अ) डॉ.बी.आर. आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. ब) श्री.एच.जे. खांडेकर हे या समितीचे सदस्य होते.
प्रश्न
83
वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीत खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याने देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे?
प्रश्न
84
………हे शरीरातील Calcium व Phosphorच्या आंतरिक मात्रेसाठी (शोषणासाठी) जबाबदार आहे.
प्रश्न
85
फिनॉल हे …….
प्रश्न
86
…….. चा उपयोग फळांसाठी बुरशीरोधक म्हणून केला जातो.
प्रश्न
87
खालील यादीमधून योग्य जोड्या जुळवा व खाली दिलेल्या यादीतील पर्यायांमधून योग्य उत्तर निवडा.जिल्हे                               लिंगगुणोत्तर (दर हजारी)(अ)सिंधुदुर्ग                        १) ९३२(ब)रत्नागिरी                        २) ९२७(क)नाशिक                        ३) ११३६(ड)नागपूर                          ४) १०७९
प्रश्न
88
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांसाठी नाकाराधिकार (नोटा) उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य कोणते?
प्रश्न
89
‘दारिद्र्यरुपी समुद्राच्या बेटावर आपण आनंदाने जगू शकत नाही ‘ हे पुढीलपैकी कोणाचे मत आहे? (अ)स्वामी विवेकानंद (ब)सोनिया गांधी (क)एम.एस. स्वामीनाथन (ड)डॉ.व्ही.एम. दांडेकर
प्रश्न
90
मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या दोन बस गाड्यांपैकी पहिली गाडी सकाळी ८ वाजता ताशी 80 km वेगाने सुटली त्यानंतर त्याच दिवशी दुसरी गाडी सकाळी ९ वाजता ताशी १०० km वेगाने सुटली तर त्या दोन्ही गाड्या एकमेकांस किती तासांनी व किती वाजता भेटतील?
प्रश्न
91
खाली दिलेल्या पर्यायापैकी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेत सुधारणे संदर्भात नुकतेच कोणते महत्वपूर्ण निर्णय दिले? अ) इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर ब) EVM वर आणि मतपत्रिकेवर ‘NOTA’ (यापैकी कुणीही नाही) पर्याय क) निवडणूक ओळखपत्र. ड) गुन्हा/ अपराध सिद्ध झाल्याच्या दिनांकापासून संसद सदस्य(खासदार), राज्य विधीमंडळचा सदस्य (आमदार) अपात्र ठरतो /अनर्ह ठरतो.
प्रश्न
92
खालील विधाने विचारात घ्या : अ. मा. राष्ट्रपतीने लोकपाल विधेयक २०१३ ला १ जानेवारी २०१४ रोजी मान्यता दिली. ब. लोकपाल यांच्या न्यायाधिकारात पंतप्रधान, मंत्री व खासदार येतात.
प्रश्न
93
राज्याच्या महाधिवक्त्याबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
प्रश्न
94
भारतातील कोणत्या उद्योगधंद्यास ‘सनराईज इंडस्ट्री’ असे म्हणतात?
प्रश्न
95
खालीलपैकी १९३५ च्या भारत सरकारच्या कायद्याची वैशिष्ट्ये कोणती? (अ)प्रांतीय स्वायत्तता (ब)संघराज्याचे न्यायालय (क)केंद्रात द्विदल राज्यपद्धती (ड)दोन सभागृह असलेली संघीय कायदे मंडळ
प्रश्न
96
वरील तक्त्यावरून सर्व व्यक्तींच्या ज्वारी व गहू यांच्या एकूण उत्पादनाच्या ५०% उत्पादन करणारी व्यक्तींची जोडी कोणती?Question title
प्रश्न
97
२०१३ मध्ये मंगळ यान हे कोणत्या ठिकाणावरून सोडण्यात आले?
प्रश्न
98
खालील विधानांचा विचार करा: (अ) घडीच्या पर्वतांत विविध प्रकारच्या खडकांची संरचना असते आणि खोल दऱ्या व उंच शंकू आकाराची शिखरे असतात. (ब) घडीच्या पर्वतांची निर्मिती टेन्साईल फोर्सेस मुळे होते. वरीलपैकी कोणते विधान/ विधाने बरोबर आहे / आहेत?

राहुन गेलेल्या बातम्या

x