28 January 2025 9:25 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-93

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘वर्ल्ड टेलीव्हिजन डे’ खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला गेला.
प्रश्न
2
ई-प्रणालीचा वापर करून देशातील पहिला ‘ई विधानसभा मतदारसंघ’ बनणारा पालमपूर हा भाग कोणत्या राज्यात आहे.
प्रश्न
3
खालील विधाने विचारात घ्या. अ) ‘राष्ट्रीय एकता दिवस’ ३१ ऑक्टोंबर २०१६ रोजी साजरा केला गेला. ब) देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंती दिननिमित्त हा दिवस साजरा केला जातो.
प्रश्न
4
मेक ईन महाराष्ट्र या योजनेंतर्गत राज्य सरकारने खालीलपैकी कोणत्या कंपनीसोबत एल.ई.डी. बल्ब उत्पादन करण्यासाठी करार केला आहे ?
प्रश्न
5
सरबजीतसिंघ मारवाह यांच्याबद्दल योग्य विधान ओळखा.
प्रश्न
6
डॉ. रजनीशकुमार यांच्याविषयी विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. अ) त्यांना नॅशनल अॅकडमी ऑफ सायन्सेस (नासी) व स्क्रॉप यांच्याकडून दिला जाणारा तरुण वैज्ञानिक पुरस्कार मिळाला आहे. ब) त्यांनी नॅचरल गॅस हायड्रोटमधून अडकलेला मिथेन बाहेर काढण्यासंबंधी संशोधन केले आहे.
प्रश्न
7
‘सिस्व्हक्स’ या लसीविषयी पुढील विधाने विचारात घ्या. अ) ही लस ‘टेनीया सोलियम’ या पटटकृमीविरुद्ध वापरली जाते. ब) ही लस हैद्राबादस्थित ‘Indian Immunulogicals Limited’ या कंपनीकडून विकसित केली जाते.
प्रश्न
8
जगातील सर्वात शक्तीशाली ५०० संगणकांच्या सूचीमध्ये चीनच्या खालीलपैकी कोणत्या संगणकाचे प्रथम क्रमांक मिळविला आहे ?
प्रश्न
9
‘इम नोन ताइक’ यांच्या विषयी पुढील विधाने विचारात घ्या. अ) ताईक हे कोरियन चित्रपट सृष्टीतले चित्रपट दिग्दर्शक आहेत. ब) ताईक यांना २०१६ च्या ‘इफ्फी’ चित्रपट महोत्सवामध्ये ‘लाईफ टाईम अचिव्हमेंट’ पुरस्काराने सन्मानित केले गेले.
प्रश्न
10
योग्य विधान / ने ओळखा . अ) आठवी ‘ब्रिक्स’ राष्ट्रांची शिखर परिषद भारतात गोवा येथे पार पडली. ब) आजपर्यंत भारतात दोन ब्रिक्स शिखर परिषदा पार पडल्या आहेत . क) पहिली ब्रिक्स परिषद रशियातील येकाटेरिनबर्ग येथे पार पडली होती.
प्रश्न
11
अश्विनी एकबोटे यांच्याविषयी चे योग्य विधान निवडा.
प्रश्न
12
राष्ट्रकुल सचिवालयाने तयार केलेल्या २०१६ सालच्या जागतिक युवा विकास निर्देशांकानुसार पुढीलपैकी काय खरे नाही ? अ) जगातील एकूण युवा लोकसंख्येपैकी २० टक्के लोकसंख्या भारतात आहे. ब) भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास २७ टक्के लोकसंख्या युवा आहे.
प्रश्न
13
‘मधुबाबु आईन सहाय्यता सिबीर योजना’ ही समाजातील वंचित घटकास कायदेशीर मदत देणारी योजना खालीलपैकी कोणत्या राज्यसरकारने सुरु केली होती ?
प्रश्न
14
योग्य पर्याय निवडा . अ) ११ सप्टेंबर १९५८ रोजी ‘अफ्स्पा’ कायदा मंजूर करण्यात आला होता. ब) हा कायदा ‘घूसखोरी व अंतर्गत बंडाळी’ रोखण्यासाठी संबंधित राज्यामध्ये लागू केला जातो. क) सध्या हा कायदा ईशान्य भारतातील सर्व राज्ये आणि जम्मू -काश्मिर या राज्यामध्ये लागू आहे.
प्रश्न
15
जिहाद, गुलाल आणि सारीपाट, जमातवाद साहित्यकृतींचे लेखन खालीलपैकी कोणी केले आहे ?
प्रश्न
16
द गार्डिअन (The gardian) हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणत्या ठिकानाहून प्रकाशित केले जाते. अ) न्यूयॉर्क      ब)वॉशिंग्टन      क)लंडन      ड)परीस
प्रश्न
17
योग्य पर्याय निवडा. अ) २०१६ चा आंतरराष्ट्रीय मदर टेरेसा पुरस्कार शेख अब्दुल्ला बिन जावेद अल नहयान यांना जाहीर झाला आहे. ब) नाहयान हे संयुक्त अरब अमिरातीच्या मंत्रीमंडळातील मंत्री आहेत.
प्रश्न
18
‘कोरोडिया आयलिंट’ ही शून्य उत्सर्जन करणारी जगातील पहिली हायड्रोजन रेल्वे खालीलपैकी कोणत्या देशात सुरु केली गेली ?
प्रश्न
19
‘जेलेटॉर’ हे काय आहे ? अ) हे एक रासायनिक संयुग आहे. ब) जेलेटॉरचा वापर समुद्रातील तेल गळती काढण्यासाठी केला जातो .
प्रश्न
20
खलीलपैकी योग्य विधान कोणते ? अ) आंतरराष्ट्रीय श्रम संघटना ही संयुक्त राष्ट्रसंघाची संस्था आहे. ब) १९१९ मध्ये स्थापन झालेल्या या संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे .
प्रश्न
21
योग्य विधान/ने ओळखा. अ) आंतरराज्य परिषद अधिसूचना १९९० अनुसार केंद्र सरकारने गठित केलेल्या आंतरराज्य परिषदेचे अध्यक्ष स्वत:पंतप्रधान असतात . ब) आंतरराज्य परिषदेच्या सदस्यांमध्ये मुख्यमंत्र्यासहित केंद्रीय मंत्रीसुद्धा सदस्य म्हणून नियुक्त केले जातात.
प्रश्न
22
आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक, जेष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर यांनी खालीलपैकी कोणत्या पुस्तकाचे लेखन केलेले आहे. अ) नार्कोपोलीस           ब)अ सुटेबल बॉय क) व्हेन बॉम्बे बर्डन
प्रश्न
23
२० नोव्हेंबर २०१६ रोजी खालीलपैकी कोणत्या रेल्वेस कानपूर जवळील पुखराया येथे अपघात होऊन १२० लोकांना मृत्यू झाला.
प्रश्न
24
योग्य पर्याय निवडा अ) ब्रिक्स राष्ट्रांमध्ये जगातील लोकसंख्येच्या जवळपास ४० टक्के लोकसंख्या राहते. ब) जागतिक अर्थव्यवस्थेचा २१ टक्के भाग हा ब्रिक्स राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थेने व्यापलेला आहे.
प्रश्न
25
नुकत्याच पार पडलेल्या अमेरिकन संसदीय (कॉंग्रेस) निवडणुकिविषयी पुढील विधाने विचारात घ्या. अ) या निवडणुकीत भारतीय वंशाच्या पाच व्यक्तींचा अमेरिकन कांग्रेसमध्ये प्रवेश निश्चित झाला. ब) या निवडणुकीद्वारे चार भारतीय वंशाच्या व्यक्तीची ‘हाउस ऑफ रिप्रेझेटेटिव्ह’ या कनिष्ठ सभागृहावर निवड झाली.

राहुन गेलेल्या बातम्या

x