28 January 2025 9:37 AM
अँप डाउनलोड

MPSC सराव पेपर VOL-14

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
इ.स.१८४० मध्ये ‘दिग्दर्शक’ हे बंगाली भाषेतील पहिले मासिक कोणी सुरु केले ?
प्रश्न
2
मुंबईमध्ये इ.स. १८५३ साली भारतातील पहिली कापडगिरणी सुरु करण्याचे श्रेय कोणाला द्यावे लागेल ?
प्रश्न
3
हिंदुस्थानला पार्लमेंट हवे असा विचार कोणत्या समाजसुधारकाने व्यक्त केला होता ?
प्रश्न
4
राणीच्या जाहीरनाम्यानुसार, व्हाईसरॉयच्या मदतीला एक सल्लागार मंडळ असे. त्याला ‘व्हाईसरॉयचे कौन्सिल’ म्हणत. या कौन्सिलमध्ये किती सल्लागार नेमण्यात येत असत ?
प्रश्न
5
गो.ह.देशमुख (लोकहितवादी) यांनी …………. या साप्ताहिकातून शतपत्रे लिहिली.
प्रश्न
6
इ.स.१८४४ मध्ये स्थापन झालेली मानवधर्मसभा ही प. भारतातील प्रमुख सुधारणावादी संस्था होती. या संस्थेच्या स्थापनेत खालीलपैकी कोणाचा प्रमुख सहभाग होता ?
प्रश्न
7
प्रा.गं.बा. सरदार यांनी ‘महाराष्ट्रातील राष्ट्रवादाचे आद्य प्रवर्तक’ असे वर्णन ……….. यांचे केले आहे ?
प्रश्न
8
मुस्लीम समाजाला पाश्चात्य शिक्षण मिळावे व त्यांच्यात शिक्षणाबद्दल आवड निर्माण व्हावी म्हणून इ.स.१८७५ मध्ये अलिगड येथे मुहमेडन अॅग्लो-ओरिएंटल कॉलेज कोणी स्थापन केले ?
प्रश्न
9
इ.स.१८८२ मध्ये स्थानिक स्वराज्याचा कायदा पास केल्यामुळे भारतातील स्थानिक स्वराज्याचा जनक असे यथार्थ वर्णन खालीलपैकी कोणाचे केले जाते ?
प्रश्न
10
इ.स. १८५६ चा विधवांना विवाहाचा हक्क देणारा, त्यांची संतती कायदेशीर ठरवणारा कायदा, तसेच इ.स. १८७२ चा बालविवाह प्रतिबंधक कायदा मंजूर होण्यात ………… यांच्या प्रयत्नांचा मोठाच हातभार लागला असे आपल्याला म्हणावे लागेल.
प्रश्न
11
पहिले ब्रम्ही युद्ध केव्हा झाले ?
प्रश्न
12
स्त्रीयांच्या हक्कांचा रोखठोक पुरस्कार करणारा ‘स्त्रीपुरुष तुलना’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?
प्रश्न
13
रास्त गोफ्तार या सुधारणावादी नियतकालीकाचे संपादन कोण करीत असत ?
प्रश्न
14
इ.स. १८२० पासून बंगालमध्ये …………. यांच्या प्रेरणेने यंग बेंगाल मुव्हमेंट ही बुद्धीजीवी लोकांची जहाल सुधारणावादी चळवळ सुरु झाली. तसेच त्यांच्या काव्यातून मातृभूमीचे प्रेम व स्वातंत्र्याची आकांक्षा व्यक्त होत असल्यामुळे त्यांना आधुनिक भारताचे पहिले राष्ट्रवादी कवी असेही संबोधतात.
प्रश्न
15
कामगारांवरील अन्याय दूर व्हावा म्हणून सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते नारायण मेघाजी लोखंडे यांनी …………. या नियतकालिकातून कामगारांच्या गाऱ्हाण्यांना वाचा फोडली.
प्रश्न
16
थिऑसाॅफिकल सोसायटीचे भारतातील प्रमुख केंद्र कोठे स्थापन करण्यात आले होते ?
प्रश्न
17
………… या वर्षापासून ब्रिटीश सरकारने आधुनिक शिक्षणाचा पुरस्कार केला असे म्हणता येईल.
प्रश्न
18
भारतात पहिला इंडियन फॅक्टरी अॅक्ट केव्हा सुरु करण्यात आला ?
प्रश्न
19
लॉर्ड लिटनने भारतीय वृत्तपत्रांची मुस्कटदाबी करणारा देशी वृत्तपत्र कायदा कोणत्या वर्षी पास केला ?
प्रश्न
20
खालीलपैकी कोणाला आधुनिक भारताचे जनक म्हणून ओळखले जाते ?
प्रश्न
21
इ.स. १८५२ मध्ये दुसरे ब्रम्ही युद्ध झाले तेव्हा भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता ?
प्रश्न
22
राणीचा जाहीरनामा केव्हा प्रसिद्ध करण्यात आला ?
प्रश्न
23
महाराष्ट्रातील आद्य समाज सुधारक आणि मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक म्हणून आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे ओळखले जातात. इ.स. १८३२ मध्ये त्यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरु केले. ते कोणत्या प्रकारचे होते  ?
प्रश्न
24
खालीलपैकी कोणता भारतीय आय.सी. एच.ची  परीक्षा सर्वप्रथम उत्तीर्ण झाला ?
प्रश्न
25
जेम्स ऑगस्टस हिकी याने १७८० मध्ये कलकत्ता येथे सुरु केलेले ………… हे इंग्रजी साप्ताहिक म्हणजे भारतातील पहिले वृतपत्र होय.

राहुन गेलेल्या बातम्या

x