26 December 2024 5:59 AM
अँप डाउनलोड

नागपूर शहर पोलीस भरती २०१७

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
उपराष्ट्रपती हे ……… चे पदसिद्ध अध्यक्ष असतात.
प्रश्न
2
“मी मुंबईला जाईन” या वाक्यामधील काळ ओळखा?
प्रश्न
3
खालील शब्दापैकी कोणता शब्द विसंगत आहे?
प्रश्न
4
अनुलेखन व श्रुतलेखन ज्यावेळेस दिलेल्या वेळेतच करवयाचे असते तेव्हा त्या क्रियेस कोणते लेखन म्हणतात?
प्रश्न
5
१५०० चे २०% किती?
प्रश्न
6
7777 + 777 + 77 + 7 = ?
प्रश्न
7
जर CAT = 24, DOG = 26 तर HORSE साठी कोणता अंक असेल?
प्रश्न
8
स्तुती या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता?
प्रश्न
9
माधुरी गणपतीच्या मूर्तीसमोर हात जोडून उभी होती, तिच्या उजव्या हाताला उत्तर दिशा होती, तर गणपतीच्या मूर्तीचे तोंड कोणत्या दिशेला असेल?
प्रश्न
10
खालील अंक मालिकेत असे किती 6 आहेत ज्याच्या लगेचच नंतर 5 व लगेचच आधी 4 आलेले आहेत?1 3 5 4 6 5 4 5 3 4 6 3 4 6 5 1 4 5 6 3 2
प्रश्न
11
एक दुकानदार साडीच्या छापील किंमतीवर २० टक्के सुट देतो तरीही त्यास १६ टक्के नफा होतो, जर साडीची छापील किंमत ८७० रुपये असेल तर त्या साडीची खरेदी किंमत किती?
प्रश्न
12
‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हे पुस्तक कोणी लिहिले?
प्रश्न
13
5555 – 555 – 55 – 5 = ?
प्रश्न
14
ACE : 135 :: DFH : ……..?
प्रश्न
15
“माझा चष्मा आण”, यातील आण हे कोणते क्रियापद आहे?
प्रश्न
16
नऊ वाजता तास काटा व मिनीट काटा यांच्यात किती अंशाचा कोन असतो?
प्रश्न
17
चंद्र : पृथ्वी :: पृथ्वी : ………?
प्रश्न
18
“पंक” शब्दाचा अर्थ काय आहे?
प्रश्न
19
१० मीटर अधिक १०० सेमी किती?
प्रश्न
20
एका सायकलच्या दुकानात काही दुचाकी व काही तीन चाकी सायकली आहेत त्याचे हँडल्स् मोजल्यास ५० भरतात व चाके मोजल्यास १३४ होतात तर त्यापैकी दुचाकी व तीन चाकी सायकली अनुक्रमे किती?
प्रश्न
21
1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 + 7 + 8 + 9 + 10 =?
प्रश्न
22
Question title
प्रश्न
23
कोणत्या दिवशी देशात पोलीस ‘हुतात्मा दिन’ पाळला जातो?
प्रश्न
24
MDT (मल्टी ड्रग थेरेपी) हे कोणत्या आजाराची औषधोपचार पद्धती आहे?
प्रश्न
25
५ टन लोखंड प्रतोकिलो ६ रुपये दराने खरेदी केल्यास किती खर्च येईल?
प्रश्न
26
खालील आकृती पैकी कोणती आकृती विसंगत आहे?
प्रश्न
27
महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील सर्वोच्च पदाचे नांव काय आहे?
प्रश्न
28
गलगंड हा रोग कोणत्या क्षाराच्या अभावामुळे होतो?
प्रश्न
29
जर MAT = 260, BAT = 40 तर CBD साठी कोणता अंक असेल?
प्रश्न
30
पुढील बेरीज करा. 0.0050 + 0.505 + 5.05 + 0.05 + 5.5 =?
प्रश्न
31
“नर” या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता?
प्रश्न
32
रमेश पूर्वेकडे ७ किलोमीटर चालत गेला त्यानंतर तो उजवीकडे ८ किलोमीटर चालत गेला तर आरंभबिंदू व अंतिमबिंदू मध्ये कमीत कमी किती किलोमीटर अंतर असेल?
प्रश्न
33
पुढील शब्दाचा समास सांगा, चक्रपाणी.
प्रश्न
34
संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते?
प्रश्न
35
बॅंकांची बॅंक म्हणून कोणती बॅंक ओळखली जाते?
प्रश्न
36
जर प्रेम गोड आहे तर कडू काय असेल?
प्रश्न
37
एका वर्गातील १२० विद्यार्थीपैकी ५० टक्के विद्यार्थी पास झाले, तर किती विद्यार्थी नापास झाले?
प्रश्न
38
A चा वडील B च्या वडीलचा वडील आहे तर A हा B चा कोण?
प्रश्न
39
[(65/13+96/16) * (25/2.5+44/11)] / (32/16+80/10) = ?
प्रश्न
40
१५ व्यक्तींना १५ कि.मी. अंतर चालण्यास १५ तास लागतात तर एका व्यक्तीला तेच अंतर चालण्यास किती वेळ लागेल?
प्रश्न
41
सॅमसंग कंपनी कोणत्या देशातील आहे?
प्रश्न
42
“नागेश एका वाघासारखे चालत होता” अलंकार ओळखा?
प्रश्न
43
कोणता हक्क मुलभूत हक्क नाही?
प्रश्न
44
शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक कोणत्या गडावर झाला होता?
प्रश्न
45
जर C = 9, E = 25, तर J = ?
प्रश्न
46
‘कोण आहे रे तिकडे’ या वाक्यापुढे कोणते चिन्ह येईल?
प्रश्न
47
“इंद्र” या शब्दाचे सामनार्थी शब्द काय आहे?
प्रश्न
48
16, 25, 36, 49, 64, 81, 100,…….?
प्रश्न
49
शकुन या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता?
प्रश्न
50
“अज्ञान” या सामासिक शब्दाचा समास ओळखा?
प्रश्न
51
“निश्चल” शब्दाचे संधी – विच्छेद करा?
प्रश्न
52
आवळ्यामध्ये कोणते जिवनसत्व असते?
प्रश्न
53
एक किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम?
प्रश्न
54
“वर्णन करता येणार नाही” असे शब्दसमूहाकरिता एक शब्द काय आहे?
प्रश्न
55
“अभिवादन” शब्दाचा अर्थ काय आहे?
प्रश्न
56
रमेश हा एका रांगेत दोन्हीकडून ९ व्या क्रमांकावर उभा आहे, तर रांगेत एकूण लोक किती?
प्रश्न
57
6 + 24 * 10 / 5 – 2 = ?
प्रश्न
58
भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे?
प्रश्न
59
खालील कोणता अशुद्ध शब्द आहे?
प्रश्न
60
१६ या संख्येचा घन किती होईल?
प्रश्न
61
एंडोसल्फान हे खालीलपैकी काय आहे?
प्रश्न
62
मधुमेह …….. या द्रवाच्या कमतरतेमुळे होतो.
प्रश्न
63
जय जवान जय किसान हे घोषवाक्य कोणी दिले?
प्रश्न
64
DOTS हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी आहे?
प्रश्न
65
मुलींच्या रांगेत सुधाचा क्रमांक डावीकडून १७ व आणि उजवीकडून ७ व आहे तर रांगेत एकूण मुली किती?
प्रश्न
66
एक अप्रामाणिक व्यापारी १ कि.ग्रॅ. वजनाऐवजी ९०० ग्रॅम वजन वापरतो. या फसवनुकीतील शेकडा नफा किती?
प्रश्न
67
९ पुस्तकांची सरासरी किंमत २५ रुपये आहे. दहाव्या पुस्तकाची किंमत विचारात घेतली तर सरासरी रुपये २३ होते, तर दहाव्या पुस्तकाची किंमत किती?
प्रश्न
68
इंद्रधनुष्यातील सप्तरंग एकत्र आल्यास कोणत्या रंगाचा प्रकाश मिळेल?
प्रश्न
69
महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली?
प्रश्न
70
खालीलपैकी कोणती एक जोडी बरोबर आहे ते ओळखा?
प्रश्न
71
सचिन ने ५ सामन्यात ९८, १०८, २४, ५२, ६८ धावा काढल्या तर त्याने सरासरी किती धावा काढल्या?
प्रश्न
72
गटात न बसणारे पद ओळखा.
प्रश्न
73
महाराष्ट्रात कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो?
प्रश्न
74
पद्यात जी विशिष्ट शब्दरचना असते तिला काय म्हणतात?
प्रश्न
75
6, 24, 12, 48, ………?
प्रश्न
76
“भाषा” हा शब्द कोणत्या संस्कृत धातूवरून आलेला आहे?
प्रश्न
77
“सद॒रक्षणाय खलनिग्रहनाय” कोणत्या खात्याचे ब्रीदवाक्य आहे?
प्रश्न
78
भारतीय नागरिकांना विशिष्ट ओळखपत्र देण्यासाठी विशेष प्रकल्पाचे नामकरण काय करण्यात आले आहे?
प्रश्न
79
हाडे मजबूत करण्याकरिता कोणत्या विटामिनची आवश्यकता असते?
प्रश्न
80
‘अ’ ची जन्मतारीख १ जुलै २००० आहे आणि ‘ब’ ची १ नोव्हेंबर २००१ आहे तर दोघांच्या वयातील अंतर किती?
प्रश्न
81
एका घड्याळात आरशातुन पाहिल्यास ५ वाजून १० मिनिटे हि वेळ दर्शवते, तर प्रत्यक्षात त्या घड्याळात किती वाजले असतील?
प्रश्न
82
“तो झाडावर चढला” वाक्या मधील काळ ओळखा?
प्रश्न
83
संहार या शब्दाला समानार्थी शब्द काय आहे?
प्रश्न
84
किती सरळ व्याज दराने रुपये २५० ची चार वर्षात रु ३०० रास होईल?
प्रश्न
85
‘जिंकू किंवा मरू, भारताचे शत्रु सोबत युद्ध करू’ या वाक्यामध्ये कोणता रस आहे?
प्रश्न
86
W, U, R, N, I, ?
प्रश्न
87
४ कि.मी. + २५ मीटर + १२० मी.मी. = किती से.मी.
प्रश्न
88
“बालमन” या सामासिक शब्दात कोणता समास आढळतो?
प्रश्न
89
‘कानाडोळा करणे’ या वाक्याचा अर्थ काय आहे?
प्रश्न
90
BC, FG, JK, NO, …….?
प्रश्न
91
४० किमी प्रती वेगाने वाहन चालविण्यास २४० किमी अंतर जाण्यास किती तास लागतो?
प्रश्न
92
एका विशेष सांकेतिक भाषेत DATE = 30, FADE = 16 तर BAT = ?
प्रश्न
93
महाराष्ट्राचे लोकनृत्य कोणते आहे?
प्रश्न
94
सिहांची : गर्जना :: भूग्यांचा : ……?
प्रश्न
95
आईचे वय आज तिच्या मुलाच्या पाचपट आहे १० वर्षानंतर आईचे वय मुलाच्या तिप्पट होईल, तर आज तिचे वय किती?
प्रश्न
96
ग्रॅफाईट हे कोणत्या तत्वाचे स्वरूप आहे?
प्रश्न
97
एका दोरीला १० ठिकाणावरून कापले तर तिचे किती तुकडे होतील?
प्रश्न
98
‘पूर्वी कधी घडणे नाही’ असे या शब्दसमूहाचा अर्थ काय आहे?
प्रश्न
99
ZY : AB :: XW : ?
प्रश्न
100
एक इमारत बांधण्यास ३० मजुरांना ६० दिवस लागतात. तीच इमारत १५० मजुरांकडून बांधून घ्यावयाची झाल्यास किती दिवसांत पूर्ण होईल?

राहुन गेलेल्या बातम्या

x